मणिभद्र (अध्याय ८१)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

मणिभद्र (अध्याय ८१)

फार पूर्वी एकदा कैलासावर वृषभध्वज शंकरांच्या मुखातून गोकर्ण क्षेत्राचे वैभव ऐकून सिध्द, मणिभद्र, भूतनाथ गोकर्णक्षेत्र दर्शनासाठी आले. या क्षेत्रीचा समुद्र, कोटितीर्थ, ताम्रगौरी, कामेश्वर अधनाशिनी नदी इत्यादी गोष्टी बघून त्यांच्या लक्षात आले की, कदाचित कैलासापेक्षाही हे तीर्थ पवित्र आहे. जागो जागी देव, ॠषीमुनी, सिध्द पुरुष, यक्ष, गंधर्व यांनी स्थापिलेली लिंग बघून चुकून पाय लागू नये म्हणून मणिभद्र पाय वर करून हातावर चालत गोकर्ण क्षेत्रात फिरला. नंतर शतशृङगाच्या रम्य तटावर समुद्राजवळ आश्रम बनवून मणीभद्राने जितेंद्रीय होऊन निराहार राहून शीर्षासनात दिव्य सहस्त्र वर्षांची तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेले ईश्वर म्हणाले, हे मणिभद्रा, तू या गोकर्ण क्षेत्रात सर्वकाळ वास्तव्य कर. ज्या ठिकाणी शास्त्रानुसार विधीवत पूजा केली असता भूतपिशांच्यामुळे असलेले पाप नष्ट होते तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा मणीभद्र आश्रम


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका