रुद्रपाद (अध्याय ९२)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

रुद्रपाद (अध्याय ९२)

फार पूर्वी सूर्यवंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारीला गेला असता त्याला एक आक्राळ विक्राळ हिंस्त्र दैत्य दिसला. मित्रसह राजाने त्याला ठार मारले. या वधाने त्या दैत्याचा भाऊ खूप दुःखी झाला. मित्रसह राजाच्या विनाशासाठी मनुष्यरुप धारण करून तो राजाची चाकरी करू लागला. कालांतराने त्याने राजाचा विश्वास संपादन करून अंतर्वर्तुळात प्रवेश केला. राजाच्या वडिलांच्या वर्ष श्राध्दच्या वेळी खानसामानाच्या कोठाराच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्याने मिळवली आणि भोजनामध्ये मनुष्यमांस मिसळले. या श्राध्दसाठी वसिष्ठ ॠषी आले होते. पानातील श्राध्दच्या भोजनात मनुष्यमास बघून आचार्य वसिष्ठांनी मित्रसह राजाला ब्रह्मराक्षस बनण्याचा शाप दिला. विना अपराध शापित झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाने वसिष्ठांच्या 101 पुत्रांचे भक्षण केले. यामुळे ही सर्व मुले नरकयोनी भोगू लागली.

दुर्गतीत पडलेल्या आपल्या पुत्रांच्या मोक्षासाठी वसिष्ठांनी शक्तीपुत्र पराशर ॠषींना गोकर्ण क्षेत्री पाठविले. पराशरांनी रुद्रपाद लिंगाची स्थापना करून पवित्र असे तीर्थ बनवून घोर तपश्चर्येने शंकराला प्रसन्न केले. शंकराच्या आशीवार्दाप्रमाणे रुद्रपादावर पराशराने विधीवत पिंड व तिलोदक देऊन श्राध्द करून वसिष्ठपुत्रांची नरकातून मुक्तता करून त्यांना ब्रह्मलोकांची प्राप्ती दिली.

सूर्य कन्या राशीत असताना तप संज्ञाकाळात संकल्प सोडून श्राध्द करून, पिंड दानाने पितरांना तिलांजली दिली असता जेथे 101 कुळांचा उध्दर होऊन त्यांना शिवलोकांची प्राप्ती होते तेच हे रुद्रपाद.

 

कालीह्यद तीर्थाच्या वायव्येला हे पवित्र तीर्थ आहे. येथे स्नान करणाऱ्या माणसाला अधर्माने निर्माण होणाऱ्या भयापासून मुक्ती मिळते.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका