रामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

रामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)

रावण, कुंभकर्ण यांना ठार मारून अजानुबाहू रामाने बिभीषणाची लंकाधिपती म्हणून नियुक्ती करून सीतेसह अयोध्या नगरीत प्रवेश केला. प्रभुरामचंद्रांचा अयोध्याधीश म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. राजीवलोचन राम आपल्या भावांसह प्रजेचे स्वपुत्रांप्रमाणे पालन करीत असे. एकदा वसिष्ठ, अगस्त आणि इतर प्रमुख ॠषीमुनी प्रभु रामचंद्राच्या दर्शनासाठी आले.

आगत स्वागत झाल्यानंतर अगस्ती ॠषींनी रावण, कुंभकर्ण इत्यादी प्रमुख राक्षसांविषयी विचारले. रावणाच्या आणि इतर राक्षसांच्या मर्दनाची कथा सांगता-सांगता मनामध्ये दुःखद भाव निर्माण झालेल्या प्रभु रामचंद्राने त्या ॠषींना विचारले, ''रावणादी राक्षस ब्राह्मण वंशामध्ये जन्मले होते, त्यांच्या वधामुळे मला ब्रह्महत्येचे दुःसह असे पाप लागले आहे. त्या पापाच्या परिहारार्थ मी काय करावे?'' ॠषीवर्य अगस्ती म्हणाले, ''दक्षिणेला पश्चिम समुद्राच्या तीरावर श्रेष्ठ असे गोकर्ण क्षेत्र आहे. तेथेच सर्व पापांचा नाश करणारे असे कोटितीर्थ नावाचे तीर्थ आहे. हे कोटितीर्थ ब्रह्महत्यादी पापांचे क्षालन करते.

ॠषींच्या आदेशानुसार प्रभु रामचंद्र, लक्ष्मण आणि जानकीसह गोकर्ण क्षेत्री आले. समुद्र किनाऱ्यावरील एका रमणीय टेकडीवर आश्रम आणि तीर्थ रचून महाबळेश्वराच्या आराधनेने ब्रह्महत्येचा पापातून मुक्त झाले. रामनवमीला रामतीर्थात स्नान करून रामाची पूजा करून अष्टाक्षरी मंत्राच्या जपाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट करणारे हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे राममंदिर आणि रामतीर्थ.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका