कालीह्यद (अध्याय ९१)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

कालीहृद (अध्याय ९१)

स्वायंभुव नावाच्या नगरात शुम्भ आणि निशुम्भ नावाचे दोन महापराक्रमी राक्षस जन्माला आले. त्यांना रक्तबीज नावाच्या तिसऱ्या राक्षसाची साथ मिळाली. शुम्भाने त्रैलोक्याला जिंकून इंद्रपद प्राप्त केले आणि इतर दोन राक्षसांना लोकपालाचे अधिकार दिले. भांडणे लावण्यात हुशार असलेले नारदमुनी एकदा शुम्भाच्या भेटीला गेले आणि शुम्भाला म्हणाले, ''तुझ्याकडे देवांचे स्त्रीरत्न सोडून इतर सर्व रत्न आहेत.'' हे ऐकताच शुम्भ राक्षसाने आपल्या दूताला देवीकडे पाठवून तिला आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण दिले.

देवी म्हणाली, बालपणी फारसे ज्ञान नसल्यामुळे, अज्ञातवश मी अशी प्रतिज्ञा केली आहे की, जो कोणी पुरुष मला युध्दत जिंकेल तोच माझा पती होईल. तेव्हा तू शुम्भाला मला युध्दत जिंकून माझे पाणीग्रहण करण्यास सांग. दूताने चंडिकेला त्रैलोक्याचा अधिपती असलेल्या शुम्भाच्या पराक्रमा विषयी सैन्याविषयी खूप सांगण्याचा प्रयत्न केला;परंतु काही केल्या चंडिका ऐकेना.

चंडिकेच्या बोलण्याने व्रुच्ध्द झालेल्या शुम्भाने रक्तबीजाला त्याच्या सैन्यानिशी हिमालयात जाऊन चंडिकेला घेऊन येण्याची आज्ञा दिली. चंडिकेला जबरदस्तीने बाहेर आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या रक्तबीज आणि त्याचा सैन्यावर दुर्गेने वज्रा अस्त्रांच्या सहाय्याने हल्ला चढविला; परंतु रक्तबीजाच्या रक्तातून परत परत राक्षस निर्माण होऊ लागले. त्यामुळे व्रुच्ध्द झालेल्या देवीच्या मुखातून अतिविशाल विश्वरूप, सहस्त्रभूजांनी युक्त, विशाल दात असलेली स्त्रीरुपधारी कालिका नावाची शक्ती बाहेर पडली. या कालिकेने आपले मुख विस्तारले, शूळांनी, गदेने रक्तबीजासह राक्षसांना ठार मारून त्यांचे रक्त, हाडे, मांस इत्यादींचे भक्षण केले. आनंदीत झालेल्या देवांनी त्या स्त्रीशक्तीला महाकाली असे नाव दिले. रक्तबीजाच्या वधाने क्रोधीत झालेले शुम्भ आणि निशुम्भ यांनी सैन्यासह दुर्गा चामुंडीवर हल्ला केला. देवीच्या शरीरातून निघालेल्या शक्तीने दानव सैन्याचा विनाश झाला. देवीने, निशुम्भाचे ह्यदय विदीर्ण करून मूळापासून तुटलेल्या वृक्षाप्रमाणे धरणीतलावर आपटून ठार मारले. आपल्या भावाच्या वधाने क्रोधीत झालेल्या शुम्भाने विविध रुपे धारण करत आकाशातून देवीवर विविध अस्त्रांचा वर्षाव केला. चंण्डिकेने खड्गाने शुम्भाचे चार अश्व मारले, त्याच्या सारथ्याचे मस्तक छेदून त्याचे धनुष्य मोडले. विरथ झालेला शुम्भाने देवीच्या मस्तकावरील सिंहावर प्रहार केला. तेव्हा व्रुच्ध्द होऊन जगन्मातेने शत्रूंसाठी दूदर्शन आणि देवांना सुदर्शन असे सहस्त्र सूर्यांच्या तेजासमान विष्णुंच्या सुदर्शन चक्राने शुम्भाच्या मानेवर हल्ला करून त्याचा  शिरच्छेद केला.

अशाप्रकारे शुम्भ, निशुम्भाचा वध करून त्या भद्रकालिकेने शतशृङग पर्वताच्या निर्मल तटावर आपली रक्ताने माखलेली आयुधे धुऊन दक्षिणेला मुख करून तपश्चर्येस बसली. ज्या ठिकाणी दुर्गेने आपली आयुधे धुतली त्या स्थानाचे नाव आहे कालिहृद. रुद्रयोनीच्या पूर्वेला आयुरारोग्य, ऐश्वर्य, सिध्दी प्राप्त करून देणारी हाच तो दक्षिणमुखी भद्रकाली मातेचा विग्रह.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका