अध्याय १३ - प्लक्षद्वीपादिवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १३ - प्लक्षद्वीपादिवर्णनम्‌

१. हे कुरुश्रेष्ठा, लवण समुद्राने चक्राकार वेढलेल्या जंबुद्वीपाचे क्षेत्रफळ २ लाख योजने आहे.

२. हे राजा, लवण समुद्रात चार उपद्वीपे आहेत.सर्व रत्नांचा निधी असलेले हे विशाल द्वीप चंद्रद्वीप या नावाने प्रसिध्द आहे.

३. हे राजा, अनेक योजने परिमाण असलेला एक समुद्र त्याच्या मध्ये आहे. तो अत्यंत पुण्यवान, अतिशय आकर्षक व देवांकडून सेविला जाणार आहे.

४. लवण समुद्राच्या पश्चिमेला भद्र नावाचे दुसरे उपद्वीप आहे. पूर्वेला भद्राकर आहे, तर दक्षिणेला मलय आहे.

५. हे सुरश्रेष्ठा, ही दोन्ही उपद्वीपे १००० योजने विस्तारित आहेत. भद्रकराच्या शेवटी जी तीन द्वीपे आहेत, त्यांची नावे आता ऐक.

६. ऋषभ, धू्रक व प्रसिध्द असे दुंदुभी ही ती नावे होत. मलय द्वीप ??

१५. हे राजा, आग्रीध्राचा पुत्र बली हा इंद्रद्वीप द्वीपाचा अधिपती आहे. हे राजा, लवण समुद्राला वेढून विशाल असे प्लक्षद्वीप आहे.

१६. हे राजा, प्लक्षद्वीपाचा परीघ हा लवण समुद्राच्या दुप्पट आहे असे विद्वान मानतात.त्याचे ७ खंड आहेत व मेधातिथीचे ७ पुत्र त्यांचे अधिपती आहेत.

१७. त्या महाबलशाली पुत्र त्या प्लक्षद्वीपाचे सात खंडांत विभाजन करून त्यांचे रक्षण करतात. हे सामर्त्यशाली राजा, त्यांची नावे मी आता सांगतो.

१८. हे कुरुश्रेष्ठा त्यांची नावे - सुखोदय, शिशिर, शिलांग, क्षेक, रम्य, शांतनव व ध्रुव.

१९.-२०. ----- हे सुरश्रेष्ठा, त्यांची नावे सांगतो, ती तू ऐक.- गोद, चंद्रतीर्थ, सुनामा, दुंदुभी, वैभ्राजक, शारद व सोमक.

२१. हे पुत्रा, या रम्य अशा पर्वतीय प्रदेशांध्ये प्रजा सदैव देव गंधर्वांसह निवास करते.

२२. तेथील नगरे आकर्षक आहेत. तेथील लोक दिव्य सुखांचा उपभोग घेणारे असून दीर्घायुषी असतात. त्यांना आधी, व्याधी नसतात. ते नेहमी सुखीच असतात.

२३. त्या प्रदेशांध्ये समुद्रगामी अशा ७ नाच आहेत. त्यांची नावे आता सांगतो. त्यांचे श्रवणच पाप हरण करणारे असते.

२४. अनुतप्ता, शची, शिवा, धात्री, दिवा, सुकृती आणि महाभागा अशी सात नांची नावे मी तुला सांगितली आहेत.

२५. हे सुरोत्तमा, त्या खंडांध्ये काळ हा चार युगांध्ये विभागलेला नाही. तेथे सदैव त्रेतायुगाचाच काळ असतो.

२६. हे सुरश्रेष्ठा विभो, प्लक्षद्वीपापासून ते शाकद्वीपापर्यंतच्या प्रदेशांध्ये राहणार्‍या लोकांचे आयुर्मान १००० वर्षे असते.

२७. येथील प्रमुख पर्वत व ना यांविषयी तुला सांगून झाले आहे. त्यांध्ये जांभळाच्या झाडाच्या आकाराइतकाच आकार असलेला महान वृक्ष आहे.

२८. त्या वृक्षालाप्लक्ष वृक्ष असे नाव आहे. त्यावरून त्या द्वीपाला प्लक्षद्वीप असे नाव मिळाले आहे.

२९.-३१. त्याच्या सभोवार असलेल्या द्वीपाला शाल्मल द्वीप म्हणतात. तिथेही ७ देश आहेत. वपुष्मान्‌ या अधिपतीचे पुत्र या ७ प्रदेशांवर कायम अधिराज्य करतात. त्यांची नावे आता ऐक-लोहित, वैुत, हरित, श्वेत, सुप्रभ, जीमूत आणि सातवा मानस. हे पुत्रा, त्यांच्या सीमेवर ७ पर्वत आहेत.

३२.-३३. हे पुरुषश्रेष्ठा, त्यांची नावे क्रमाने सांगतो-कुमुद, चोतत, विशाल असा महिष, नुंक, ककुद्मान्‌, द्रोण व सातवा वलाह. हे राजा, तो वलाह पर्वत सुरोद नावाच्या समुद्राने वेढलेला आहे.

३४.-३७. हे राजा, तो विशाल सुरोद समुद्र कुशद्वीपाने वेढलेला आहे. त्यातही ७ द्वीपे आहेत. हे कुरुश्रेष्ठा विभो, ज्योतिष्मत्‌ राजाच्या मुलांचे त्यांच्यावर आधिपत्य आहे. त्यांची नावे ऐक-वेणू, प्रभांतर, उद्भिद, करलंबन, धृतिमान्‌, रम्य व मंडल. त्या सर्व द्वीपांवर मााणसे दितीच्या पुत्रांसह (दानवांसह) राहतात. हे कुरुश्रेष्ठा, ही माणसे निर्भय, निरहंकारी व सावध असतात. हे भारत, त्या द्वीपांध्ये ७ पर्वत आहेत.

३८.-३९. मंदर, विद्रु, विशाल असा कुमुद, पुष्पक, केतुान्‌, कूट आणि हेंत हे ७ पर्वत सीमेवर स्थित आहेत. हे राजा, तेथे ७ ना आहेत. त्यांची नावे आता सांगतो, ती तू ऐक.

४०. धूतपापा, शिवा, पवित्रा, सुरती, विुदंभा, मही व सातवी सुरसा.

४१. हे भारता, छोट्या नद्या व पर्वतांची गणनाच करायला नको. हे प्रभो, घृतांभ समुद्राने कुशद्वीपाला वेढले आहे.

४२. हे राजा, घृतांभ सागर सुध्दा क्रौंच द्वीपाने वेढलेला आहे. क्रौंच द्वीपाच्या अधिपतीचे पुत्रही ७ होते.

४३. त्या द्युतिमान्‌ नावाच्या अधिपतीने पृथ्वीचे ७ भाग केले. त्या राजाने ते वेगवेगळे खंड त्या पुत्रांना दिले.

४४.-४५. त्या राजाने खंडांची नावे आपल्या पुत्रांना नावे दिली. प्रवर, इषुक, प्रसिध्द असा आनन, कुशल, दुंदुभी, मनोनुग व तुंगभद्र हे ते खंड होत.

४६. हे राजेंद्र, त्या पर्वतामुळे ते मोठे खंड विभागले गेले आहेत. त्यांची नावे सांगतो, ती ऐक.

४७.-४९. क्रौंच, वामन, तिसरा अंधकारक, चवथा रत्नशैल, पाचवा पुंडरीक, देवसार व निद्रुषक हे सात खंड होत. याठिकाणी देव व गंधर्व निवास करतात. या रमणीय देशांधील वनराजी, पर्वतराजी आणि नांचे तट याठिकाणी देवगणांसह प्रजा संकटमुक्त होऊन राहतात. हे राजेंद्रा, तेथील नांचीही नावे आता ऐक.

५०. गौरी, कुमुद्वती, संध्या, रात्री, मनोनुगा, ख्याती व पुंडरीका या त्या देशातील ७ नद्या होत.

५१. हे राजेंद्रा, क्रौंचद्वीप हा दधिसागराने वेढलेला आहे. हा दधिसिंधू शाकद्वीपाने वेढलेला आहे.

५२. त्या भव्य, अतिविशाल अशा शाकद्वीपाच्या अधिपतीचे ७ पुत्र आहेत. त्यांची नावे हे राजा, तू ऐक.

५३. जलद, कुमार, सुकुमार, महीचक, सुरम्य, उत्तम आणि सातवा महाद्रु होत.

५४. हे कुरुश्रेष्ठ, त्या पुत्रांची नावे ७ खंडांवरून पडली आहेत. त्यांच्या सीमेवर खंडांचे विभाजन करणारे ७ पर्वत आहेत.

५५.-५७. उदय, जलधार, रैवतक, श्याम, चैत्रगिरी, अंबिकेय व सातवा केसरी हे ७ पर्वत त्यांच्या सीमेवर स्थित आहेत.तेथील ना महापुण्यशाली, पापहारक व पवित्र आहेत - सुकुमारी, कुमारी, नंदिनी, वेणुका, इक्षू, धेनुका व सातवी गभस्ती.

५८. हे महामते, त्या देशात इतर असंख्य छोट्या छोट्या ना आहेत. त्याचप्रमाणे शेकडोच नाही, तर हजारोंनी टेकड्‌या आहेत.

५९. तेथील सुखी लोक त्या नद्यांचे अमृतमय जल प्राशन करतात. हे नरशार्दूला, तेथे जन्मणारे लोक निरोगी असतात.

६०.-६४. हे राजेंद्र, शाकद्वीप हा क्षीरसागराने वेढलेला आहे. हे राजा, त्याचे मंथन करून, उत्तम देवांनी इतर देव व दैत्यांच्या साहाय्याने दही, अमृत आणि इतर वस्तू प्राप्त केल्या. रुद्राला चूडामणी व कालकूट विष मिळाले. भगवान विष्णूला कौस्तुभ व लक्ष्मी प्राप्त झाली. इंद्राला कल्पवृक्ष व ऐरावत हत्ती मिळाला. शांत झालेल्या देवांच्या गणांना उच्चे;श्रवा अश्व, पारिजात वृक्ष व अमृत मिळाले. त्याचबरोबर, हे महामते, त्यांना जय, पुष्टी, बल व अमरत्व लाभले. त्रैलोक्य ज्याला वंदन करते असा भगवान विष्णू त्या सागरात शयन करतो.

६५.-६६. हे पुत्रा, त्या क्षीरसागराला वेढून पुष्करेक्षण नावाचे द्वीप आहे. त्याचा अधिपती असलेल्या सवनाला दोन पुत्र आहेत. त्या द्वीपाचे दोन भाग गोलाकार असून त्यांची नावे महीध्र व धातुकी होत.

६७. गोलाकार अशा त्या दोघांच्या मध्ये सीमा होऊन राहिलेला एक पर्वत पसरलेला आहे. त्याचे नाव सुमानसोत्तर असून देव, गंधर्व तिथे रममाण होतात.

६८. त्याच्या शेवटी धातकीपालित नावाचे छोटे खंड आहे. हे महामते, त्याच्या बाहेरच्या बाजूला महाभीतक नावाचे खंड आहे.

६९. हे राजा, तिथे माणसांचे आयुष्य १३००० वर्षे असते. ते संकटमुक्त व निरामय आयुष्य जगतात.

७०. हे श्रेष्ठ राजा, त्या ठिकाणी ना वर्णभेद आहे ना कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये क्षीण होत नाहीत. तिथे कोणी अधम नाही, श्रेष्ठ नाही की मध्यम नाही.

७१.तिथे ईर्ष्या, असूया, भय, रोष, लोभ, कोप व मत्सर हे विकार नाहीत. येथील निरोगी लोक अप्सरांसमान असलेल्या स्त्रियांसमवेत रममाण होतात.

७२. तिथे ना महानद व पर्वत हजारोंच्या संख्येने आहेत. अमृतासमान फळे भक्षण करून तेथील लोकांचे मनोरथ पूर्ण होतात.

७३. फळे खाऊन, पाणी पिऊन नाचतात, हसतात व आनंदी राहतात. हे नरशार्दूला, ते विष्णूची स्तुती गातात. म्हणून त्यांना वैष्णव म्हटले जाते.

७४. हे राजा, त्या दोघांच्या सीमा बनून राहिलेल्या पर्वतावर चार दिग्पतींची चार नगरे आहेत. त्यांच्याविषयी ऐक.

७५.-७६. हे सुरश्रेष्ठा, पूर्व दिशेला सुरपती इंद्राची अमरावती, दक्षिणेला यमाची दिक्संयमिनी, पश्चिमेला वरुणाची भोगवती व उत्तरेला कुबेराची अलका नगरी आहे.

७७. हे पुष्करद्वीप मधुर जलाने वेढलेले आहे. हे कुरुश्रेष्ठा, सौवर्णकाने वेढलेले आहे.

७८. तेथील रमणीय असे भूप्रदेश सौवर्णी या नावाने प्रसिध्द आहेत. तेथे, झुडुपे, गवत, वृक्ष व सावली नाही.

७९. त्या वालुकामय प्रदेशांध्ये देवांची क्रीडाभूमी आहे. हे राजा, तिच्या भोवती दाट अंधकार पसरलेला आहे.

८०. हे राजेंद्रा, दीड कोटी योजने क्षेत्रफळ असलेल्या तिच्या चारही दिशांना चार पर्वत स्थित आहेत.

८१. वसुनामा, शंखपाद, हिरण्य, केतुमान्‌ ही सीमा भूमीच्या पूर्व आदी चार दिशांना असणार्‍या पर्वतांची नावे आहेत.

८२.-८३. हा श्रेष्ठ पर्वत १०००० योजने उंच असून त्याचा विस्तारही तेवढाच आहे. आता त्या भूमीच्या रुंदीविषयी ऐक. हे राजेंद्रा, ती भूमी ५० कोटी योजने रुंद आहे. हे राजा, पूर्वी सांगितलेल्या सागरांपेक्षा, हा सागर दुप्पट आहे.

८४. हे कुरुश्रेष्ठा राजा, प्लक्ष द्वीपापासून ते शाक आदी द्वीपांपर्यंतच्या द्वीपांध्ये असलेली द्वीपे ही पूर्वी सांगितलेल्या द्वीपांपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेली आहेत.

८५. तिथे आपापली कर्तव्यकर्मे करत चार वर्णांचे लोक रहात असत. या भूमीच्या तळाशी सात पाताळलोक आहेत असे म्हणतात.

८६.-८७. हे कुरुश्रेष्ठा, या भूमीच्या वर सात लोक आहेत. मानव, पशू, पक्षी, ह्नस्थावर, देव, दानव, गंधर्व, पिशाच, सरपटणारे प्राणी, राक्षस या सर्व भूतांचच्या भूमीला साधारण भूमी म्हटले आहे.

८८. हे राजा, यासारख्या सर्व रत्नांनी युक्त असलेल्या भूलोकासारखा दुसरा भूलोक नाही. त्याविषयी मी तुला सांगितले आहे. आता याहून अधिक काय ऐकू इच्छितोस?

अध्याय १ ते २०