अध्याय ७ - मन्वन्तरवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ७ - मन्वन्तरवर्णनम्‌

स्वारोचिष

१. आता यापुढे स्वारोचिष मनू, मन्वतंराचे अधीप, देवर्षी त्यांचे पुत्र यांविषयी वर्णन करतो.

२.-३. स्वारोचिष मन्वंतरात पर्वतादी ऋषी, तुषित आदी देव, विपष्चित्‌ हा बलवान व शत्रूंचा नाश करणारा असा देवेंद्र, ऊर्जस्तंब, प्राण, दत्त, अग्री, वरुण, निर्वैर, शाश्वरीय हे सप्तर्षी होऊन गेले.

४. स्वारोचिषाच्या चैत्र आदी किंपुरुष (किन्नर) या पुत्रांनी त्या मन्वंतराच्या कालावधीत पृथ्वीचे पालन केले. तामस (औत्तम)

५. तिसर्‍या मन्वंतरात औत्तम नावाचा मनू होऊन गेला. सुशांती नावाच्या देवेंद्राने देवराज्याचे पालन केले.

६. सुधमोन, सत्य, शिशिर, प्रतर्दन व वंशायत अशा पाचांचे बारा समूह मानले गेले.

७. तपोबलाने युक्त असलेले वसिष्ठांचे पुत्र त्या मन्वंतरात वासिष्ठ नावाने मुनी म्हणून प्रसिध्द झाले.

८. जय, परशू, दिव्य, धान्याद, औजस हे मनूचे सर्वच पाच पुत्र देवांप्रमाणे पराक्रमी होते.

९. तापस मन्वंतरात सो प्राशन करणारे, (सुवर्ण कांतीचे) सत्यवादी, उत्तम बुध्दी असलेले असे देवांचे २७ गण होते.

१०. त्या मन्वंतरात शिबी नावाचा इंद्र होता, ज्याने १०० यज्ञ केले होते. आणि जे सप्तर्षी होऊन गेले, त्यांची नावे आता माझ्याकडून ऐक.

११. हे पुत्रा, ज्योती, आप, पृथू, कार्य, शैत्य, अग्री, वहक आणि पुरुष हे ते सात ऋषी होते.

१२. सुर, ख्याती, शांतहय, जानुजंघा इत्यादी तापसाचे पुत्र होते की जे महाबलशाली राजे होते.

१३. पाचव्या मन्वंतरामध्ये रैवत नावाचा मनू, तसेच विभू नावाचा इंद्र होऊन गेला. त्या मन्वंतरातील देवांविषयी आता ऐक.

१४. अमृत प्राशन करणारे, भूतांध्ये संचार करणारे, वैकुंठात वास करणारे, अत्यंत बुध्दिमान अशा चार गुणांनी युक्त असे २८ देव होते.

१५.- १७. हिरण्यरोमा, वेदश्री, ऊर्ध्वबाहू, वेदबाहू, सुधामा आणि पर्जन्य हे सप्तर्षी त्या मन्वंतरात होऊन गेले. आता (रैवत) मनूच्या पुत्रांविषयी ऐक. हे श्रेष्ठ मुनी, बलबंधू, सुसंभाव्य, सत्यक, जितारी, जितरोध, बहुयज्ञ, नरेंद्र, सुहावीर्य असे त्याचे पुत्र होते.

१८. स्वारोचिष, औत्तम, तापस आणि रैवत हे चार मनू प्रियव्रताच्या वंशातील होते.

१९. प्रियव्रताने महान तपश्चर्येने विष्णूची आराधना करून पुरुषोत्तम असलेल्या अशा या मन्वंतराच्या अधीपांना प्राप्त केले.

२०. सहाव्या मन्वंतरात चाक्षुष नावाचा मनू व मनोहर नावाचा इंद्र होऊन गेला. आता देवांविषयी माझ्याकडून ऐक.

२१. आप्य, प्रसूत, भाव्य, दिवौकस लेख्य असे प्रमुख व महाबलशाली अशा पाच देवांचे ८ गण होते.

२२. सुमेधा, विरज, हविष्मान्‌, उत्तम, मधू, अतिधामा व सहिष्णू हे सप्तर्षी होऊन गेले.

२३. ऊरू, पूरू, शतद्युम्न हे ज्यामध्ये प्रमुख आहेत व जे महाबलशाली आहेत असे चाक्षुष मनूचे पुत्र पृथ्वीचे अधिपती झाले.

२४.-२७. हे महामते, सातव्या मन्वंतरात विवस्वानाचा पुत्र वैवस्वत हा मनू, तसेच आदित्य, वसू, रुद्र आणि दोन अश्विनीकुमार, ३३ देव, शक्र हा इंद्र, वसिष्ठ, कायप, अत्री, जमदग्री, गौतम, विश्वामित्र, भरद्वाज, हे सात ब्रह्मर्षी तसेच इक्ष्वाकू, नाभाग, धृष्ट, शंयाती, हरिष्मंत, धृष्णू, कुरुष, वसुान्‌, वृषघ्न असे ९ पुत्र धार्मिक व प्रख्यात होते.

२८. या वर निर्देश केलेल्यांच्या वंशामध्ये जे वीर व उत्तम असे राजे झाले, त्या राजांचे अजूनही दोन्हीकडचे (माता व पिता) वंश प्रभावशाली आहेत.

२९. अनुपम्य अशी शिवशक्ती ही सदैव सत्त्वगुणयुक्त आहे आणि संपूर्ण मन्वंतरांध्ये ती देवत्वरूपाने स्थित आहे.

३०. स्वायंभुव मन्वंतरात तिच्या अंशाने देव निर्माण झाला. पहिल्या मन्वंतरात तो आणि आकूती यांपासून मनू देव उत्पन्न झाले.

३१. स्वारोचिष मन्वंतर सुरू झाल्यावर भूतांचा निर्माता, अजिंक्य असा भगवान तुषिकेच्या ठिकाणी इतर तुषितांसह निर्माण झाला.

३२. उत्तम मन्वंतरात, अगोदर, सह्य नावाचा तुषित देव सत्यवादी अशा उत्तम देवांबरोबर सत्येच्या ठिकाणी जन्माला आला.

३३. तसेच तापस मन्वंतर सुरू झाल्यावर भार्येच्या ठिकाणी हरींसह हरी उत्पन्न झाला.

३४. रैवत मन्वंतरात, मनापासून झालेल्या, शुभ्र वर्णीय अशा देवांसह श्रेष्ठ देव संस्कृतीच्या पोटी जन्माला आला.

३५. चाक्षुष मन्वंतर सुरू झाल्यावर, वैकुंठ दैवतांसह वैकुंठातील पुरुषोत्तम असा देव विकुंठेच्या ठिकाणी निर्माण झाला.

३६.-३७. वैवस्वत मन्वंतर चालू झाल्यानंतर, काश्यपासून अदितीला वामन विष्णू झाला, ज्या महात्म्याने क्रमाक्रमाने तिन्ही लोकांना जिंकून निष्कंटक झालेले असे त्रैलोक्य पुरंदराला (इंद्राला) देऊन टाकले.

३८.-४०. अशाप्रकारे मी तुला सात मन्वंतरांविषयी सांगितले आहे. म्हणून निर्माण झालेले हे सर्व विश्व माझ्या शक्तीने युक्त आहे. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून टाकल्यामुळे त्याला विष्णू असे म्हणतात. -

सावर्णेरुत्पत्तिः

हे देवदेवेश प्रभो, होऊन गेलेल्या मनूंविषयी मी ऐकून सुध्दा माझे समाधान झालेले नाही. तेव्हा, पुढे होणार्‍या मन्वंतराविषयी तसेच त्या मन्वंतरात होणार्‍या मनूंविषयी सुध्दा सांगा.

४१.-४२. हे देवेश, त्यांविषयी मला सांगा. माझी ते ऐकण्याची इच्छा आहे. शंकराने म्हटले- भावी मन्वंतरात जे मनू होतील, त्या मनूंविषयी हे गुहा (स्कंदा), मी तुला सांगतो. ते एकाग्रचित्ताने ऐक. विश्वकर्म्याची कन्या संज्ञा ही सूर्याची पत्नी होती.

४३.-४५. अनू, यम, यमी अशी संज्ञेची मुले होती. नंतर, पतीचा ताप ( सूर्याचा दाह) सहन न झाल्यामुळे, तिने स्वतःचेच रूप असलेल्या आपल्या छायेला पातिव्रत्ययुक्त तपश्चर्येने पतीच्या सेवेत नियुक्त करून, तपश्चर्येचा संकल्प करून ती तपोवनात गेली. त्यानंतर छायेला सूर्यापादून तीन मुले झाली.

४६.-४७. शनैश्चर, मनू व तपती या कन्येला तिने जन्म दिला. स्वत;च्या मुलांवर ती छाया जसे प्रे करत असे, तसे ती संज्ञेपासून झालोल्या त्या तीन मुलांवर करत नसे. त्यामुळे लहान असल्याने, रागाने, व भविष्याच्या काळजीमुळे यमाला ते सहन झाले नाही.

४८. असे म्हणतात की, त्यावेळी खवळलेल्या सूर्यपूत्र यमाने आपल्या सावत्र आईला लाथ मारली.

४९. तेव्हा रागावलेल्या छायेने यमाला शाप दिला,' तुझा हा दुखरा पाय निखळून पडो.'

५०. तेव्हा यमाने पित्याला हात जोडून सर्व काही निवेदन केले. यमाचे बोलणे ऐकून, ‘हे काय झाले' असा विचार करू लागला.

५१. तेव्हा भगवान सूर्याने ध्यानाने त्याचे कारण जाणून, वनात तपश्चर्या करणार्‍या संज्ञेला समाधिदृष्टीने पाहिले.

५२.-५३. काश्यपनंदन सूर्याने उठून, तपतींच्या पुत्रांसह अश्वरूपाने तिथे वेगाने गेला, जिथे ती पतिव्रता सदैव पतीच्या सौम्यत्वाची इच्छा बाळगत तप करत होती. तेव्हा सूर्य अश्वरप धारण करून त्या प्रियेजवळ पोहोचला.

५४.-५५. सूर्यापासून संज्ञेला वैांध्ये श्रेष्ठ असे दोन अश्विन देव झाले. ?? त्यानंतर पुष्कळ काळाच्या विरहामुळे, पिंगट तेज असलेल्या घोड्याच्या रूपातील त्या सूर्याने संज्ञेचे घोडीत रूपांतर केले. त्यानंतर ते दोघे एकमेकांध्ये रममाण झाले. कालांतराने त्यांना रैवत नावाचा पुत्र झाला की जो पुढे घोड्यांचा नायक बनला.

५६. त्या रैवताची पूजा केल्याने व्याधिग्रस्त लोक निरामय होतील. आणि नंतर सूर्य संज्ञेला ती पूर्वी ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी परत घेऊन आला.

५७. विश्वकर्म्याने सूर्याला व त्याच्या दाहक तेजाला चक्रावर घालून सूर्याचे तेज सौम्य केले.

५८. हे सुरोत्तमा, विश्वकर्म्याने नियमित (तासलेल्या) केलेला विष्णूचा आठवा तेजांश प्रकाशित होऊन भूीवर पडला.

५९. त्वष्ट्याने त्याच तेजापासून विष्णूचे चक्र, माझा त्रिशूल व ब्रह्मदेवाचा दंड निर्माण केला.

६०.-६४. हे स्कंदा, स्वत;च्या आईला पाहून मुले आनंदित झाली. त्यानंतर, यमाने आपल्या आईला आपल्या शापाच्या कारणाविषयी पहिल्यापासून सांगितले व म्हणाला, ‘छायेने मला विकृत केले आहे.' हे सर्व छायेने केले आहे हे ऐकून, अत्यंत खवळलेल्या त्या पतिव्रतेने यमाकडून छायेविषयी सर्व वृत्तांत कळूनही, छायेला शाप दिला, ‘तू सर्व देहधार्‍यांची केवळ छायाच होऊन राहशील. माझ्या शापामुळे तुझा दुसरा मुलगाही पंगू होईल. जो ज्येष्ठ आहे, तो तपश्चर्येने मनुत्व प्राप्त करेल. तुझी तपती नावाची कन्या मानवाला पती म्हणून वरेल' असे म्हणून ती संज्ञा पुन्हा पतिसेवेत रममाण झाली.

६५. ती छाया प्राणिमात्रांच्या देहामध्ये छायारूपाने स्थित झाली. लोकांचे धर्माने पालन केल्यामुळे यम धर्मराज झाला.

६६. त्याने आपल्या कर्माने लोकपालकत्व प्राप्त केले. यमाचा मोठा भाऊ मनू हा प्रजापती झाला.

६७. त्यांची तरुण कन्या पवित्र अशी यमुना नदी झाली. छायेचा दुसरा पुत्र शनैश्वर नावाचा (शनी) ग्रह झाला.

६८. त्यांची जी तपती नावाची तरुण कन्या होती तिला साक्ष संवरण नावाचा राजा पती म्हणून लाभला.

६९. त्या संवर्णेला जो पहिला बुध्दिमान पुत्र झाला, तो सूर्यासमान तेजस्वी असल्यामुळे त्याला सावर्णी असे म्हणू लागले.

सावर्णिः

७०. हे महाभागा, सावर्णीचे जे आठवे मन्वंतर भविष्यात होईल, त्याविषयी आता मी तुला सांगतो.

७१. सुतप, अमिताभ, सुमुख हे देव होतील. त्या देवांचे प्रत्येकी २०गण होतील.

७२.-७३. हे मुनिश्रेष्ठा, आता भविष्यात होणार्‍या सप्तर्षींबद्दल सांगतो. दीप्तिमान्‌, गालव, राम, कृप, द्रौणी (अश्वत्थामा), त्याचप्रमाणे महाभाग्यशाली व्यास आणि श्रेष्ठ असे ऋष्यशृंग हे ते सप्तर्षी होत. विरोचनाचा मुलगा बली नावाचा दैत्य इंद्र होईल.

७४.-७५. चित्रसेन, विचित्र, विरज, चिरज, शार्वरीय, समंत आणि धृतिमान्‌, तो आ विष्णू, धृष्णू, भोज, सुती हे सावर्ण मनूचे पुत्र नरेश होतील.

दक्षसावर्णिः

७६.-७७. दक्ष सावर्षी नावाचा नववा पुत्र हा मनू होईल. हे पुत्रा, पर, मरीचिगर्भ, सुधर्म या तिघांचे प्रत्येकी १२ गण होतील. महाशूर व महापराक्रमी असा अद्भुत नावाचा त्यांचा इंद्र होईल.

७८. सवन, द्युतिमान्‌, वसू, मेधातिथी, तसेच ज्योतिष्ं, सत्यक व भव्य असे सप्तर्षी होतील.

७९. धूमकेतू चित्रकेतू, पंचहस्त, निरामय, पृथुश्रव आणि इतर हे दक्ष सावर्णीचे पुत्र असतील.

ब्रह्मसावर्णिः

८०. हे विभो, शामा नावाचा ब्रह्मसावर्णी मनू होईल. सुधामानो, निरुध्द असे शंभर देव होतील.

८१. पूर्वी वर्णन केलेल्या देवांच्या गणांसह भविेष्यात यज्ञभागाचा उपभोग घेणार्‍या देवांचा शंभर यज्ञ करणारा सुशांती हा इंद्र होईल.

८२.- ८४ ची पहिली ओळ. - आता जे सप्तर्षी होतील, त्यांच्याविषयी माझ्याकडून ऐक. हविष्मान्‌, सत्कृती, सत्य, आपोमूर्ती, नाभाग, प्रतिमाक्ष आणि सत्यकेतू हे ते सप्तर्षी होत. सुक्षेत्र, औत्तमाज, भूरिषेण इत्यादी ब्रह्मसावर्णीचे १० पुत्र त्यावेळी पृथ्वीचे रक्षण करतील.

धर्मसावर्णिः

८४. दुसरी ओळ- धर्मसावर्णी हा अकरावा मनू होईल.

८५. विहंगम, कामगम, निर्वाण, रुचक इत्यादी प्रमुख देवांचे गण त्या मन्वंतरात मानले जातील.

८६.-८८ पहिली ओळ.- त्या प्रत्येकाचे ३० गण होतील. तसेच वृष हा इंद्र होईल. हेतेज, अग्रितेज, वपुष्मान्‌, धृष्णी, आरुणी, हविष्मान्‌ आणि अनघ असे सप्तर्षी त्यावेळी होतील. धर्मश्रवा, सुधर्म व देवानीक हे मनूचे पुत्र त्यावेळी पृथ्वीपती होतील.

रुद्रसावर्णिः

८८. दुसरी ओळ.- रुद्रपूर्व नावाचा सावर्णि हा बारावा मनू होय.

८९.-९२ची पहिली ओळ.- ऋतुधामा हा त्या मन्वंतरातील इंद्र होईल आणि आता देवांविषयी ऐक.हे द्विजा, हरित, रोहित तसेच सुनस्‌, सुधर्माण, सुवाद या ५ देवांचे प्रत्योकी १० गण होतील. तपस्वी, सुतपा, तपोमुर्ती, तपोधन, तपोधृती, द्युती आणि कीर्ती हे ७ त्यात तपोधन ऋषी होतील. देववान्‌, उपदेव, देवश्रेष्ठ हे मनूचे पुत्र महापराक्रमी नरेश होतील.

९२ची दुसरी ओळ.-९३ची पहिली ओळ.- पाच मन्वतरे झाल्यावर शिवाच्या आज्ञेने सावर्ण मनू तपश्चर्येने युक्त होऊन मुक्त होईल.

रौच्यः

९३ची दुसरी ओळ.- हे द्विजा, रौच्य नावाचा तेरावा मनू होईल.

९४.-९५. रुचीचा प्रजापती नावाचा पुत्र ज्ञानी व अत्यंत तेजस्वी असेल. सुत्रामाण, सुधर्माण तसेच सुकर्माण यादेवांचे भिन्न भिन्न असे ३३ गण होतील. महापराक्रमी दिवस्पती हा त्यांचा इंद्र होईल.

९६.-९७. निर्मोह, तत्त्वदर्शी, निष्प्रकंप, निरुत्सुक, धृतिमान्‌ आणि सुतपा हे सप्तर्षी होतील. हे पुत्रा, आता या मनूच्या पुत्रांविषयी ऐक. चित्रसेन, विचित्र इत्यादी मनूची मुले पृथ्वीपती होतील.

भौतिकः

९८. भौतिक हा त्यावेळी चौदावा मनू होईल. श्रिती नावाचा इंद्र होईल आणि ५ देवांच्या गणांविषयी आता ऐक.

९९. चाक्षुष, पवित्र,कनिष्ठ, भ्राजिर व वाचाध्रुव हे ते देव होत. आता सप्तर्षींबद्दल ऐक.

१००. अग्रिबाहू, शुची, शुक्र, मागध, अग्रीध्र, युक्तव्रत आणि रज हे सात मुनी होतील.

१०१. ऊरू, गभस्ती, ब्रध्न असे हे भौतिक मनूचे महाबलशाली पुत्र राजे होतील.

१०२. शंकराने म्हटले-मन्वंतरांविषयी मी तुला संक्षेपाने सांगितले. तसेच हे पुत्रा, सृष्टीनिर्मितीची लक्षणे सुध्दा थोडक्यात सांगितली.

१०३. हे महामते, यातील बराचसा भाग मी तुला पूर्वीच वर्णन केला आहे. हे सुरोत्तमा, आतासुध्दा संक्षेपाने सांगितले.

१०४. हेतुपुरस्सर, जे ज्ञानानेच जाणले जाते ते मी आता सांगितले. त्या ज्ञानाचे फलित म्हणून त्रिभुवनाविषयी जे काही शिल्लक असेल ते तू जाणशील.

१०५. हे पुत्रा, तुझी बुध्दी माझ्या भक्तीत लीन झाली आहे. दुसरे काय ऐकू इच्छितोस? ते मला सांग. मी तुला त्याविषयी कथन करीन.

१०६. गुरू हे आपल्या प्रिय शिष्यालाही रहस्य सांगतात. तर मग प्रेळ पिते आपल्या स्वत;च्या मुलांना का बरे सांगणार नाहीत?

१०७. तेव्हा, हे सुरश्रेष्ठा, माझ्याकडून जे काही सर्व जाणावयाचे आहे, ते विचार. ते सर्व मी तुला सांगेन. हे महामते, तुझी काय इच्छा आहे?

१०८. जे श्रेष्ठ ब्राह्मण आणि मानव मन्वंतरांविषयीचे कथन ऐकतात आणि पठण करतात, ते निष्पाप होऊन, शिवाच्या समीप जाऊन सदैव सुखी होतात.