मार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

मार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)

मृकण्डू आणि सुमित्रा यांच्या पोटी एक महातेजस्वी मुलगा जन्माला आला, त्याचे नाव होते मार्कण्डेय. जन्मताक्षणीच आकाशवाणी झाली. हे मृकण्डू  तुझा पुत्र सोळाव्या वर्षी मरण पावेल!

योग्य वेळी मार्कण्डेय गुरुगृही गेले आणि वयाच्या 12 व्या वर्षी वेदांमध्ये पारंगत होऊन आई-वडिलांकडे परत आले. त्यांना बघून त्यांच्या आईचा शोक अनावर झाला. मार्कण्डेयांना आपल्या पुर्नभेटीने आनंदाऐवजी दुःख होण्याचे कारण आपला 16 व्या वर्षी मृत्यू आहे हे कळले.  आई-वडिलांना नमस्कार करून मार्कण्डेय त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच भृगू ॠषींच्या दिव्य तपोवनात आले. त्यांना सर्व हकीकत तपशीलवार सांगितली. भृगू ॠषी म्हणाले, हे पुत्रा मृत्यूंजय असलेल्या ईश्वराची आराधना कर. त्याप्रमाणे मार्कण्डेयांनी भृगू ॠषींच्या आश्रमात तीन वर्षे तपश्चर्या करून वयाच्या 16 व्या वर्षी वाराणसीला गंगेच्या तीरी आश्रम उभारून परत एकदा शंकरांची तपश्चर्या सुरु केली. वेळ येताच काळ मार्कण्डेयांना मारण्यासाठी गेला. मार्कण्डेयांनी ईश्वर लिंगाला मिठी मारल्यामुळे काळ अयशस्वी ठरला. दबा धरून बसलेल्या काळाने मार्कण्डेय ॠषी शौचविधीसाठी गेले असताना आपला डाव साधला. त्यामुळे शंकराने क्रोधीत होऊन त्या काळाला बेचिराख करून मार्कण्डेयांचे प्राण वाचविले आणि त्याला आयुष्यवर्धनासाठी केशवाची पूजा करण्यास सांगितले.

दुराग्रही मार्कण्डेय मात्र ईश्वराचीच दुर्घट तपश्चर्या करीत बसले. त्यामुळे शंकरांनी वृध्द ब्राह्मणरूप धारण करून स्वतःची निर्भस्तना आणि विष्णुंची परमस्तुती केली; परंतु काही केल्या मार्कण्डेय ईश्वरपूजा सोडून विष्णुपूजा करण्यास तयार होईनात. त्यावेळेस त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकर त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, हे द्विजा माझी शक्ती असलेल्या विष्णुंची आराधना कर, जेणेकरून त्या शक्तीने तुझे इप्सित साध्य होईल. विष्णु ही माझी शक्ती असून मी त्याचे शरीर आहे हे समजून घे. सर्व प्राणीमात्रांचे विष्णु हे बीजरूप असून मी आणि ब्रह्मदेव त्या बीजरुपाचे मूळ आहोत. त्यामुळे ना विष्णु मुख्य झाला, ना मी, ना ब्रह्मदेव. आमच्यामध्ये भेद करणाऱ्यास नरकयोनीची प्राप्ती होते. त्यामुळे हे द्विजोत्तमा माझ्या आज्ञेनुसार आजच गोकर्ण क्षेत्री जा. रुद्रयोनीच्या पूर्व भागात पूर्वी घोर तपश्चर्या केलेल्या धर्माचा तेथे आश्रम आहे. या गोकर्ण क्षेत्री सिध्दी मिळवून धर्म महायशस्वी आणि त्रिलोकाला पूजनीय झाला. त्यामुळे तू तिथे जाऊन सुरश्रेष्ठ विष्णुंचे प्रत्यक्ष दर्शन मिळेपर्यंत तपश्चर्या कर. हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे धर्मेश्वर.

आज्ञेप्रमाणे मार्कण्डेयांनी धर्माश्रमाजवळ गणपती आणि महेश्वरीची स्थापना करून स्वतःचा आश्रम तयार केला. निराहार राहून चार युगांपर्यंत तपश्चर्या केली. अखेर त्यांच्या ह्या घोर तपश्चर्येमुळे शंख, चक्र, गदा धारण करणारे, चतुर्भुज, गरुडावर आरुढ झालेले विष्णु संतुष्ट झाले. मार्कण्डेय ॠषींनी विष्णुंची स्तुति करून क्षमा याचना केली. ते म्हणाले, हे देवादी देवा माझ्याकडून जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने उध्दटपणे जे काही असत्य बोलणे झाले ते पोटात घालून मला क्षमा करा. विष्णु म्हणाले, तुझ्या परमभक्तीने, तपश्चर्येने, स्त्रोत्राने मी संतुष्ट आहे, तेव्हा वर माग. मार्कण्डेयानी रुद्र आणि ब्रह्मदेवाचे स्मरण केले. स्मरण करताक्षणीच दोघाही देवांचे तेथे आगमन झाले. ब्रह्मदेव म्हणाले, हे विष्णु, हा मार्कण्डेय महामुनी आज रुद्रभक्तीमुळे जिवंत आहे. मी आणि रुद्रानी याला आधीच अमरत्व दिले आहे. तेव्हा तूही तसेच कर. विष्णु म्हणाले, जो शिवाला नित्य भजतो तो खरोखर मलाच भजतो आणि सर्व लोकांचा प्रपितामह ब्रह्मदेव माझा आत्माच आहे. तेव्हा हे मार्कण्डेया, मी तुला अमरत्व दिलेलेच आहे, अजून तुझी काय इच्छा आहे का? तसे मला सांग. मार्कण्डेय म्हणाले, गोकर्णातला माझा हा आश्रम तुमच्या कृपेमुळे सर्वथा पूजनीय होवो, तपश्चर्येतील विघ्न नष्ट करण्यासाठी मी पूजलेला हा गजानन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा होवो. मी पूजलेले लिंग माझ्या नावे प्रसिध्द होवो, मी स्थापिलेले तीर्थ स्नान करणाऱ्यांच्या कामना पूर्ती करणारे ठरो. विष्णु म्हणाले, पुण्याश्रम नावाने तुझा हा आश्रम विख्यात होईल. तू स्थापिलेल्या लिंगात मी, ब्रह्मा आणि महेश्वर सदैव निवास करू. वैशाख महिन्यात दिलेले दान, केलेला होम आणि जप हजार पटीत होईल, असे बोलून तिघेही देवाधीदेव अंतर्धान पावले.


गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका