परशुराम (अध्याय १९)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

परशुराम (अध्याय १९)

अश्वमेध शोधण्याच्या नादात सगरपुत्रांनी भूतलाला पश्चिम समुद्रात दोन योजने खाली फेकून दिल्यामुळे शतशृङग पर्वताची शिखरे जेमतेम वर राहून उर्वरीत गोकर्ण क्षेत्र समुद्राच्या पाण्यात बुडून गेले. सिध्दी क्षेत्राच्या या विनाशाने हतबल झालेले ॠषीमुनी, देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि गोकर्ण क्षेत्राचा पुनरुध्दर कसा होईल अशी विचारणा केली. ब्रह्मदेवाने ध्यानाने अवलोकन केले आणि ते म्हणाले आत्ता तरी तुम्हाला सह्याद्री पर्वतावर जाण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. दीक्षा घेतलेल्या जामदग्नी पुत्र परशुरामाचा विश्वजित नावाचा यज्ञ पूर्ण होईपर्यंत तुम्हाला प्रतिक्षा करावी लागेल. या यज्ञानंतर परशुराम संपूर्ण पृथ्वीच कश्यपांना दान देईल. त्यावेळेला तुम्ही तेथे जाऊन कश्यप मुनींशी संगनमत करून विष्णुंचा अंश असलेल्या परशुरामाला गोकर्ण क्षेत्राचा पुनरुध्दर करण्याची विनंती करा.

ॠषीमुनींनी ब्रह्मदेवाच्या आदेशाप्रमाणे यज्ञ पुर्ण होताच भृगूकुलोत्पन्न परशुरामाला विनवणी केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे परशुरामाने समुद्राजवळ जाऊन वरुणाला नमस्कार करून दर्शन देण्यास सांगितले. वरुणाने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या शस्त्रधारी परशुरामाने वरुणालय जाळून वरुणाच्या नाशासाठी आग्रेय नावाचे अस्त्र बाहेर काढले. हे बघून वरुण बाहेर आला आणि परशुरामांना म्हणाला, हे शत्रूदमना तू माझ्यावर का कोपला आहेस? मी निःष्पाप आहे, माझे रक्षण कर. परशुराम म्हणाले, अत्यंत पापी अशा सगरपुत्रांमुळे गोकर्ण नावाचे अतिशय उत्तम असे सिध्द क्षेत्र समुद्रात बुडाले आहे. त्यात निवास करणारे हे ॠषीमुनी तुझ्याकडून ते परत मिळवू इच्छितात. समुद्रपती वरुण म्हणाला, हे भृगूनंदना, हे आग्रेय संहारास्त्र आवरून धर आणि जेवढी भूमी तुला हवी आहे ती मी तुला देण्यास वचनबध्द आहे.

परशुरामाने हातातली परशू फेकून केरळ पासून गोकर्ण पर्यंतचा दोनशे योजने भूभाग समुद्राकडून परत मिळविला आणि ॠषीमुनींसह तो गोकर्ण क्षेत्री आला. सर्वलिंगमय शिवरुप असे ते गोकर्ण महाक्षेत्र बघून परशुरामाने रुद्रयोनीत शंभूचे जमदग्नेश्वर नावाचे लिंग स्थापन करून विधीवत भक्तीने शंकराला संतुष्ट केले.

वैशाख महिन्यातील पौर्णिमेला परशुराम तीर्थात स्नान करून विधीवत जप करणाऱ्यांना मुक्ती प्राप्त करून देणारे हेच ते गोकर्णक्षेत्रीचे जमदग्नेश्वर.

महाबळेश्वराच्या पूजेला याच परशुराम क्षेत्रातील धान्य आजही लागते.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका