कपिल तीर्थ (अध्याय ६७)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

कपिल तीर्थ (अध्याय ६७)

पूर्वी कृत युगात राहू सूर्यग्रहणाच्या पर्व काळात मनुष्यगण गोकर्ण क्षेत्री ग्रहणकाळात स्नान करून महाबळेश्वराची पूजा करून राहू ग्रस्त सूर्याच्या दर्शनासाठी चालले होते. त्यावेळी भगवान महादेव देवी पार्वतीसह तेथेच होते. देवीने महादेवांना विचारले ही एवढी प्रजा इथे का जमा झाली आहे? ईश्वर म्हणाले, पर्व काळातील पुजेमुळे मरणानंतर स्वर्गलोक मिळावा या इच्छेने हे सर्व लोक इथे जमले आहेत.  विस्मयाने गौरी म्हणाली, जर या एवढया लोकांना स्वर्ग मिळाला तर मला वाटते स्वर्गातली जागा अपुरी पडेल. ईश्वर म्हणाले, हे देवी, फक्त शुध्द भक्तीच सिध्दी प्राप्त करून देणारी असते आणि भक्तीविना कोणालाही स्वर्ग मिळत नाही.

ईश्वर म्हणाले, हे देवी, मी बैलाचे रुप घेतो तर तू कपिला गाय होऊन माझ्याबरोबर ये. असे म्हणून दोघेजण एकमेकाला चिकटून यात्रा मार्गातील चिखल असलेल्या दलदलीत पडले. ज्याला त्याला महाबळेश्वर दर्शनाची आस होती. त्यामुळे जीवाच्या आकांताने हंबरणाऱ्या गाय-बैलाकडे कोणी लक्ष देईना.  या गर्दीत पुरुकुत्स नावाच्या ब्राह्मणाला या दुकलीची दया आली आणि तो चिखलात शिरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. एकटयाने त्याला काही हे जमेना. तेवढयात अत्रेय नावाचा दुसरा ब्राह्मण पुरुकुत्साच्या मदतीला धावून गेला; परंतु त्या दोघांनाही त्या चिखलातून गाय बैलाला काढता येईना. या दोघांना बघून सुहोग नावाचा तिसरा ब्राह्मणपण चिखलात उतरला. या तिघांनी मिळून ती गाय-बैलाची जोडी चिखलातून बाहेर काढली. स्वच्छ पाण्याने त्यांचे हात-पाय धुतले. त्यांना पोटभर वैरण खायला घातली. तो पर्यंत पर्व काळ संपला; परंतु यांच्या भक्तीने उमापती निलकंठ देवीसमवेत त्यांच्या पुढयात प्रगट झाले आणि त्या तिन्ही ब्राह्मणांना आपल्या शरीरात सामावून घेऊन स्वस्थानाला गेले. ज्या ठिकाणी ही गाय-बैलाची जोडी रुतली, ज्यातील स्थानामुळे अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे कपिल तीर्थ.

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील मंगळवार किंवा रविवार आणि रोहीणी नक्षत्रयुक्त ही षष्ठी कपिल षष्ठी म्हणून प्रसिध्द आहे.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका