गंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

गंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)

भगीरथ प्रयत्नाने पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी गंगेला घेऊन निघालेल्या भगीरथाचे सर्व प्रयत्न वाटेत आलेल्या जन्हू ॠषींनी भंग केले, त्यांनी गंगेला प्राशन केले. भगीरथाच्या सहस्त्र वर्षांच्या तपश्चर्येनंतर जन्हू ॠषींना त्याची दया आली आणि त्यांनी गंगेला भगीरथासमोर प्रगट केले. त्यांची परवानगी घेऊन भगीरथ गंगेसह पन्ननागालयात पितरांच्या उध्दरासाठी गेले. जन्हू ॠषी पूर्वीप्रमाणेच आपल्या आश्रमात राहिले.

कालांतराने सत्यतपा नावाचे सत्यवादी मुनी जन्हूंच्या आश्रमात आले आणि म्हणाले, ''भगीरथा तिरस्कार करून कपटाने देवनदी तुम्ही पिऊन टाकलीत. तुमचे हे कृत्य महापातकी आहे.'' जन्हू ॠषींनी या पातकाच्या मुक्तीसाठी विचारणा केली असता, सत्यतप म्हणाले, ''या दोषांच्या शांतीसाठी तुम्ही पश्चिम समुद्राच्या तीरावर असलेल्या गोकर्ण नामक सिध्दक्षेत्री जा. तेथे रुद्रयोनीच्या उत्तर दिशेला गोकर्ण क्षेत्राची सीमा असलेली शालूकिनी नावाची महापुण्यकारक नदी आहे. त्या नदीपासून दोन कोस अंतरावर गंगेच्या विग्रहाची स्थापना करून तिची एकाग्रतेने विधीवत पूजा करा आणि या लोकोपवादाच्या दोषातून गंगेच्या प्रसादाने मुक्त व्हा.''

सत्यतपाच्या सांगण्याप्रमाणे जन्हू ॠषी गोकर्ण क्षेत्री आले आणि पवित्र शाल्मलीच्या तटावर आश्रम करून गंगेच्या विग्रहाची भक्तीपूर्वक पूजा करु लागले. कालांतराने त्यांच्या या पूजेने स्वर्गनदी गंगा त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि स्त्रीदेवी रुपाने त्यांच्यासमोर प्रगट झाली. गंगेने जन्हू ॠषींना त्यांनी केलेल्या गंगेच्या प्रतारणेच्या दोषातून मुक्ती दिली. त्यावेळेपासून त्या नदीचे नाव पडले गंगावली-शाल्मली.

अश्विन महिन्यात या नदीत तीन वेळा स्नान करून, देवर्षी पितरांना तर्पण देऊन, जन्हू ॠषींनी स्थापलेल्या या गंगेचा विग्रह गंध, अक्षता, पुष्प, धुप, दीप, नैवेद्य, नृत्य, गीत, गायन, दान, ब्राह्मण भोजन देण्याचे व्रत एक महिनाभर आचारणाऱ्याची ब्रह्महत्या इत्यादी पातकातून मुक्ती मिळून या पृथ्वीतलावरील सर्व अभिष्ट भोग भोगण्यास मिळून अंती पुत्रपौत्रासह शाश्वत पदाची प्राप्ती होते.

गंगाष्टमीच्या उत्सवात आजही श्री महाबळेश्वराची पालखी या गंगेच्या मंदिरात जाते. दीपावलीच्या संध्याकाळी श्री महाबळेश्वराची पालखी या गंगेच्या मंदिरात नेऊन ईश्वराशी विवाह लावला जातो.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका