विधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

विधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)

ताम्रगौरीच्या समुद्राशी झालेल्या संगमाच्या जवळ त्रैलोक्यात सर्वश्रुत असलेले एक विधूतपापस्थाली नामक स्थान आहे. जमिनीच्या खोलगट भागामुळे त्याचे नाव पडले स्थाली आणि मनुष्यांची पापे परत परत धुणारी म्हणून विधूत पापा, अशी या विधूतपापस्थालीची ख्याती आहे.

ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झालेल्या पहिल्या गोमातेचे नाव होते सुरभी. या सुरभीच्या दुधाने क्षीरसागर निर्माण झाला. सुर असुरांनी त्याचे मंथन करून अमृत तर विष्णुंनी अत्यंत मनोहर व दिव्य लिंग प्राप्त केले. अमृताच्या प्राशनाने देव अमर झाले. या सुरभीने ब्रह्मदेवाकडे स्वतःला राहण्यासाठी जागा मागितली. ब्रह्मदेव म्हणाले, मी पूर्वी निर्माण केलेला शंकर पाताळात तपश्चर्या करीत आहे. त्याची प्रार्थना केल्यास तो तुला सुयोग्य स्थान देईल.

अशी ती अमृतस्त्रवा ब्रह्मपुत्री कामधेनू पाताळात गेली आणि तिने शंकराला वंदन करून आपली इच्छा सांगितली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे अनघे, तू गोकर्ण क्षेत्री जा, तेथे राहून तू देवांना हविर्भाग दे आणि पितरांना हव्य दे, जेणेकरून देवांनी पुजलेले विष्णुंच्या हातात असलेले दिव्य अविनाशी लिंग तुला प्राप्त होईल. या लिंगाची स्थापना करून विधीवत पूजा कर. ईश्वराच्या आदेशाप्रमाणे सुरभीने पापस्थालीमध्ये दिव्य स्त्रीरूप धारण करून महान तप आचरण्यास सुरुवात केली. हजारो दिव्य वर्षांच्या या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या लिंगातून विष्णुसह प्रगट झाले. तेच हे सुरभेश्वर लिंग. यानंतर सिध्दी प्राप्त केलेली सुरभी समुद्रात गुप्त झाली आणि देवांच्या दिवसाच्या मध्यान्ही आणि देवांच्या रात्रीच्या माध्यान्ही परत-परत वर येऊन या लिंगावर आपल्या दुधाचा अभिषेक करु लागली.

त्रैलोक्य भूषण असलेली हीच ती गोकर्ण क्षेत्रीची पितृस्थाली. या ठिकाणी दिलेले दान, अन्न, हव्य किंवा जप अक्षय पुण्यफल देणारा होतो आणि पूजा करणाऱ्याचे सर्व इप्सित पूर्ण होते.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका