भीम कुंड (अध्याय ४५)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

भीम कुंड (अध्याय ४५)

कृत युगात विदर्भामध्ये साक्षात् धर्मच असलेला भीम नावाचा राजा होऊन गेला. विरक्त भीम राजाने आपले सर्व ऐश्वर्य आपल्या मुलाला दिले आणि पत्नीसह तो गोकर्ण क्षेत्री आला. येथे त्या महान राजाने पवित्र असा आश्रम बांधून तीर्थ निर्माण केले. निराहार राहून परमोच्च समाधीमध्ये 600 वर्षांची महादेवाची घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले शंकर त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले. शंभू महादेवांना विदर्भराजा भीमाने पत्नीसह दंडवत घातले आणि त्या दोघांनीही अक्षय स्वर्गप्राप्ती केली. त्याचबरोबर स्वतःच्या तीर्थाला सर्वपाप नाशक होण्याची आशिर्वादही मिळविला.

कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षातील त्रयोदशीला ज्या तीर्थात स्नान करून शंकराची पूजा केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे भीमतीर्थ आणि अक्षय स्वर्गप्राप्ती मिळविलेल्या भीमराजाचा हा गोकर्ण क्षेत्री असलेला पवित्र आश्रम.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका