चक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

चक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)

ब्र्रह्मदेवाचे मानसपुत्र सनदकुमार यांनी गोकर्ण क्षेत्री शंकरांची तपश्चर्या करून सिध्दी प्राप्त केली. तपश्चर्येच्या दरम्यान त्यांनी स्थापिलेले दिव्य लिंग परम जागृत स्थान बनले. या लिंगाच्या नुसत्या स्पर्शाने सर्वांना स्वर्गप्राप्ती होऊ लागली. परिणामस्वरुप दुष्ट, दुराचारी, अधर्मी लोकांनाही स्वर्ग लोक मिळू लागला. एक वेळ तर यमालय ओस पडण्याची पाळी आली. तेव्हा देवादिकांनी ब्रह्मदेवांकडे या लिंगाची तक्रार केली. ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला भगवान विष्णुच वाचवू शकतील. त्यामुळे सर्व देव विष्णुंकडे गेले. विष्णुंनी आपल्या सुदर्शन चक्राने ज्या लिंगाचा छेद केला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे चक्रखंडेश्वर.

लिंगाचा छेद करताना ते सुदर्शन चक्र पिंडीच्या वरच्या भागाच्या ओझ्याने आत अडकले आणि भूगर्भात लुप्त झाले. एकच हाहाकार माजला. शेवटी सर्व देवादीक भगवान शंभूना शरण गेले. शंकराच्या अनुग्रहाने ते सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी पाताळातून वर आले ते स्थान म्हणजे चक्रतीर्थ.

हे तीर्थ श्री मंदिराच्या उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर आहे. या चक्रतीर्थात विधीवत स्नान केल्याने राजसूय आणि अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका