पट्टविनायक (अध्याय ५७)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

पट्टविनायक (अध्याय ५७)

आपल्या मृगशृङ्ग लिंगाची प्रतिष्ठापना गोकर्ण क्षेत्री, रुद्रयोनीजवळ झाल्याचे वर्तमान कळताच, पार्वतीसह गोकर्णास आलेल्या ईश्वराने ब्रह्मा, विष्णु, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा यांच्यासह गणरायाचा पट्टाभिषेक सोहळा केला. गौरवाप्रित्यर्थ वक्रतुंडाला रत्नजडीत सिंहासनावर बसविण्यात आले. अभिषेकासाठी श्री विष्णुंनी सुवर्णकलशामध्ये जल आणले, जगन्मातेने सकल आभुषणाने हेरंबाला नटवले, अप्सरांनी नर्तन केले, गंधर्वाने गायन केले, द्वारपालांनी नजराणे वाहिले आणि सकळ मंगल वाद्यांच्या गजरात ईश्वराने आपल्या मुद्रेची अंगठी कृष्णपिगांक्षाच्या बोटावर चढवून त्याची  गोकर्णाच्या क्षेत्र रक्षणासाठी नेमणूक केली. ईश्वर म्हणाले, हे गणपती, तू सर्व सिध्दीप्रद हो, आजपासून तू चिंतामण विनायक या नावाने प्रसिध्द हो. ज्याचे दर्शन घेऊन प्रथम पूजा केली तरच गोकर्ण यात्रेचे फळ मिळते तोच हा श्रीमंदिराच्या आग्नेय दिशेला कोटीतीर्थापासून 52 पावलांवर स्थित असलेला पट्टविनायक. कालांतराने अपभ्रंश होऊन त्याचे नाव बट्टविनायक पडले.

 

 

कलकलेश्वर लिंग

रुद्राने रावणाला मृगशृङ्ग लिंग दिले ही बातमी कळल्यापासून सर्व देव प्रचंड तणावाखाली होते. परंतु गणरायाच्या कृपेने स्वतःच्या बळाचा अतिशय गर्व असलेला रावण जीवाच्या आकांताने जमिनीत रुतलेले महाबळेश्वर लिंग काढण्यासाठी करत असलेली वृथा धडपड बघून देवादी मोठ मोठयाने हसले. त्यांच्या हास्याचा हा कलकलाट अथवा कलकल ध्वनी जेथून निघाला तेथे ॠषीमुनींनी स्थापन केलेले हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे कलकलेश्वर लिंग.

या लिंगाला प्रदक्षिणा करून ॠषीछंदासहित हरिहरांचा मोठयाने गजर करण्याची प्रथा आहे.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका