रावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

रावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)

रुद्र योनीच्या दक्षिणेला श्रलेष्मांतक नावाच्या सिध्द वनामध्ये ब्रह्मदेवाच्या पुलस्त्य नावाच्या मुलाने आणि त्याच्या इतर वंशजांनी तप करून सिध्दी प्राप्त केली.  पुलस्त्य मुनींच्या पुत्राचे नाव होते विश्रवस. विश्रवसाच्या मुलाचे नाव होते वैश्रवण (कुबेर). या वैश्रवणाने दीर्घकाळ ब्रह्मदेवाची आराधना करून पुष्पक विमान, समुद्रातील लंकापुरी, संपत्तीचे ईश्वरत्व व अमरत्व मिळविले. ऐश्वर्यसंपन्न महान कीर्तीमान असलेला तो धनपती विमानाने ये जा करीत असे.

एकदा गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या करीत असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी तो विमानाने जात असताना सुमाली नावाच्या राक्षसाने त्याला पाहिले. कुबेराचे ऐश्वर्य आपल्याला मिळावे या इच्छेने त्या राक्षस राजाने आपल्या कैकसी नावाच्या रुपवान मुलीला विश्रवसाला (कुबेराच्या वडीलांना) पती म्हणून वर अशी आज्ञा केली. पितृआज्ञेप्रमाणे कैकसी विश्रवसाकडे आली आणि आपली इच्छा व्यक्त केली. तेव्हा हा मुनीश्रेष्ठ कैकसीला म्हणाला, सध्याचा काळ अतिशय वाईट असल्यामुळे या काळातली संतती व्रूच्र होईल. पितृआज्ञेपुढे कैकसीने काही न ऐकल्यामुळे तिला अत्यंत भयंकर, दहा तोंडे आणि वीस हात असलेला व्रूच्रकर्मा रावण नावाचा पहिला पुत्र झाला. त्याच्या नंतर महाकाय महाबलवान कुंभकर्ण, अत्यंत भयंकर अशी शूर्पणखा अशी संतती झाली. तो पर्यंत वाईट काळ संपला आणि चौथा पुत्र जणू काय दुसरा धर्मच असा बिभीषण झाला.

रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण तपश्चर्येकरीता गोकर्ण क्षेत्री आले. रावणाने आपली दहा तोंडे फोडून जाळून टाकली, आणि निराहार राहून घोर तपश्चर्येने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अणिमादी महासिध्दी व अवध्यत्व मिळविले. विभिषणाने स्थापना केलेले, कुंभकर्णाने पूजलेले आणि रावणाने अर्चना केलेले दीर्घायुषी करणारे गोकर्णक्षेत्री असलेले हे रावणेश्वर लिंग.


अशाप्रकारे वरप्राप्ती करताच रावणाने आईच्या सांगण्यानुसार युध्दमध्ये कुबेराला सैन्यासह जिंकून लंकेचे हरण करून कुबेराला हकलून लावले. पराजित कुबेर गोकर्ण क्षेत्री तप करीत असलेल्या आपल्या वडीलांकडे आला. वडील म्हणाले, दुर्जनांशी भांडण व मैत्री दोन्ही नसावी. त्यामुळे तू गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या करून ईश्वराला प्रसन्न करून घे. पितृआज्ञेप्रमाणे कुबेराने स्वतःचा रम्य आश्रम बनवून गोकर्णाच्या आग्नेय दिशेला लिंग स्थापना करुन तपश्चर्येस सुरवात केली. कुबेराच्या घोर तपश्चर्येने ईश्वर प्रसन्न झाले आणि त्यांनी कुबेराला कैलासावर फिरणारी अलकापुरी, मनोरम पालखी, मेणा तसेच उडण्याचे कौशल्य दिले. तेच हे सर्व पापांचे परिहार करणारे, सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारे, सर्व इच्छा फलद्रूप करणारे गोकर्णस्थित कुबेरेश्वर लिंग.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका