स्कंदेश्वर (अध्याय २४)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

स्कंदेश्वर (अध्याय २४)

एकदा प्रिया पार्वतीसह, तसेच नंदी आदी प्रमुख गणांसह रम्य कैलास शिखरावर बसलेल्या शंकराजवळ जावून षण्मुखाने (कार्तिकेयाने) आपल्या माता-पित्याला वंदन केले. त्यावेळी त्रिपुरारी म्हणाले, हे पुत्रा या त्रैलोक्याचा आता मी संहार करणार आहे, तीन रात्रीच्या आत हे सर्व स्थावर जंगम विश्व विलयाला जाईल तेव्हा तू तात्काळ माझे उगमतीर्थ असलेल्या व माझे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला जा आणि सिध्दी प्राप्त करुन घे. शिवपुत्र कार्तिकेयाने ईश्वराच्या मुखातून गोकर्ण क्षेत्रीचा महिमा ऐकला आणि वैवस्वताच्या (प्रलयकाळाच्या) शेवटी आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार सिध्दीची कामना करणाऱ्यांना ती प्रदान करणाऱ्या गोकर्णक्षेत्री आला. तिथे प्रथेप्रमाणे स्वतःच्या नावाने तीर्थ व लिंग स्थापन करून घोर तपश्चर्येने ईश्वराला प्रसन्न करून तारकासुराच्या नाशासाठी स्वतःला सेनापतीपद मिळविले.
सर्व पापांचा नाश करून मनुष्याला रुद्रलोक प्राप्ती करून देणारा हाच तो गोकर्ण क्षेत्रीचा रुद्रभूमीपासून दोन बाण अंतरावर असलेला कार्तिकेय आश्रम आणि तीर्थ. हे तीर्थ तीन्ही लोकांमध्ये गुहोदक तीर्थ म्हणून प्रसिध्द आहे.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका