अध्याय १० - जम्बुद्वीपवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय १० - जम्बुद्वीपवर्णनम्

१. कुमाराने म्हटले- प्रियव्रत अशा मला पुत्र, पौत्र आदी संततीविषयी सांगावे. हे विभो, भूलोकाच्या समस्त मंडलाविषयी मी जाणू इच्छितो.

२. स्वयंभूने अर्थात ब्रह्मदेवाने किती सागर, द्वीपे (बेटे), देश, पर्वत, अरण्ये, ना जशा निर्माण केल्या, तशा सांगा.

३. हे निष्पाप तात, आदित्यादी ग्रह, पाताळ यांविषयी यथावत्‌ सर्व काही सांगावे.

४. हे महाबुध्दिमान तात, देवादिकांच्या प्रशंसनीय कृत्यांविषयी सांगावे.--शंकराने म्हटले- हे पुत्रा, मी तुला थोडक्यात सांगत असताना तू एकचित्ताने ऐक.

५.-७. १००० देशांबद्दल विस्ताराने सांगणे अशक्य आहे. हे सुरोत्तमा, जंबू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाकद्वीप, पुष्कर ही ७ द्वीपे मानली आहेत. हे सुरसत्तम, खारट, गोड, सुरारस, विष, दही, दूध व जलाने युक्त असलेल्या ७ समुद्रांनी ही द्वीपे आच्छादलेली आहेत.-त्यांच्या मध्यभागी जंबूद्वीप आहे आणि त्याच्या मध्यभागी मेरू पर्वत आहे.

८. तो मेरू एक लक्ष योजने लांब, चार कोण असलेला महान गिरी आहे. तो पृथ्वीपासून ८४००० योजने उंचावर आहे.

९. तो पृथ्वीच्या १६००० योजने आत आहे. त्याचा परीघ १६००० योजने असून माथ्यावर त्याचा विस्तार ३२००० योजने आहे.

१०. त्या मेरू पर्वताचा आकार भूंडलरूप कमळाच्या कोशाप्रमाणे असून तो जमिनीवर लंबगोलाकृती आहे.-हिमालय, हेकूट आणि निषध हे पर्वत मेरू पर्वताच्या दक्षिणेला आहेत.

११. नीलश्वेत, त्रिशृंग हे उत्तरेकडील प्रदेशांधील पर्वत आहेत. माल्यवान्‌ हा पर्वत पूर्वेला असून पश्चिमेला केतुाल पर्वत आहे.

१२. हे राजा, मेरू पर्वताच्या दक्षिणेला प्रथम भारतवर्ष, त्यानंतर किंपुरुष व त्यानंतर हरिवर्ष आहे.

१३. मेरू पर्वताच्या उत्तरेला सुंदर व सुवर्णय असे उत्तर कुरू देश आहेत. तर पूर्वेला भद्राश्व देश आहे.

१४. पश्चिमेला केतुाल देशाने मेरूला वेढलेले आहे. हे राजेंद्रा, या सर्वांचे क्षेत्रफळ ९००० योजने आहे.

१५. त्यांच्या मधोध इलावृत्त नावाचा दहावा देश आहे. आणि त्याच्यामध्ये अचल, सुवर्णय असा मेरू पर्वत स्थित आहे.

१६. हे राजा, मेरूच्या चारही दिशांना ९००० योजने विस्तारित असा हा इलावृत्त देश आहे व मेरूच्या सभोवती ४ पर्वत (४ स्तंभांसमान आधारभूत) आहेत.

१७. त्यांपैकी विष्कंभ पर्वतराजी ही १०००० योजने उंच आहे. चारही दिशांना अरण्ये व सरोवरांनी तसेच बकुळ वृक्षांनी युक्त अशी ही पर्वतराजी आहे.

१८. पूर्वेला मंदर, तर दक्षिणेला गंधमादन आहे. पश्चिमेच्या मागच्या बाजूला विपुल तर उत्तरेला सुपार्श्व पर्वत आहे.

१९.-२०. गंधमादन पर्वताच्या माथ्यावर दिव्य आणि विशाल असा जांभूळ वृक्ष आहे. तर इतर पर्वतांच्या माथ्यावर पिंपळ व वट, आणि फळाफुलांनी बहरलेला कदंब वृक्ष आहे. या चारही वृक्षांचा विस्तार ११००० योजने आहे.

२१. हे वत्सा, जंबू द्वीपाला जंबू हे नाव पडले. त्यामागे असे कारण आहे की या वृक्षाचे एकेक फळ महान गजाच्या आकाराएवढे आहे.

२२.-२३. पर्वताच्या पृष्ठभागावर सर्व बाजूंनी ही फळे गळून पडतात. हे पुत्रा, जांभूळ फळाच्या रसामुळे जंबू नावाची दिव्य नदी तयार होते. तेथील रहिवासी तिचे पाणी प्राशन करतात. तिच्या केवळ रसस्पर्शानेच पृथ्वी सुवर्णय होते.

२४. हे सुरोत्तमा, तिच्या रसाचे केवळ सेवन केल्याने माणसांना घाम येत नाही, दुर्गंधी येत नाही, वृध्दत्व येत नाही आणि इंद्रियांचा क्षयही होत नाही.

२५. हे सुता, तेथील लोक शरीराने तरुणच राहतात. ती जंबू नदी मेरूला प्रदक्षिणा घालून समुद्राकडे जाते.

२६.-२७. जे केतुाल व भद्राश्व पर्वत आहेत, त्याच्या मध्ये इळावृत देश आहे. तिच्या पूर्वेला चैत्ररथ, दत्रक्षणेला नंदन, पश्चिमेला विभ्राजक अैाणि उत्तरेला सावित्र अशी ४ वने आहेत.-पर्वतश्रेष्ठ अशा मंदरावर अरुणोद नावाचे दिव्य सरोवर आहे.

२८. गंधमादन पर्वताच्या दक्षिणेला मानस सरोवर आहे. मेरू पर्वताच्या पश्चिमेला असलेल्या विपुल पर्वतावर असलेल्या सरोवराला शीतोद असे नाव आहे.

२९. सुपार्श्व पर्वतावर महाभद्र नावाचे सरोवर असून ते पुष्कळ कमळांनी युक्त असते.हे सत्तमा, ही चारही सरोवरे देवांच्या उपभोगासाठी योग्य आहेत.

३०. हे पुत्रा, मेरूच्या चारही दिशांना पुष्कळ बकुळ वृक्षांनी युक्त, उंच, दिव्य पर्वत आहेत. हे पुत्रा, त्यांविषयी ऐक.

३१. तिथे ७०००० योजने क्षेत्रफळ असलेले इंद्रादी दिक्पालांचे नगर-वसाहत आहे.

३२. हे सुरश्रेष्ठ, इंद्राची ही अमरावती आठ दिशांध्ये पसरलेली आहे. खालच्या बाजूला अग्रीची तेजोवती नगरी आहे. तिला संयमिनी असेही म्हणतात.

३३. राक्षसांच्या अधिपतीची कृष्णा नावाची नगरी प्रसिध्द आहे. तर महात्मा वरुणाची भोगवती नावाची नगरी आहे.

३४. महामती वायूची गंधवती नावाची नगरी आहे, कुबेराची अलका नावाची नगरी आहे आणि उमापती शिवाची कैलास नगरी होय.

३५. तिच्या पृष्ठभागावर महात्मा ब्रह्मदेवाची दिव्य अशी सभा आहे. हे राजा, जिला देवांनी पूजिली आहे व जी रम्य आहे, तिचे मनोन्मना असे नाव आहे.

३६. हे पुत्रा, सर्व प्रणिमात्रांना अगम्य असे ब्रह्मदेवाचे जे वसतिस्थान आहे, त्याच्या ईशान्येला शंकराची दिव्य अशी राजसभा आहे.

३७. तिचे ज्योतिष्मती असे नाव असून तिला रुद्रलोक असेही म्हणतात.-पूर्वी, त्या सभेत पडलेली गंगा तीन मार्गांनी वाहू लागली.

३८. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून अनिंद्य अशी ती उत्पन्न झाली व मग महात्मा विेष्णूच्या चरणकमलापाशी येऊन पोहोचली.

३९.-४१. स्वतःच्या पितरांच्या तर्पणासाठी, भगीरथाने केलेल्या प्रयत्नामुळे ती मोगर्‍याच्या फुलांच्या माळेप्रमाणे रुद्राच्या जटांध्ये जाऊन बसली. त्यानंतर, ब्रह्मदेवाच्या सभेत, ती रुद्राच्या जटांधून प्रकट झाली. महात्मा ब्रह्मदेवाच्या सभेला प्रदक्षिणा घालून, स्वतःचे चार भागांध्ये विभाजन करून ती महानदी कोसळली आणि विष्कंभ पर्वताच्या शिखरावर धारा होऊन बाहेर पडली.

४२. तिच्या चार भागांना/प्रवाहांना ऋषींनी सीता, अलकनंदा, सुभद्रा आणि भद्रसोमा अशी नावे दिली.

४३. पूर्व दिशेने जाऊन, त्या विष्कंभ पर्वताला अनेक प्रकारे भेदून ती महाभागा भद्राश्वाला वळसा घालून समुद्राला जाऊन मिळाली.

४४. हे राजा, त्याचप्रमाणे, मेरू पर्वताच्या दक्षिणेकडून निघून अलकनंदा अनेक पर्वतांना भेदून समुद्राला मिळाली आहे.

४५.-४८. हे राजेंद्रा, सुभद्रा सुध्दा सर्व पर्वतांना ओलांडून, पश्चिमेकडील केतुाल नावाच्या देशात जाऊन पुढे तात्काळ सर्व बेटांना ओलांडून तिने सागरांना भरून टाकले.हे सभ्य राजा, भद्रसोमा सुध्दा उत्तर दिशेने जाऊन, मोठमोठ्या पर्वतांना ओलांडून, समुद्राला जाऊन मिळाली. काळसर निळ्या अशा निषधपर्वतराजींमध्ये पसरलेल्या माल्यवान्‌ व गंधमादन या पर्वतांच्या मध्ये कळीच्या आकाराचा मेरू पर्वत तसेच भारत, केतुाल, भद्राश्व व कुरव हे देश आहेत.

४९.

५०.-५४. वनराजींमध्ये ८० योजनांपर्यंत पसरलेले मेरूच्या चारही दिशांना जे केसर नावाचे पर्वत सांगितलेले आहेत, त्यांच्यामधील ज्या द्रोणी आहेत, त्यांध्ये सिध्दचारण वास करतात. त्या द्रोण्यांध्ये लक्ष्मी, विष्णू, अग्री, सूर्यादी देव सुरम्य वने व नगरे आहेत. हे राजेंद्रा, पर्वतंच्या द्रोणींमधील वनांध्ये देव, गंधर्व, यक्ष, राक्षस, किन्नर अहर्निश क्रीडा करतात. हे राजा, यांना मी स्वर्गात राहणार्‍या धार्मिक देवादिकांची निवासस्थाने म्हटले आहे.

५५. शेकडों जन्म घेऊन सुध्दा पापी लोक तिथे जाऊ शकत नाहीत.-- हे राजा, भद्राश्व पर्वतावर अश्वाचे शिर असलेला विष्णू (हयग्रीव) राहतो.

५६. केतुाल पर्वतावर वराहरूप धारण केलेला विष्णू राहतो, तर भारतवर्षात कूर्मरूप धारण केलेला विष्णू राहतो. मत्स्यरूप धारण करणारा गोविंद जनार्दन कुरव देशात राहतो.

५७. तोच भगवान हरी सर्वत्र विश्वरूपाने स्थित आहे. तो भगवान पुरुषोत्तम सर्व प्राणिमात्रांचा आधार आहे.

५८. हे परीक्षिता, जे किंपुरुष इत्यादी ८ देश आहेत, त्यांध्ये शोक, कष्ट, वृध्दत्व, व्याधी इत्यादी असत नाहीत.

५९. येथील प्रजा निरोगी, निर्भय, सर्वदुःखविरहित तसेच १००००-१२००० वर्षांपर्यंत दीर्घायुषी असते.

६०. त्यांध्ये देव अस्वच्छ, गढूळ पाण्याचा वर्षाव करत नाहीत. हे सुरोत्तमा, तिथे कृत, त्रेता आदी युगे नसतात.

६१. त्या सर्वच देशांध्ये सात सात कुलपर्वत आहेत. त्यांच्यापासून निघालेल्या शेकडों नांना लोकमाता म्हणतात.

६२.- हे राजा, महाना, ना, पर्वतशिखरे, पवित्र क्षेत्रे, विमल सरोवरे यांच्यामुळे आग्रीध्राची मुले सनाथ व महान झाली.

६३. हे सुरेशा, देव, ऋषी, गंधर्व, मानव, यक्ष हे सर्व जिथे आराधना करतात, लोकांच्या पुण्याला पात्र असलेले असे हे जंबू नावाचे बेट लोकांना पुण्याईनेच मिळते.

६४. जो या अतिशय परम पवित्र व पुण्यकारक अध्यायाचे पठण आणि श्रवण करेल, तो या पृथ्वीतलावर सर्व सुखांचा उपभोग घेऊन, सर्वच देवांनाही सेवनीय अशा शिवलोकाला जाईल.

अध्याय १ ते २०