उमा महेश (अध्याय ११३)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

उमा महेश (अध्याय ११३)

ईश्वराच्या मुखातून सतत गोकर्ण क्षेत्राचे महात्म ऐकून जगन्माता पार्वतीला ते उत्तम असे गोकर्ण क्षेत्र परत एकदा पाहण्याची इच्छा झाली. देवीच्या बोलण्याप्रमाणे भक्तवत्सल शंकर वृषभावर आरूढ होऊन देवी व गणांसह गोकर्ण क्षेत्री आले. ॠषीसमुहाने वेढलेले, सार्वभौम असलेले महाबळेश्वर लिंग, शतशृङग पर्वत, वने, नद्या, तीर्थे, सरितापती समुद्राला बघून आश्चर्यचकित झालेली पार्वती शंभूना म्हणाली, ''हे प्रभो, हे संपूर्ण बाह्यांतर गोकर्ण क्षेत्र मी पाहिले आणि आता मला इथे राहण्याची इच्छा आहे. आपली जर माझ्यावर कृपा असेल तर एखादे रमणीय, गुप्त व शाश्वत असे स्थान तयार करा.'' प्रसन्नचित्त शंभू म्हणाले, ''हे सुंदरी, दोन योजने विस्तृत असलेल्या या गोकर्ण क्षेत्रीची सर्वच स्थाने शुभ आहेत; परंतु तरीही हे देवी, तुला जे  स्थान आवडेल ते तू निवड.'' पार्वती मातेने शतशृङग पर्वताच्या दक्षिण-पश्चिमेला उमावन नावाचे स्थान पसंत केले. पर्वत माथ्यावर भगवान शंकर उमेसह राहिले आणि आश्रमाच्या सभोवती संपूर्ण डोंगरावर ईश्वराचे सेवकगणही राहिले.

गिरीजादेवीच्या पावित्र्यासाठी या उमावनाच्या दक्षिणेला स्वर्गातील सर्व तीर्थांचे जल एकत्रित करून तयार झालेले हे उमाहृ नावाचे तीर्थ.

या तीर्थात स्नान करून वांछीत फलांची प्राप्ती करून देणारे, देव, सिध्द, ॠषीमुनी, गंधर्व, अप्सरा, किन्नर यांनी पूजलेले हेच ते उमामहेश्वर लिंग.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका