रुद्र भूमी (अध्याय ९)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

रुद्र भूमी (अध्याय ९)

पाताळातून वर आलेल्या शंकरांचा क्रोध काही नष्ट झाला नव्हता आणि आदि गोकर्णापासून एक बाण अंतरावर ईशान्य दिशेला ब्रह्मदेव स्थापित त्रैलोक्य भस्मसात करण्याच्या ईर्षेने शंकर उभे राहिले. क्रोधाने त्यांनी अनेक उग्र शस्त्रे धारण केलेले भयंकर महापराक्रमी असे 7 कोटी गण निर्माण केले आणि त्यांनी या गणांना, ब्रह्मदेवाने निर्माण केलेले स्थावर जंगम जाळून येण्याची आज्ञा केली. सृष्टीचा विनाश होणार हे कळताच स्वतः विष्णुंनी गोकर्ण क्षेत्री येऊन ब्रह्मदेवाच्या अपराधाबद्दल तात्पुरती क्षमा करण्याची आणि त्याचबरोबर या 7 कोटी भूतेशांना सृष्टीच्या प्रलयकाळी वापरण्याची विनंती शंकरांना केली.

विष्णुंच्या विनंतीने शंकरांचा क्रोध शांत झाला आणि ते म्हणाले, 'त्रैलोक्याला दग्ध करण्याचा इच्छेने ज्या ठिकाणी मी उभा राहिलो ते ठिकाण रुद्र भूमी म्हणून प्रसिध्द होईल.' मृत्यूनंतर जेथे दहन केल्याने माणसांना मुक्ती मिळते तीच ही गोकर्ण क्षेत्रीची रुद्र भूमी.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका