ताम्रगौरी (अध्याय २७)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

ताम्रगौरी (अध्याय २७)

 सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ध्यानस्थ असलेल्या ब्रह्मदेवाच्या उजव्या हातातून नदीरुपी एक स्त्री निघाली. शुध्द स्फटिकाप्रमाणे निर्मल कांती असलेल्या त्या सर्वतीर्थमय स्त्रीला ब्रह्मदेवाने, ''तू रुद्रकांता म्हणजेच ईश्वराची पत्नी होशील'' असा आशीर्वाद दिला. त्रिभुवनेश्वर रुद्राला भेटण्यासाठी ही नदीरुपी स्त्री गोकर्ण क्षेत्री, रुद्रभूमीच्या पूर्व भागात किंचित ईशान्य दिशेस असलेल्या ताम्र पर्वतावर उतरली. रुद्रांचे ध्यान करत ती ताम्र पर्वतावर संचार करू लागली. या स्त्रीचे दुसरे नाव होते गौरी. त्यामुळे ताम्रपर्वतावरील संचारामुळे तिचे नाव पडले ताम्रगौरी. हाच तो गोकर्ण क्षेत्रीचा हातात वरमाला घेऊन असलेली विवाहइच्छुक ताम्रगौरीचा विग्रह.

या ताम्रगौरीच्या हातात तराजू आहे आणि हा तराजू गोकर्ण क्षेत्र काशी क्षेत्रापेक्षा किंचित जास्त पुण्यप्रदायी आहे असे दर्शवितो.  ब्रह्मदेवाने नंतर ईश्वर पार्वती विवाह लावून दिला आणि लग्न झाल्यानंतर ती देवी आणि नदी अशा दोन्ही स्वरुपात राहू लागली. सर्व पापसंहारणी अशी ही देवी नदीरूपाने ताम्रतलापासून अनेक तीर्थांमध्ये, अनेक तीर्थनद्यांमध्ये संगम होऊन, रुद्रयोनीतून समुद्रामध्ये विलीन होते.

कोणे एकेकाळी गोकर्ण क्षेत्री अवतरलेल्या या पापहरणी ताम्रगौरीच्या विशाल तिरावर ॠषीमुनींचे आश्रम होते. नदीकाठचा वनप्रदेश रम्य तपोवनांनी, गुहांनी, फलवृक्षांनी, पुष्पवृक्षांनी युक्त होता आणि त्यात विविध जंगली प्राण्यांचा मुक्त संचार होता. कलियुगामध्ये या ताम्रगौरीचे आपण काय केले आहे ते बघा.


या पवित्र ताम्रगौरीत स्नान करून ताम्रकुंडात पिंडाला तिलांजली आणि अस्थि निक्षेपण करण्याची प्रथा आहे. त्या अस्थींचे कण जोपर्यंत या तीर्थात राहतात तोपर्यंत मृतात्मा स्वर्गाचे उपभोग घेतो. याच ताम्रकुंडात महात्मा गांधींच्या चिताभस्माचे विसर्जन करण्यात आले.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका