अध्याय १२ - किंपुरुषादिवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १२ - किंपुरुषादिवर्णनम्‌

१. सूत म्हणाला- हे राजा, आता यापुढे तू किंपुरुष वर्षाचे वर्णन ऐक. तो उत्तम असा खंड ९००० योजनांनी परिमित आहे.

२.-३. तिथे पिंपळ वृक्षाच्या अत्यंत मधुर, अमृतासमान असलेल्या फळांचा उपभोग घेणारे, सोन्यासारखा तेजस्वी पीत कांती असलेले पुरुष अनेक वर्षे जगतात. त्यांना वार्धक्य येत नाही.

४.-५. हे सुता, हे सुरोत्तमा, आता हरिवर्षाबद्दल ऐक. तिथे, कुंद फूल, चंद्र व शंखासमान शुभ्र कांती असलेले, रेशमी वस्त्रे परिधान करणारे, आपत्तिमुक्त, निरोगी असे पुरुष आपल्या स्त्रियांसमवेत रममाण होतात.

६. उसाचा रस सेवन करणारे, देवसदृश असे ते महाबलशाली पुरुष वार्धक्यविहीन असून ६००० वर्षे जगतात.

७. हे भाग्यवंता, आता यानंतर, भद्राश्व खंडाबद्दल ऐक. मेरू पर्वताच्या पूर्व दिशेला माल्यवान नावाचा पर्वत आहे.

८.-९. अर्धचंद्राकृती आकार असलेला तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. हे श्रेष्ठ भरता, त्यापासून जो देश तयार झाला, त्याच्या भागाला भद्राश्व म्हणतात ज्याच्या पूर्व दिशेला सागर व्यापून आहे. हे भरतोत्तमा, तिथेही माणसांचे आयुर्मान अनेक वर्षं असते.

१०. हे सुरश्रेष्ठा, फळांचे सेवन करून तृप्त होणारे तेथील लोक दिव्य सौंदर्य असलेल्या स्त्रियांसह शांत निद्रा घेत रममाण होतात.

११. हे भारता, ते भद्राश्व सुध्दा ९००० योजने परिमित आहे. मेरूच्या पश्चिम दिशेला गंधमादन नावाचा पर्वत आहे.

१२. तोही अर्धचंद्रकअती असून दक्षिणोत्तर पसरलेला आहे. त्याच्या पचिमेला समुद्रापर्यंत एक विशाल पर्वत आहे.

१३. हे राजा, तरे पर्वत त्या खंडातील स्त्रियांना पायी चालत जाण्यासारखा नाही. मेरूच्या उत्तर दिशेला नील नावाचा महान पर्वत आहे.

१४. ज्याप्रमाणे निषध, तसा त्याप्रमाणे तो पूर्वपश्चिम पसरलेला आहे. त्यांच्यामध्ये मेरू उभा आहे, जसा पाण्याच्या आळ्यामध्ये वृक्ष असावा.

१५. हे राजा, कुंभाराच्या चाकाप्रमाणे (कुंभाराचे चाक जसे फिरतेत्याप्रमाणे) मेरूला प्रदक्षिणा घालून त्या चार पर्वतांच्या मध्ये इळावृत देश आहे.

१६. इळावृताचा तो भूप्रदेश मेरूपासून त्याच्या चारही दिशांना तयार झाला असून तो ९००० योजने व्याप्त आहे.

१७. हे पुत्रा, तेथील लोक जंबूफळाचे सेवन करून १३५०० वर्षांपर्यंत सुकाने जगतात.

१८. जांभळाचा रस प्राशन करून ते आपल्या तरुण स्त्रियांसमवेत रममाण होतात, जसे देव अप्सरांसमवेत रममाण होतात.

१९. कमळाच्या कांतीप्रमाणे वर्ण असलेले, नृत्य व गायनात कुशल असे ते लोक आधी, व्याधी व वृध्दत्वापासून मुक्त असतात.

२०. तिथे सूर्याची व चंद्राची किरणे प्रखर नसतात. सूर्यकांत मण्यांना चंद्राकडून तेज मिळते.

२१. हे राजा, चंद्रकांत मण्याचे रात्रीचे तेज हे उत्तरेकडील नीलाद्रिप्रमाणे अजर व अमर असते.

२२. हे पुत्रा, रम्यतेुळे त्या भागाला रमण असे नाव मिळाले. त्या ठिकाणीही माणसांचे आयुर्मान २००० हून अधिक आहे.

२३. वडाच्या झाडाच्या फळांवर उपजीविका करणारे ते शुभ्र वर्णाचे, सुवर्णाप्रमाणे कांती असलेले, संकटमुक्त व नीरोगी असतात.

२४. देव, सिध्द व मुनींमुळे ते ज्ञानी आणि सुशिक्षित होतात. हे राजा, श्वेत नावाचा महापर्वत त्या त्या पर्वतराजींनी सीमित झालेला आहे.

२५. हे राजा, पूर्वपश्चिम पसरलेला हा पर्वत समुद्रात अवगाहन करत आहे. आता यापुढे हिरण्मय क्षेत्राचे वर्णन ऐक.

२६. तो हिरण्मय देश सर्व भोगांनी युक्त आहे. देवतागर त्याला देवलोकापेक्षाही श्रेष्ठ समजतात.

२७.-२८. कुडाची पिकलेली, अमृतासमान असलेली फळे सेवन करणारे, गायींचे मधुर व गुणकारी दूध प्राशन करणारे, रेशमी वस्त्र परिधान करणारे असे ते आपल्या प्रियांसमवेत रममाण होत १३००० वर्षे सुखाने आयुष्य जगतात.

२९.- ३०. तेथील स्त्रीपुरुषांची कांती अग्रीप्रमाणे तेजस्वी आहे. तेक्षील रम्य व सुगंधित वनांध्ये ते स्त्रियांसमवेत आकर्षक क्रीडाकरत रममाण होतात व दुसर्‍यांना आनंद देतात. त्याच्या सीमेवर त्रिशृंग नावाचा पर्वत आहे जे ज्ञानी लोकांचे निवासस्थान आहे.

३१. पूर्वेला पसरलेला हा सुध्दा समुद्रात अवगाहन करत आहे. कुरूंच्या नावावरून त्या नंतरचे खंड हे कुरू खंड म्हणून ओळखले जाते.

३२. हे कुरुश्रेष्ठा राजा, उत्तरेकडील त्या कुरू नावाच्या खंडात माणसे १४००० वर्षे जगतात.

३३. त्याच्या दक्षिणेला केतुाल नावाचा खंड आहे. केतुाल नावाचा तरुण व भावंडांवर प्रे करणारा राजा होऊन गेला.

३४. हे प्रभो, त्याच्या नावावरून त्या खंडाला केतुमाल असे म्हणतात. हे महाभाग्यशाली राजा, त्याचा भाग समुद्रापर्यंत पसरलेला आहे असे म्हटले जाते.

३५. हे सुरश्रेठा, तेथील निळसर कांतीचे पुरुष निळसर कांती असलेल्या स्त्रियांबरोबर सदैव सुखाचा आस्वाद घेत रममाण होतात.

३६. तिथेही माणसे दुसर्‍या माणसांचे भक्षण करत अनेक वर्षे जगतात. हे राजा, मेरूच्या दक्षिणेला निषध नावाचा पर्वत आहे.

३७. वैभवशाली असा हा महागिरी पूर्व पश्चिमेला समुद्रापर्यंत पसरलेला आहे. या पर्वतामुळे खंडांना सीमा प्राप्त झाली आहे. म्हणून याला पर्वतांमध्ये उगम मानले आहे.

३८.-३९. हे महान राजा, नील पर्वतांविेयी जे आता मी थोडक्यात सांगतो, ते एक. हिमवान्‌, हेकूट, निषध, माल्यवान्‌, गंधमादन, नील व शिखरयुक्त पर्वतांध्ये श्रेष्ठ असा श्वेत व त्रिशृंग हे ते आठ नील पर्वत आहेत.

४०.-४१. ज्याप्रमाणे माधवाच्या नाभीमध्ये कमळ होते, त्याप्रमाणे या द्वीपाच्या मध्यभागी महान मेरू शोभून दिसत आहे.हे राजेंद्रा, तिथे स्वर्ग तसेच देवांची निवासस्थाने आहेत.

४२. हे राजा, तिथे देव, गंधर्व, अप्सरा, सिध्द, ब्रह्मर्षी व सत्कअत्य करणारे लोक राहतात.

४३. हे सुरश्रेष्ठा, देव आणि ऋषींची इतरत्र असलेली निवासस्थाने अनित्य समजली जातात. हे राजा, अशाप्रकारे, जंबूद्वीपाविषयी मी तुला थोडक्यात सांगितले आहे.

४४. हे भरतश्रेष्ठा, १ लाख योजने परिमित असलेले जंबूद्वीप हे सर्व द्वीपांध्ये महान पुण्यशाली असून त्यामध्येही भारत वर्ष हे सर्वात अधिक पुण्यशाली आहे.

४५. हे सुरश्रेष्ठा पुत्रा, भारतातही तीन क्षेत्रे पूजनीय आहेत. ती म्हणजे गोकर्ण, काशी व रामेश्वर. आता यापुढे लावण (क्षारयुक्त) समुद्राविषयी सांगतो, ते ऐक.

अध्याय १ ते २०