गोगर्भ (अध्याय ३४)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

गोगर्भ (अध्याय ३४)

क्षत्रियांच्या संहारानंतर परशुरामाने विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्याचे पुरोहित होते मुनीश्रेष्ठ कश्यप. यज्ञानंतर परशुरामाने सर्व पृथ्वी कश्यपांना दक्षिणा म्हणून दान दिली. राजा विना प्रजा मनाप्रमाणे वागू लागली. प्रजेमध्ये अधर्म पसरला आणि हे पाप भूमी (पृथ्वी) सहन करू शकली नाही. त्रस्त झालेल्या भूमीने शतशृङग पर्वताच्या शिखरावर ब्रह्मकमंडलू तीर्थाच्या दक्षिणेस गुहेमध्ये शिरून प्राणायमामध्ये मग्न होऊन ईश्वराची घोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येने प्रसन्न झालेले देवेश शंकर पार्वतीसह प्रगट झाले आणि भूमीचे अराजक माजलेले विश्व पूर्वीप्रमाणे केले. ज्या ठिकाणी भूमीने तपश्चर्या केली, ज्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या माणसाचा पुर्नजन्म होत नाही, ज्या ठिकाणी एक लक्ष गायत्री जप करणाऱ्यास भूमीचा लाभ होतो तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे गोगर्भ स्थान आणि गोगर्भेश्वर.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका