सुमित्रेश्वर (अध्याय ३९)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

सुमित्रेश्वर (अध्याय ३९)

पौलस्त्याच्या कुळात सुमित्र नावाचा तेजाने व विद्येने जणू काही दुसरा सूर्यच असा ब्राह्मणश्रेष्ठ होऊन गेला. सिध्दी प्राप्त करण्याच्या इच्छेने सुमित्र ॠषींनी गोकर्ण क्षेत्रीच्या शतशृङग पर्वताच्या पवित्र तटावर सुमित्रेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना करून दिव्य सहस्त्र वर्षांची ईश्वराची आराधना केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले महादेव त्याला म्हणाले, हे विप्रश्रेष्ठा, तू स्थापन केलेल्या ह्या लिंगामध्ये मी, पार्वती आणि भूतगणांसमवेत निवास करीन.  आपले मनोरथ पूर्ण झालेले सुमित्र ॠषी गोकर्ण क्षेत्रीच निवास करू लागले.

शतशृङग पर्वतावर राहणाऱ्या वसिष्ठादी महर्षीनी गंगेच्या प्राप्तीसाठी परस्परात विचार विनिमय केला. त्यांच्या लक्षात आले की, गंगेला गोकर्ण क्षेत्री आणण्यास सुमित्रांशिवाय अन्य कोणीही योग्य ॠषी नाही. त्यामुळे वसिष्ठ, कश्यप, अगस्ती, भृगू आदी सर्वजण सुमित्र ॠषींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी आपल्या स्मरणाने, दर्शनाने आणि स्पर्शाने पापे नष्ट करणाऱ्या जान्हवीला गोकर्णक्षेत्री घेऊन येण्याची विनंती केली.

त्यांच्या विनंतीनुसार सुमित्रांनी  भगवान शंभूला हाक मारली. भक्त वत्सल शंभूने देवनदी गंगेचे स्मरण केले आणि अचानक ती गंगा ज्या ठिकाणी स्वतः शंकर उभे होते त्या ठिकाणी वर आली. शतशृङग पर्वताच्या माथ्यावर येऊन, सर्व ॠषीमुनींच्या, महाव्रती तपस्व्यांच्या इच्छा पूर्ण करून ती आल्हाददायी गंगा परत फिरली.

भगीरथानंतर पवित्र गंगेला नुसत्या स्मरणाने गोकर्ण क्षेत्री आणणाऱ्या सुमित्रॠषींनी स्थापन केलेले, त्रैलोक्यात पूजनीय असलेले हे उघडयावर पडलेले गोकर्ण क्षेत्रीचे सौमित्रेश्वर लिंग आणि खालच्या बाजूस सौमित्रेश्वर तीर्थकुंड. वर्षातून एकदा महाबळेश्वराची पालखी आजही या त्रिभुवनात श्रेष्ठ असलेल्या सौमित्रेश्वर लिंगाकडे येते.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका