अमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)

चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या जीभेच्या टोकावरून शुध्द वर्णाची सरस्वती निर्माण झाली. ब्रह्मदेवाच्या रसनेच्या रसातून (जिभेतून) निर्माण झाली म्हणून तिचे नाव पडले सरस्वती. ब्रह्मदेवाने तिला नदी आणि स्त्री अशा दोन भागात विभाजन करायला सांगितले. कालांतराने स्त्री रुपातील ही देवी ब्रह्मदेवाला सोडून दक्षाची मुलगी झाली आणि योगैश्वर्य प्राप्त करण्यासाठी सावित्रीबरोबर गोकर्ण क्षेत्री आली. या ठिकाणी दिव्य लिंगाची स्थापना करून घोर तपश्चर्या आचरू लागली. तिच्या तपश्चर्येने प्रपितामह  ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला ''हंसारूढ अशी तू सर्व भूतमात्रांच्या जिभेवर राहशील, तुझे हे कुंड सरस्वतीतीर्थ म्हणून ओळखले जाईल. विजयादशमीला ज्या तीर्थात स्नान करून ज्या लिंगाची पूजा केली असता प्रज्ञा आणि वापटुत्व प्राप्त करून देते ते हेच गोकर्ण क्षेत्रीचे सरस्वतीश्वर लिंग आणि जवळ जवळ गायब झालेले सरस्वती तीर्थ.


इंद्रियांचा निग्रह करून ध्यानस्थ बसलेल्या ब्रह्मदेवांच्या पूर्व मुखातून ॠग्वेद, दक्षिण मुखातून सामवेद, पश्चिम मुखातून यजुर्वेद आणि उत्तर मुखातून अथर्व वेद जन्माला आले. चारही मुखातून आलेले ते वेद एकत्र होत असताना त्यातून सुंदर वर्णाची, देवांनी पूजलेली, ब्रह्मदेवाचे आश्रयस्थान असलेली, ब्राह्मणांची माता सावित्री प्रगट झाली. तिला पाहून ब्रह्मदेव म्हणाले, दुःख संसार बंधनातून मुक्त झाल्यामुळे गाणे म्हणणाऱ्या हे सावित्री तू गायत्री या नावाने प्रसिध्द होशील. ब्रह्मदेवाच्या आदेशाप्रमाणे गोकर्ण क्षेत्री जाऊन सावित्रीने तपश्चर्या केली. रुद्रयोनीच्या आग्नेयेला असलेले हेच ते सावित्री तीर्थ (गायत्री तीर्थ).


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका