कृष्णाश्रम (अध्याय ७५)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

कृष्णाश्रम (अध्याय ७५)

शोणीतपुरात सहस्त्र बाहू असलेल्या बाणासुराला उषादेवी नावाची मुलगी होती. एकदा स्वप्नामध्ये ती श्रीकृष्णांचा नातू अनिरुध्द याच्या बरोबर रत झाली. ही गोष्ट तिने आपल्या चित्रलेखा नावाच्या सखीला सांगितली. चित्रलेखेने देव, गंधर्व, सिध्द, दैत्य, यक्ष, चारण, बलराम, कृष्ण, प्रद्युम्न व त्याचा पुत्र अनिरुध्द इत्यादींची  चित्रे पटावर चितारली. अनिरुध्दला बघताच उषादेवी लज्जीत झाली. आपल्या मैत्रिणीच्या इच्छेसाठी चित्रलेखा आकाशमार्गाने श्रीकृष्णाच्या अंतपुरात गेली आणि तेथून अनिरुध्दला पळवून शोणीतपुरात आली. अत्यंत आनंदाने उषा अनिरुध्दबरोबर रममाण झाली. या व्यभिचाराची बातमी बाणासुराला कळताच त्याने अनिरुध्दला नागपाशाने बध्द केले.

तिथे यादव कुळात अनिरुध्द गायब झाल्याने सर्वजण त्याचा शोध घेत होते. अंती नारदमुनींनी श्रीकृष्णाला सांगितले, ''हे कृष्णा तुझा नातू बाणाच्या राजवाडयात आहे आणि उषेने रतीसुखासाठी त्याचे अपहरण केलेले आहे. शिवाचा परमभक्त असलेल्या बाणासुराला तुला सुदर्शन चक्राने जिंकणे शक्य नाही. तेव्हा तू तपश्चर्येने शंभूना संतुष्ट कर.'' त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गोकर्ण क्षेत्री आले आणि अगस्ती मुनींच्या आश्रमापासून किंचित वायव्य-पश्चिम दिशेला कोटीतीर्थाच्या सानिध्यात ईश्वराच्या तपश्चर्येला बसले. त्यांच्या या तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, ''हे यदुनंदना, चतुरंग सेना घेऊन शोणीतपुराला जाऊन माझ्याबरोबर अत्यंत तुंबळ युध्द कर आणि बाणाचे दोन बाहू सोडून त्याचे सर्व बाहू छेदून टाक.'' त्याप्रमाणे श्रीकृष्णाने भगवान रुद्रांबरोबर घोर युध्द करून बाणासुराचे 998 हात छेदून बाणासुराचे गर्वहरण केले. अंती दोन बाहू शिल्लक राहिलेला बाण यादव नंदनाला शरण गेला आणि स्वतःच्या कन्येचा कृष्णाच्या नातवाबरोबर विवाह करून दिला. गोकर्णात ज्या ठिकाणी श्रीकृष्णानी तप केले तोच हा श्रीकृष्णाश्रम.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका