अध्याय १९ - गोकर्णस्य पुनरुध्दारः

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १९ - गोकर्णस्य पुनरुध्दारः

१. शतानीकाने म्हटले, ‘पुराणार्थात पारंगत, महाबुध्दिमान अशा हे व्यासशिष्या, शिवाने उधारलेले वाक्य ऐकून पुन्हा गुरूंनी काय विचारले?'

२. हे कुरुकुळातील श्रेष्ठ राजा, ती कथा मी तुला सांगतो. ऐक. कुमाराने म्हटले, ‘हे देवदेवेश, तुमच्या मुखातून सागर परिपूर्ण होण्याविषयीची कथा ऐकली आहे.

३. गोकर्णाच्या उध्दाराविषयी विस्तृतपणे सांगावे.' असे हे कुरुकुळात जन्मलेल्या राजा, षण्मुखाने, रुद्राला म्हटले.

४.-५.  हे महीपते, रुद्राने ती कथा कुमाराला सांगितली. ‘हे पुत्रा, गोकर्णाच्या पुनर्जन्माबद्दल विस्ताराने सांगतो. ऐक . सावधानचित्त हो. हे षण्मुखा, समुद्रामध्ये ती दोन योजने बुडालेली होती.

६. हे कुरुकुलश्रेष्ठा, सह्याद्रीच्या पश्चिमेला (बुडालेल्या) तिसर्‍या योजनात लवणयुक्त समुद्रात शतशृंगाचे ते शिखर दिसते.

७. तेव्हा चिंतायुक्त होऊन ऋषिगणांसह देवांनी ब्रह्मदेवाला शरण जाऊन, हे कुरुनंदना, त्याला (ब्रह्मदेवाला) प्रणाम केला.

८. हे राजा, गोकर्णरहिवासी देवांनी ब्रह्मदेवाला वंदन करून असे म्हटले, ‘आपण या लोकांचा धाता, विधाता तसेच प्रपितामह (आजोबा) आहात.

९. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. हे भक्तवत्सला, आमचे रक्षण करा. हे देवा, सर्व क्षेत्रांमध्ये देवांनी पूजिलेले गोकर्ण हे क्षेत्र उत्तम आहे.

१०. तिथे देवतांची व ऋषींची स्थाने आहेत. हे विभो, असे ते क्षेत्र सध्या समुद्रात बुडालेले आहे.

११.-१२.  शतशृंगाचे शिखर पाण्यात थोडेसे दिसत आहे. हे देवेशा, आपल्या कृपेमुळे तिथे सुखाने राहणारे आम्ही सिध्दी इच्छितो. ते शिखर पाण्यात बुडालेले आहे. हे भगवंता, त्याचा उध्दार करून आमच्यावर कृपा करावी.'

१३. त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकून, लोकांचा प्रपितामह अशा ब्रह्मदेवाने ध्यानाने अवलोकन करून, सर्व ध्यानात आणून त्यांना असे म्हटले,

१४. ‘तुम्ही पर्वतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सह्य पर्वतावर ताबडतोब जा. हे तपोधन , तिथे जाऊन तुम्ही निवास करावा.

१५. दीक्षा घेतलेल्या जामदग्न्य रामाचा (परशुरामाचा) यज्ञ जोवर समाप्त होत नाही, तोवर तुम्ही प्रतीक्षा करा.

१६.-१९. हे सज्जनांनो, विश्वजित्‌ नावाचा यज्ञ तिथे सुरू आहे. त्याच्या अंती विभू (परशुराम) तो स्वतःच्या  निवासासाठी महेंद्र नावाचा प्रसिध्द उत्तम पर्वत सोडून पर्वत, वने, अरण्यांसह पृथ्वी आणि सर्वस्व देईल. जे काही दुसरे शिल्लक असेल, तो ते कश्यपाला देईल. त्यावेळी, हे उत्तम देवांनो, तुम्ही कश्यपाबरोबर संगनमत करून गोकर्णाचा उध्दार करण्यासाठी वर मागा. तुम्ही याचिलेले तो (परशुराम) तुमच्या हितासाठी करेल.

२०. त्याशिवाय ते करणे अथवा त्यासंबंधी विचार करणेही अशक्य आहे. परशुरामाशिवाय दुसर्‍या कोणत्याही उपायाने तो पुन्हा मिळणे शक्य नाही.

२१.-२२. विष्णूचा अंश असलेला, अतिशय पराक्रमी असा तोच जगताचे तारण करण्यास समर्थ आहे.' असे त्याचे (ब्रह्मदेवाचे) वचन ऐकून देव, गंधर्व, दानव, महाभाग्यशाली ऋषी, किन्नर, मोठे सरपटणारे प्राणी, मानव  व पक्षी सह्याद्री पर्वतावर गेले.

२३. हे प्रभो, देवांनी, ऋषींनी तोवर प्रतीक्षा केली जोवर परशुरामाने तो महायज्ञ समाप्त केला.

२४.-२५. परशुरामाने सर्वस्व आणि राज्यही ब्राह्मणांना देऊन टाकले. हे राजेंद्रा, त्या प्रभूने (परशुरामाने) कन्येचे रूप धारण केलेल्या भूमीला पाचारण करून, तिला अलंकृत करून यथान्यायाने (यथाविधी) कश्यपांना दिली. तेव्हा तिचा स्वीकार करून त्यांनी तिला कन्येसमान मानली.

२६.-२७. तेव्हापासून, त्या देवीला ‘काश्यपी' म्हणून ओळखू लागले. याच कालावधीत, हे पुत्रा, तृणाग्री ज्यांमध्ये प्रमुख आहे असे गोकर्णावर निवास करणारे ब्राह्मण ज्याच्यावर अभिषेक झाला आहे व ज्याचा कौतुकसोहळा केला गेला आहे अशा त्या परशुरामाजवळ गेले.

२८. हे राजा, ऋत्विजांसह, राजसदस्यांसमवेत, मुनींनी आशीर्वाद देऊन भृगुपुत्र परशुरामाचा ऊदोउदो (जयजयकार) केला.

२९.-३०. हे राजा, त्यावेळी, भार्गवाने त्यांची अर्घ्य इत्यादींनी पूजा केली. त्याने ज्यांची पूजा केली आहे अशा त्या विप्रांनी काश्यपांनी शस्त्रधार्‍यांमध्ये ज्याला श्रेष्ठ मानले आहे अशा रामाला  सुखासीनपणे असे म्हटले,  ‘हे भृगुपुत्र रामा, आम्हाला तुझे याचक मान.

३१. हे महाभागा, जो जे इच्छितो ते तू देणारा तू दाता आहेस. तेव्हा हे वीरा, भृगुनंदना, तू आम्हाला वर दे. '

३२.- ३३. ते एकून तो भार्गव राम त्यांना वंदन करून असे म्हणाला, ‘हे महाभाग विप्रांनो, तुम्ही काय सछि्‌छता, ते सांगा. मी तुमच्यासाठी काय करावे? हे द्विजश्रेष्ठांनो, सर्वस्व किंवा शरीर सुध्दा (देईन) असे रामाचे बोलणे ऐकून आनंदित झालेल्या त्या मुनींनी म्हटले,

३४. ‘महाभागाची पूजा करून ? हे कौरवा, तुझे कल्याण असो, कल्याण असो. हे मुनिश्रेष्ठा, यांची याचनाही ऐकावी. ??

३५.-३६.  हे श्रेष्ठ द्विजा, गोकर्ण हे प्रसिध्द सिध्दिक्षेत्र आहे. हे द्विजा, भूतलाला खणणार्‍या त्या क्रूर सगरपुत्रांनी पश्चिम समुद्रात दोन योजने खाली फेकली आहेत. हे शत्रुनाशना, तुझ्याकडून त्यांचा उध्दार हे इच्छितात.

३७. हे विभो, तुझ्याशिवाय समुद्रापाशी जाणे कोणालाही शक्य नाही. तेव्हा, हे भृगुकुलोत्पन्ना, गोकर्णाचा उध्दार करून तू यांना दे.'

३८. असे त्यांचे वचन ऐकून, हे कौरवा, विप्र, सदस्य व काश्यपांसह राम सरित्पती समुद्रकाडे गेला.

३९. हे वीरा, समुद्रजवळ जाऊन त्याने असे म्हटले. वरुणाला नमन करून ‘दर्शन दे' अशी याचना केली.

४०. ‘या श्रेष्ठ मुनींसह मी तुझे दर्शन (घेऊ) इच्छितो.' असे त्याने म्हटले (तरीही) वरुणाने काहीही प्रत्युत्तर दिले नाही.

४१. शस्त्रधार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा भगवान राम तेव्हा संतापला. त्याने आपल्या क्रोधाग्रीने (दिधुक्षु) वरुणालय जाळून टाकले.

४२. आपल्या धनुष्यावर आग्रेय अस्त्र आरोपित करून त्याने ते बळाने खेचले. त्यावेळी परशुरामासमोर प्रकट होऊन वरुण त्याला म्हणाला,

४३. ‘हे शत्रुदमना महाभागा, निष्पाप अशा माझे रक्षण कर. हे विभो भृगुनंदना, तू माझ्यावर का कोपला आहेस?'

४४. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून रामाने म्हटले, ‘या समुद्रात गोकर्ण नावाचे अतिशय उत्तम असे सिध्दिक्षेत्र आहे.

४५. आणि अत्यंत पापी अशा सगरपुत्रांनी ते तुझ्या समुद्रात फेकले आहे. त्यात निवास करणारे हे द्विज तुझ्याकडून ते पुन्हा मिळवू इच्छितात.

४६. हे देवा, तू ते त्यांना पूर्वीप्रमाणे दे. मी माझा कोप टाकीन.' तेव्हा, ‘ठीक आहे राजा,' असे सम्रद्रपती वरुणाने म्हटले.

४७. ‘जेवढा प्रदेश तुला हवा आहे, तेवढा मी तुला देईन. हे महाभागा भृगुनंदना, आग्रेय हे संहारास्त्र आवरून धर.

४८. जेवढी भूमी हवी आहे, तेवढी सीमा काढ. हे रामा, तुझ्या आज्ञेनुसार, माझी तीच सीमा होवो.'

४९. असे त्या महात्मा वरुणाने भृगुश्रेष्ठाला म्हटले. तेव्हा भार्गवाने आग्रेयास्त्र आवरून धरले.

५०. सीमेची इच्छा करणार्‍या त्याने समुद्रात स्रुवा(पळ) फेकली. ती दोनशे योजने दूर जाऊन पडली.

५१. सुपाच्या आकारात दक्षिणेकडून उत्तरेला जाऊन ती स्रुवा -- ?

५२. रामाच्या भीतीने समुद्रपती भगवान वरुणाने भूमीचा त्याग करून अतिशय प्रीतिपूर्वक ती रामाला दिली आणि स्वतः निरामय (सुखरूप) राहिला.

५३. मगरींचे निवासस्थान असलेला त्या समुद्रातून त्या गोकर्ण महाक्षेत्राचा उध्दार करून हे राजा, त्याने ते पूर्वीप्रमाणे ब्राह्मणांना दिले.

५४.-५७.  हे राजा, त्यावेळी प्रसन्न असा राम सर्व ऋषिगण, व मुनींसह उत्तम अशा गोकर्ण क्षेत्री आला. हे सुता, तेव्हा सर्वलिंगमय शिवरूप असे ते गोकर्ण महाक्षेत्र बघून भार्गवनंदन रामाने स्वतः तेथे रुद्रयोनीत शंभूचे जामदग्न्येश्वर नावाचे मानवांची सर्व अभीष्ट पूर्ती करणारे असे लिंग स्थापन करून,विधिवत्‌ भक्तीने त्याचे पूजन करून परमेश्वराला (शंकराला) संतुष्ट केले. ‘हे पावतीरमणा, तुला नमस्कार असो. हे कालनाशना, तुला नमस्कार असो.

५८. हे कामदहना, हे शरणागतपालका, तुला वंदन असो. घोर अशा अज्ञानसागरातून हे करुणासिंधो, उध्दार कर.'

५९. अशा प्रकारे स्तुती करून, हे गुहा, भृगुपुत्र रामाने लिंगाच्या सभोवती भूमीवर महेश्वराला भक्तीने साष्टांग दंडवत्‌ घालून नमस्कार केला.

६०. त्यावेळी प्रसन्न झालेल्या भक्तवत्सल अशा भगवान शंकराने भार्गवाला आपल्या (दोर्भ्याम्‌) उठवून असे म्हटले.

६१. शंकराने म्हटले, ‘हे महाभागा रामा, देव ज्याची पूजा करतात अशा गोकर्ण क्षेत्राचा तू समुद्रतून पुन्हा उध्दार केला आहेस.

६२. हे भृगुकु लोत्पन्ना, तू इथे रुद्रयोनीत लिंग स्थापन केले आहेस. या कारणास्तव तुझ्याविषयी मला खूप स्नेह निर्माण झाला आहे.

६३. हे भद्रा, वर माग. तुझे जे काही अभीप्सित आहे ते माग. जरी ते कितीही दुर्लभ असले, तरी ते मी तुला ताबडतोब देईन.'

६४. रामाने म्हटले, ‘जर तू मला वर देऊ इच्छितोस आणि जर मी (तुझ्याकडून) वर देण्यास (घेण्यास) लायक असलो, तर हे सुरश्रेष्ठा, हे लिंग संपूर्ण त्रैलोक्यात पूजनीय होवो.

६५. जे मानव इथष येऊन स्नान करून या लिंगाच्या ठिकाणी तुझी पूजा करतील, त्यांची, हे महेश्वरा, तुझ्या कृपाप्रसादामुळे अभीप्सित प्राप्ती होवो.

६६. हे शंभो, हे शंकरा, त्यानंतर तू जर संतुष्ट असशील, तर त्यांना मोक्ष दे.' भार्गवाचे असे वचन ऐकून भगवंताने म्हटले,

६७.- ६९. ‘हे रामा, वैशाख महिन्यातील पौर्णिमेला जो नरोत्तम इथे येऊन तीर्थात विधिवत्‌ स्नान करून तुझ्या ( तू ÷स्थापन केलेल्या) लिंगाची पूजा करेल व शक्तिपंचाक्षरी विेचा १००८ वेळा विधिवत्‌ जप करेल, त्याला त्वरित मुक्ती मिळेल. जो महापापांनी युक्त असो, किंवा उपपातकांनी युक्त असो, पंचाक्षरीचा जप करून त्वरित, निश्चितपणे मुक्ती प्राप्त करेल.'

७०. अशा प्रकारे त्या भार्गवाला वर देऊन भक्तवत्सल असा महेश्वर शंकर तिथेच लिंगात अंतर्धान पावला.

७१. हे राजा, रामाने सुध्दा त्या श्रेष्ठ अशा क्षेत्राचा समुद्रातून उध्दार करून ते महोदय असे गोकर्ण क्षेत्र बघून त्याची प्रशंसा केली.

७२. (अस्मान्‌) महेंद्रशिखर पूर्वीप्रमाणे अबाधित राहिले. हे सर्व मी तुला सांगितले आहे. दुसरे काय ऐकू इच्छितोस?

७३. हे राजा, रामाने ज्याचा पुनरुध्दार केला अशा पापमालिकांचा नाश करणार्‍या गोकर्णाविषयीचे आख्यान जे भक्तियुक्त नरोत्तम ऐकतात (ऐकतील), ते दुसर्‍या कोणत्याही उपायाने अप्राप्य असलेले निर्वाण प्राप्त करतात (करतील.)

अध्याय १ ते २०