अध्याय ११ - जम्बुद्वीपादि-द्वीपान्तर-वर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ११ - जम्बुद्वीपादि-द्वीपान्तर-वर्णनम्‌

१. शंकराने म्हटले- स्वायंभुव मनूचा स्वत;चा पुत्र अतिशय पराक्रमी होता. त्याचे नाव प्रियव्रत असून तो सप्त द्वीपांचा अधिपती होता.

२.-३. त्याचे चार पुत्र ब्रह्मवादी होऊन गेले. हे सुरोत्तमा, त्यांपैकी अग्रिशीर्ष, अग्रिबाहू, महातपस्वी असा किमेधा हे तिघे असून, मुक्तीची इच्छा करणारा चवथा पुरू नावाचा पुत्र सप्त द्वीपांच्या वैभवाचा त्याग करून गोकर्णाला गेला.

४. तिथे शतशृंग पर्वताच्या शिखरावर आश्रम बनवून जितेंद्रिय व निराहार बनून त्याने दीर्घ काळ तपश्चर्या केली.

५.-६. हे राजा, महातेजस्वी असा आग्रीध्र, मेधातिथी, ज्योतिष्मान्‌, ुतिमान्‌, भव्य, वपुष्मान्‌ आणि सवन हे त्याचे उत्तम पुरुष असे सात पुत्र होऊन गेले. आपण दिलेल्या सप्त द्वीपांची धुरा वहावी असे पित्याने त्या पुत्रांना सांगितले.

७. हे पुत्रा, आग्रीध्राचे महान असे जंबू द्वीप होते. त्या थोर राजर्षीचे नऊ पुत्र होऊन गेले.

८.-९. हे पुत्रा, त्यांची नावे मी आता सांगतो ती एकाग्रचित्ताने ऐक. हे पुरुषोत्तमा, नाभी, किंपुरुष, हरी, इळावृत, हिरण्य, मणय, कुरू, भद्राश्व आणि केतुाल असे हे जंबू द्वीपाचे अधिपती होते.

१०. पुत्रांवर प्रे करणार्‍या त्या श्रेष्ठ महाराजाने जंबू द्वीपाचे नऊ प्रकारे विभाजन करून त्या पुत्रांना दिले.

११. हे परीक्षिता, त्या जंबू द्वीपाचा मोठा भाग नाभीचा होता. त्याचा वृषध्द नावाचा पुत्र थोर व महापराक्रमी होता.

१२. हे कुरुनंदना, त्याचा भरत हा महातेजस्वी पुत्र होता. त्याच्यावरून या खंडाला भारत खंड असे नाव पडले.

१३. हे महातेजस्वी परीक्षिता, किंपुरुष व इतर पुत्रांचे खंड प्राच्या नावाने ओळखले जातात. त्याच्या उत्तरेला समुद्र असून दक्षिणेला हिमालय पर्वत आहे.

१४. त्या भारत नावाच्या खंडातील संततीला भारती म्हणतात. तो चहू बाजूंनी ९००० योजने पसरलेला आहे.

१५.-१६. ही कर्मभूी स्वर्ग व मुक्तिप्रत घेऊन जाते. हे भरतश्रेष्ठा, तिथे महेंद्र, मलय, सह्य, शुक्तिमान्‌, वृषपर्वत, विन्ध्य, पारियात्र, हे सात कुलपर्वत आहेत. येथे स्वर्ग व मुक्ती प्राप्त होते.

१७. येथून भोगवादी असे पापी (मात्र) नरकाला जातात. म्हणून हे पुत्रा, इतर खंडांध्ये कर्म सिध्द होत नाही.

१८. शुभ कर्म अशुभ कर्म याविषयी विचार करण्याची गरज नाही. म्हणून या जगात ब्रह्मवादी लोक याला कर्मभूी असे म्हणतात.

१९. भारत वर्षाचे नऊ विभाग आता ऐक. हे राजा, सगराच्या पुत्रांकडून खंडित झालेली ही नऊ द्वीपे आहेत.

२०. हे पुत्रा, सागराने वेढलेली सप्त द्वीपे आहेत. त्यांची नावे सांगतो. ती तू ऐक.

२१.-२२. नागद्वीप, सौम्य, वारुण, कुमारिक, इंद्रद्वीप, कशेरू, ताम्रद्वीप ही ती सात द्वीपे व गांधर्व आणि गभस्ती हे सर्व हजारो योजने पसरलेले आहेत. हे कुमारिकाद्वीप म्हणजे बिंदुसाराची कन्या होय. ??

२३. शेती इत्यादी फलांचा उपभोग घेणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्णाश्रम येथे प्रचलित आहेत.

२४. हे श्रेठ देवा, या भरतवर्षात दान दिलेले व हवन केलेले सर्व काही पितर देवतांसह उपभोगतात, अन्यत्र नाही. हे तू पे समज.

२५.-२६. अंगद्वीप, यवद्वीप, मलयद्वीप, शंख, कुमुद, वाराह अशी भरतवर्षाची उपद्वीपे मानली आहेत. मलय उपद्वीपात मलय नावाचा अत्यंत उत्तुंग पर्वत आहे.

२७. हे सुरश्रेष्ठा त्याच्या शिखरावर लंका नावाची महानगरी आहे. तिथे चार युगे असून भिन्न भिन्न स्वभाव असलेले लोक राहतात.

२८. हे कुरुवंशीय भरतश्रेष्ठा, येथेच आयुर्मान, कर्म, या आणि पराक्रम हे युगांच्या भेदांनुसार भिन्न भिन्न असतात, अन्यत्र नाही.

२९.-३०. हे राजा, येथे गंगा, सरस्वती, सिंधू, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी, निर्मल जलयुक्त अशी वेत्रा, विपाशा, शतद्रू, विशिखा, ताम्रपर्णिका या अतिशय पवित्र ना आहेत.

३१. असे म्हणतात की देव अशी गीते गातात की ते पुरुष धन्य होत जे स्वर्ग व अपवर्ग या स्थानांप्रत जाणारा मार्ग होणार्‍या या भारतभूीत जन्म घेतात व देवत्व प्राप्त करतात.

३२. या कर्मभूीत परत परत येण्याचा प्रयास करतात. कर्माच्या ठिकाणी संकल्प न करता आणि त्याचे फळ परमात्मा विष्णूच्या ठिकाणी अर्पण करून क्लेशापासून मुक्ती मिळवतात व व विशुध्द होऊन मोक्षाकडे वाटचाल करतात.

अध्याय १ ते २०