अध्याय २० - त्रिमूर्त्यभेदकथनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय २० - त्रिमूर्त्यभेदकथनम्‌

१. कुमाराने म्हटले, ‘हे तात, मला ही शंका पुष्कळ काळापासून आहे आणि मला त्याविषयी ऐकण्याची इच्छा आहे. हे देवा, परमेश्वरा, त्यासंबंधी सांगावे.

२. आपण एकटेच सर्व लोकांत वावरता. तर मग हे सुरश्रेष्ठा ज्ञानी लोक का बरे असा भेद करतात ?

३. भूत, वर्तमान आणि भविष्यत्‌ करणारा विष्णू हाच या जगतात एकमेव प्रभू आहे. तो जगताचा आदी आहे, तसेच अनादीही आहे. तोच सद्‌, असद्‌ असून त्यांच्याही पलीकडे आहे.

४. हे पुरुषोत्तमा, असे काही ज्ञानी लोक म्हणतात. काही दुसरे जण असे जाणतात (मानतात) की साक्षात ब्रह्मदेव जगत्पती आहे. त्याच्याशिवाय दुसरे कोणीही नाही.

५. तो तो अव्यय प्रभू लोकांचा कर्ता व करविता आहे. ब्रह्मदेवच प्रारंभी, मध्ये व अंती आहे.

६. हे वक्त्यांमध्ये श्रेष्ठा, हे सुरश्रेष्ठा, काही असे म्हणतात की भूत, वर्तमान व भविष्यत्‌ करणारा शिवच या लोकात प्रभू आहे.

७. तो जगताचा आदी, अनादी असून तोच सद्‌, असद्‌, व या दोघांच्याही पलीकडे आहे. शिवाहून दुसरे श्रेष्ठ दैवत या जगतात नाही असे इतर म्हणतात.

८. अशा प्रकारे ज्ञीनी व अज्ञानी लोक तीन प्रकारे अनुसरतात. त्यांचा या जगतात वाद ऐकून मला मोठी शंका आली.

९.-११.  हे गुरो, त्यांचे वाक्य सत्य वा असत्य जरी असले, तरी हे जगत्प्रभो, ज्यायोगे माझ्या शंकेचे निरसन होईल, त्याप्रमाणे हे भगवन्‌, हे गुरो, मी ऐकणे योग्य असेल, तर आपण सांगावे.' त्या स्कंदाचे ते बोलणे ऐकून परमेश्वर अशा देवाने कुमाराला विस्ताराने सांगितले. शंकराने म्हटले,ङङ्ग हे पुत्रा, हे गुह्य कधीही सांगू नये.

१२. हे सुरश्रेष्ठा, तू माझा पुत्र आहेस. तू माझा ज्ञान जाणणारा शिष्य आहेस. म्हणून हे पुत्रा, मी तुला ते सांगत आहे की जे जाणून तू सिध्दी प्राप्त करशील.

१३. (संज्ञाधिकारिणः) सत्त्व, रज आणि तम असे तीन गुण आहेत. वेदांचा जाणण्याजोगा भागही एकमूर्तियुक्त आहे यात संशय नाही.

१४. वात पित्त व कफ अशी देहाची तीन प्रकारची अवस्था असते. एकाच देहात तीन प्रकारे संज्ञा असतात.

१५. हे पुत्रा, या छोट्या शरीरात पुष्कळ धातू असतात. हे बाळा, त्या धातूंच्या संज्ञा वेगवेगळ्या असतात.

१६. हे बाळा, पाच इंद्रिये व पाच भूते आहेत. एक शरीर अनेक संज्ञाभेदामुळे पुष्कळ प्रकारचे (वेगवेगळे) असते (वाटते).

१७. हे पुत्रा, अशाच तर्‍हेने माझ्या बाबतीत पण असेच घडते यात संशय नाही. ?? वात, पित्त, कफ या शरीराच्या अवस्था मानलेल्या आहेत.

१८. एकाचा नाश झाला असता त्या क्षेत्राचा नाश होतो. एकाचा उद्रेक झाला तरी बाधा निर्माण होते.

१९. जोपर्यंत (या तिघांमध्ये) समत्व असते, तोपर्यंत हे शरीर (व्यवस्थित) असते. वै लोक पित्तप्रशमनासाठी पित्ताच्या गुणांची प्रशंसा करतात.

२०. तसेच कफप्रशमनासाठी कफाच्या गुणांची वाखाणणी करतात. त्याचप्रमाणे वातप्रशमनासाठी वाताच्या गुणांची स्तुती करतात.

२१. जे तीन प्रकारचे गुण असतात, ----? यात संशय नाही. हे जगत सात्त्विक, राजस व तामस असे तीन प्रकारचेच आहे.

२२. हे सुरश्रेष्ठा, हे सर्व माझ्या शरीरात चालते. संज्ञेचे भेद इच्छितात, मूर्तीचा भेद --?

२३. ब्रह्मदेव, विष्णू व शिव या माझ्याच संज्ञा आहेत, यात संशय नाही. जाा या माझ्या संज्ञा आहेत तशा हे प्रभो, त्या विष्णूच्या सुध्दा आहेत.

२४.- २५. मनीषी लोकांकडून असे म्हटले गेले आहे की त्या संज्ञा ब्रह्मदेवाच्या सुध्दा आहेत. हे पुत्रा, वात, पित्त, कफ जाणणारे वै जसे असतात, ते ब्रह्मविष्णुशिवात्मक असे ते ज्ञानी देखील या गुणांचे शमन केल्यामुळे एक प्रकारचे वैच आहेत ?? यात संशय नाही.

२६. हे बाळा, त्याचप्रमाणे (मद्धातुभवान्‌) देवांचे यजन करावे. तुझ्या शरीरात वात, पित्त, कफ यांपासून धातू उत्पन्न झालेले आहेत.

२७. हे पुत्रा, हे प्रभो, त्याचप्रमाणे गुणांच्या तीन भेदांमुळे व संज्ञेच्या फरकामुळे माझ्यात सुध्दा भूते ही तीन प्रकारची आहेत.

२८. ते ज्ञानी लोक ब्रह्मा, विष्णू, शिव म्हणून पूजा करतात. जसे ज्ञान तशी सिध्दी आणि जसे ज्ञान तसे सत्‌ प्राप्त होते.

२९. हे सुरश्रेष्ठा, असत्‌ सिध्दी मिळवलेले लोक खाली फिरत बसतात, जसे निद्रेशिवाय औषध हे व्याधी वाढवणारे असते.

३०. या जगतात एका मूर्तीच्या ठिकाणी तीन प्रकारे संज्ञा आढळते. आणि अशा विविध प्रकारची संज्ञा शरीराच्या अवयवांच्या ठिकाणी सुध्दा दिसून येते.

३१. जे त्यांच्या संज्ञेनुसार भजतात, ते अल्पबुध्दी होत. त्यांच्यातही जे माझे यजन करतात, त्यांनाच सम्यक सिध्दी प्राप्त होते.

३२. ज्यावेळी कर्म क्षीण होऊन वचनापासून, लेपनापासून ??, पेषापासून ??, शोषणापासून तसेच पाण्यापासून निर्मळ होईल,

३३. ज्यावेळी कर्त्याच्या उत्साहामुळे पट निर्मळ होतील, त्यावेळी क्षेत्राच्या तसेच गुरूंच्या आश्रयाच्या मदतीने ते सिध्द होतील.

३४. हे पुत्रा, ब्रह्मा विष्णू व शिव एकच आहेत यात संशय नाही, ज्याप्रमाणे वात, पित्त आणि कफाने शरीर ग्रहण केले जाते.

३५. ज्यावेळी स्वत;मध्ये एका मूर्तीला जो तीन संज्ञांनी पाहतो, त्यावेळी मुक्त झालेला तो पुरुष अभेदमुक्त झाला असे म्हणतात.

३६. जोपर्यंत भेद जाणतो, तोपर्यंत त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. देवादी भेदबुध्दीने व्यवहार करतात.

३७. तोपर्यंत पुनरागमन (होणे) हे लक्षण असलेले ते फिरत राहतात. स्वतःच्या अभेदाचे ज्ञान  करून (करणारा) तो मुक्त होतो, यात संशय नाही.

३८. वात, पित्त व कफ (हे तिन्ही) शरीरांमध्ये असताना जो (शरीरात) पित्त आणि कफ नाही असे जे म्हणतात, त्यांची वाणी असत्य होईल.

३९. ज्याप्रमाणे पित्त आहे, त्याप्रमाणे कफ आहे, त्याचप्रमाणे वात आहे असे जे समानतेने पाहतात, ते सत्‌ होत यात संशय नाही.

४०. भूतांसाठी शिव प्रमुख आहे, ना ब्रह्मा आहे, ना केशव आहे, असे जे बघतात, त्यांना ज्ञान गोचर (ज्ञात/अवगत)होत नाही.

४१. माझी निंदा करून जे त्रिभुवनांचा ईश्वर अशा विष्णूचे यजन करतात, त्यांना मुक्ती मिळणार नाही आणि ते संसारूपी सागरात पडतात.

४२. हे पुत्रा, आमच्या दोघांची अवज्ञा करून जे ब्रह्माचे यजन करतात, ते ज्ञानाच्या विषयात दीर्घ काळ राहू शकत नाहीत.

४३. हे पुत्रा, ॐ हे एक अक्षर आहे. त्यात तीन अक्षरे असतात. त्यांना अकार, उकार व मकार अशा संज्ञा आहेत.

४४. जेव्हा ती एकत्व प्राप्त करतात, तेव्हा त्यांना प्रणव (ॐकार) असे म्हणतात. ती वेगवेगळी असताना त्यांची नावे भिन्न असतात आणि ती ॐकार होणार नाहीत.

४५. हे पुत्रा, प्रणवाची निर्मिती करण्यासाठी एकच अक्षर पुरेसे नाही. त्या त्या गुणापासून ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे स्वतःहून प्रकट झाले आहेत.

४६.-४७. हे कुक्कुटध्वजा, ते वेगवेगळेपणाने मुक्ती देण्यास समर्थ नाहीत. हे गुहा, जे त्यांना भिन्न बुध्दीने (ते वेगवेगळे आहेत असे मानून) त्यांचे भक्तिभावाने यजन करतात, त्यांना मिळणारी सिध्दी अतिशय अल्प असते व तिचे (या संसारात) पुनरागमन होणे हे लक्षण असते.ज्ञानी, तत्त्वदर्शी असे आर्य तिला सिध्दी म्हणत नाहीत.

४८. हे बाळा, अज्ञानी लाक तिला सिध्दी असे समजतात. जाऊन जाऊन परत येतात आणि भोगून भोगून भोगत राहतात.

४९. जन्मून जन्मून ते दु;खांचे आगरच बनतील (बनतात). म्हणून, ज्ञानी (शहाण्या माणसाने) शुध्दप्रभावाने अद्वैतच जाणावे.

५०. ज्यावेळी समत्वबुध्दी होईल ,त्यावेळी तो सिध्द होईल, यात संशय नाही. केवळ संज्ञेनेच सुस्पष्ट भेद करणार्‍या अज्ञानी लाकांना ती अप्राप्य असते.

५१. ब्रह्मा, विष्णू, शिव ही नावे या माझ्याच संज्ञा आहेत यात संशय नाही. मी या जगतात ब्रह्मा, विष्णू, शिव या संज्ञांनी तीन प्रकारचा आहे.

५२. संज्ञेमुळे मी भिन्नबुध्दी असणार्‍यांसाठी असेन, योग्यांसाठी नाही. हे सुरश्रेष्ठा, अज्ञानी लोकांसाठी मूर्तिभेद असतो, योग्यांसाठी नाही.

५३. काय, कर्ता आणि क्रिया या सिध्दीची साधने आहेत. तर ब्रह्मा, विष्णू व शिव या सिध्दीच्या परमसाधना आहेत.

५४. हे पुत्रा, ङङ्ग मीच हे सर्व जगत्‌ आहे. दुसरे कोणीही नाही,' असे जेव्हा या जगतात द्विज मानतो, तेव्हा त्याला सिध्द म्हणतात.

५५. तोच विष्णू आहे, ब्रह्मा आहे आणि साक्षात शिवही आहे.याबाबतीत सुध्दा प्राचीन इतिहासाचा दाखला देतात.

५६. हे गुहा, त्याविषयी मी तुला सांगतो. ते तू एकाग्रमनाने ऐक.

५७. परमेश्वरांच्या अभेदाविषयीचे हे आख्यान जे या भूतलावर वाचतात, ऐकतात ते महानुभाव ज्ञान मिळवून शरीर सोडल्यानंतर तुला येऊन मिळतील ??

अध्याय १ ते २०