अध्याय ०९ - सिध्दि-सिध्द-वर्णन्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ९ - सिध्दि-सिध्द-वर्णन्‌

१. शंकराने म्हटले- भूमीला वर दिल्यावर, त्रिभुवनांना बघितल्यानंतर, पूर्वी ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे कल्पाच्या शेवटी मला राग आला.

२.-३. त्या प्रकृतीशी संयुक्त होऊन, हे शिखिवाहना (स्कंदा), गोकर्णापासून एका बाणाच्या अंतरावर, ईशान्य दिशेला पवित्र ठिकाणी सर्व प्रजेला जाळण्याच्या इच्छेने क्रोधाने खवळून मी उभा राहिलो (आणि) हे चराचर त्रैलोक्य मी नष्ट करीन, असा मनाशी निश्चय केला.

४. हे पुत्रा, त्यानंतर मी उग्र शस्त्रे धारण केलेले, भयंकर, प्रचंड, तसेच महापराक्रमी, नानाविध आकाराचे प्राणिमात्र मी निर्माण केले.

५. हे पुत्रा, माझ्याशी पराक्रमात तुल्यबळ, अनेक अलंकारांनी विभूषित असे ७ कोटी महापराक्री गण मी एका क्षणात निर्माण केले.

६.-७.त्रिशूळ, बाण धारण केलेले, खड्‌ग व शक्तीने युक्त असे ते सर्व श्रेष्ठ गण जन्मताक्षणीच आपले हात जोडून मला नमस्कार करून म्हणाले, ‘तू आम्हा सर्वांना का निर्माण केले आहेस? आम्हाला आज्ञा दे. तू सांगितल्याप्रमाणे आम्ही करू.'

८.-११. असे भूतनाथांनी म्हटले असता, संतप्त झालेल्या रुद्राने त्यांना म्हटले, ‘ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या स्थावर व जंगम लोकांना जाळून तुम्ही माझ्याकडे परत या.' असा त्याने त्या गणांना आदेश दिला. त्यावेळी हा लोकांना लवकरच नष्य करणार आहे, असे जाणून विष्णू तात्काळ गोकर्णक्षेत्री येऊन मला म्हणाला, ‘हे शंभो, ब्रह्मदेवाने जो (सृष्टी निर्माण करण्याचा) अपराध केला आहे, त्याला आज क्षमा करा. हे शंकरा, आता, संहार करणे उचित नाही. हे परमेश्वरा, शेवटी संहारकर्ता तूच आहेस.'

१२.-१४. असे विष्णूने म्हटलेले ऐकून, ज्याचा क्रोध शांत झाला आहे, अशा कृपाळू शंकराने त्या विष्णूला म्हटले, ‘हे जनार्दना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे,ज्याप्रमाणे पूर्वी जे लोक निर्माण केले होतेस, ते तसेच राहोत.' असे विष्णूला म्हटल्यावर शंकराने भूतेशांना म्हटले, ‘कारण, संहार करण्याच्या कामी मी तुम्हाला निर्माण केले आहे, त्यामुळे हे पुत्रांनो, या जगात तुम्ही प्रथम या नावाने प्रसिध्द व्हाल.

१५.-१६. माझ्या आज्ञेचे पालन करणारे तुम्ही माझ्याजवळ रहा.' असा गणांना आदेश देऊन, परत जायला निघालेल्या विष्णूला मी म्हटले,ङङ्ग लोकांना दग्ध करण्याच्या इच्छेने मी जेव्हापासून जिथे राहिलो, तेव्हापासून, त्या ठिकाणाला रुद्रभूी असे म्हटले जाईल. तिथे मृत्यूनंतर दहन केले असता, माणसांना मुक्ती मिळेल.

१७. हे विष्णू, मी प्रकृती (पार्वतीसह) व गणांसह येथे राहतो.' असे शंभूने म्हटले असता, ‘ठीक आहे' असे म्हणून विष्णू स्वर्गलोकाला गेला.

सूत म्हणाला-

१८. गोकर्णक्षेत्री सदैव वास्तव्य करावे, मुक्तिमंडपात मरण यावे, आणि रुद्रभूीवर दहन व्हावे अशी विद्वान लोक सुध्दा इच्छा करतात.

१९.-२१. हे पुत्रा,तेव्हा भविेष्यातील कार्यबाहुल्याचा विचार करून, स्वतःची प्रतिज्ञा व्यर्थ होऊ नये, अशा विचाराने बेचैन झालेल्या मी ब्रह्मादी स्थावर, अणुमात्र यांमध्ये तसेच जीवांध्ये जे व्यापून असते, ते सत्त्व आवरून धरून, उत्तम असा सुवर्णृग निर्माण केला. नारायण देवाशिवाय खचितच कोणालाही ही गोष्ट माहीत नाही.

२२. हे पुत्रा, पार्षदांसह त्या मृगाला घेऊन मी कैलास पर्वतावर गेलो आणि त्यानंतर यथेच्छ त्याच्याशी क्रीडा करत राहिलो.

२३.-२४. हे सर्व मी तुला सांगितले. आणखी तू काय ऐकू इच्छितोस? कुमार म्हणाला,ङङ्ग तुच्या मुखकमलातून गोकर्ण क्षेत्राच्या जन्माविषयी आरंभापासून ऐकूनही माझे समाधान झाले नाही. तेव्हा तुम्ही पुन्हा सांगावे. त्या क्षेत्रात अमर गुरूंच्या सिध्दांविषयी मला सांगावे.

२५.-२७. सिध्दीचे लक्षण आणि सिध्दांचे चरित्रही मला सांगावे.' शंकराने म्हटले- हे पुत्रा, ऐक. मी सांगतो, ‘माझ्या क्षेत्री, जो बुध्दिमान सिध्द माझे स्मरण करत, इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना स्वतःमध्ये आवरून धरतो, काम व क्रोधापसून विमुक्त होतो, जो नि;संग आणि संशयमुक्त होतो, जो द्वंद्वातीत होतो, तसेच निरहंकारी होतो, माझे यजन करतो, मत्परायण होतो, तो पुनर्जन्मापासून होऊन माझ्याकडेच येतो.

२८. माझ्याकडे आल्यावर तो परत जात नाही. येथे आल्यावर शोक करत नाही. हे पुत्रा, तो स्वतःमध्येच सर्व जग स्थित आहे, असे ज्ञानाने जाणतो.

२९. जो जेव्हा असे मानतो की मी ‘एकमेवाद्वितीय' आहे, तेव्हा तो सिध्द पुरुष ती सिध्दी जाणतो.

३०.-३१. हे सुरश्रेष्ठा, इंद्रियांकडे आकर्षित होणार्‍या मानवांना तसेच अनेक जन्म घेऊनही इंद्रियांकडे आकृष्ट झाल्याने माझ्याकडे आकर्षित न होणार्‍या मानवांना (निर्वाण) मिळणे अशक्य आहे. त्यामुळे, निःसंगचित्त, निर्द्वंद्व व निरामय होऊन शुध्द, बुध्द, शिव व शांत असे निर्वाण म्हणजेच गती सिध्द मिळवतो.

३२. त्या सिध्दीला सात्त्विकी सिध्दी म्हणतात, की जिची सज्जनही इच्छा करतात. हे पुत्रा, दुसर्‍या राजसी सिध्दीविषयी मी तुला आता सांगतो, ते ऐक.

३३.-३५. स्वर्ग व मोक्ष यांचा मागोवा घेणार्‍या, देवत्वाची इच्छा करणार्‍या, अणिमादी महासिध्दी प्राप्त करू इच्छिणार्‍या,किंवा गंधर्वत्व मिळवू इच्छिणार्‍या, तसेच यक्षसिध्दी किंवा स्वर्लोकाची वासना बाळगणार्‍या इतरांकडून जे जे इच्छिले असते, ते ते या सिध्दीने मिळते, इतर दान, हो, जप, चांगल्या ठिकाणी मरण येणे, विविध इच्छांची पूर्ती तसेच पवित्र तीर्थांध्ये स्नान करणे यांनी मिळत नाही.

३६. पुनर्जन्म हे लक्षण असलेल्या त्या सिध्दीला राजसी सिध्दी म्हणतात. काही काळाने परत जन्म घेऊन उध अशा विष्णूपदाला राजसी सिध्दी मिळवलेले जातात.

३७.-४३. अज्ञान हे जिचे लक्षण आहे अशा तामसी सिध्दीविषयी आता ऐक. हे शरीरच सर्व काही आहे, दुसरे काहीही नाही, असा विचार करणारा, सकाळी उठल्यावर काही दान न करणारा, यथोचित यज्ञयाग न करणारा, दिलेच पाहिजे म्हणून केवळ जबरदस्तीने देणारा, श्रुतिस्मृतीनी सांगितलेले सोडून देणारा, गुरूचेही न ऐकणारा, १८ पुराणांनी सांगितलेल्या धर्माचा निंदापूर्वक त्याग करणारा, धर्मज्ञ असूनही स्वेच्छेने, कुटिल युक्तींनी अधर्म करणारा, शास्त्रांचे अनुकरण न करणारा, अनाचाराने देणारा व यजन करणारा असा तो मानव अज्ञान हे जिचे लक्षण आहे अशी तामसी सिध्दी मिळवतो. पशु, मृग, पक्षी, सरपटणारे प्राणी अशा नावांनी प्रसिध्द असलेले, तामसी व मूर्ख असे स्थावर होतात. दारुण अशा अज्ञानरूपी अंधारात गढून गेलेले ते काहीही जारत नाहीत. चंद्र ज्याप्रमाणे भ्रण करतो, तसे ते हे पुत्रा, अनेक अशा तिर्यक्‌ योनींमध्ये परत परत फिरत राहतात. शास्त्रांचे अनुकरण न करणारे असे ते दीर्घ काळ या भवसागरात राहतात.

४४. अत्यंत बुध्दिमान लोक आचार्याला सिध्दीचे प्रथम साधन मानतात. शिष्यांचे कल्याण करण्याच्या इच्छेने मी आचार्यरूपात राहतो.

४५. मला आचार्य म्हणून जाण. विष्णूला आचार्य म्हणतात. तसेच पुराणांचा अर्थ सांगण्यात पारंगत असा प्रत्यक्ष ब्रह्माही आचार्य होय.

४६. हे पुत्रा, सिध्दीप्राप्तीच्या चार द्वारांविषयी माझ्याकडून ऐक. ‘मानव धर्म' हेच पुराण असून आचार्य हे तीर्थ होय.

४७. सर्व क्षेत्रांमध्ये गोकर्ण हे अतिशय उत्तम व पवित्र मानले आहे. तेव्हा, माणसांना सिध्दी प्राप्त करून देणार्‍या गोकर्णक्षेत्री तात्काळ जा.

४८. हे सवम, सर्व देवांना व ऋषींनाही रहस्य असलेल्या श्रेष्ठ सिध्दीची इच्छा करणारा असा तू बाबा रे, आत्मरूपातच स्थिर रहा.

४९. मी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर तुला सिध्दी प्राप्त होईल. तुला गोकर्णाचा महिमा पण थोडक्यात सांगितला आहे.

५०.-५१. तीन सिध्दींविषयी सुध्दा सांगून झाले आहे. आता तुला आणखी काय ऐकायचे आहे? कुमार म्हणाला- हे तात, हे वृषभध्वज, त्या गोकर्ण नावाच्या तुच्या श्रेष्ठ क्षेत्रामध्ये होऊन गेलेल्या सिध्दांविषयी मला सांगावे. शंकराने म्हटले- हे पुत्रा, हे असुरमर्दना, माझ्या क्षेत्रात माझे पूजन करून --

५२. हे सत्तमा, स्वायंभुव मन्वंतरात श्रेष्ठ सिध्दी प्राप्त झालेल्या २४ सिध्दांविषयी मी जे सांगत आहे, ते ऐक.

५३.-५६. सनत्कुमार, सनक, सनंद, समर, सम, नारद, रोस हे ७ श्रेष्ठ मुनी, मुनिश्रेष्ठ दुर्वास, महामुनी मार्कंडेय, लज्जा, कृती, स्मृती, मेधा, सावित्री, सरस्वती, भगवान धर्म, हे नऊ (या सर्वांना) सिध्दी प्राप्त झाली. हे सुव्रता, वेदांध्ये उत्तम असा साम त्याचप्रमाणे क्रोध, काम, असूया मत्सरी, चंडी, द्वेष, ईर्ष्या असे आठ जण -अशा तर्‍हेने, हे कार्तिकेया, एकूण २४ सिध्दांना मुक्ती मिळाली.

५७. सर्व मन्वंतरांध्ये मुक्ती मिळालेल्या सिध्दांविषयी ऐक. हे पुत्रा, स्वारोचिष मन्वंतरात २० सिध्दांना मुक्ती मिळाली.

५८.-६०. हे पुरुषोत्तमा, गोकर्ण नावाच्या माझ्या महापवित्र क्षेत्रात वसू, वरेण्य, वरद, नर, नारायण, ध्रुव, नल, कुरु, काल, कर्मकर, क्रिया, रंभा, तिलोत्तमा, जन्या, सुरभी, मेनका, रोपाद, पृथुग्रीव, कंडू तसेच सत्यतपा हे २० सिध्द स्वारोचिष मन्वंतरात झाले.

६१.-६३. औत्तम मन्वंतरात सुध्दा माझ्या क्षेत्रात झालेल्या सिध्दांविषयी जाणून घे. क्षमा, सत्य, दम, कीर्ती, अहिंसा, आनंद, लक्ष्मी, लक्ष्मीधर, बुध्दी, सर्जन आणि तसेच पूर्वा, पश्चिमा, दक्षिणा व उत्तरा या दिशा, अध, ऊर्ध्व आणि तिर्यक्‌ यांना औत्तम मन्वंतरात मुक्ती मिळाली. -तापस मन्वंतरात मुक्ती मिळालेल्यांविषयी ऐक.

६४.-६६. देवांनंद, सुहोत्र, कहोळ, कनक, कष, हिरण्यराो, दीर्घतमा, सुहोत्र, अपरायणी, गौरी, गणाधिप, चंड, मेरू, कनकभूषण, सुभद्रा, सुशर्मा, सार्वभौ, देवल, वासुकी, दक्ष, अनंत आणि अरुण या २२ महाभाग्यशाली सिध्दांना गोकर्णक्षेत्री मुक्ती मिळाली.

६७.-७०. हे पुत्रा, रैवत मन्वंतरात ज्यांना मुक्ती मिळाली, त्या सिध्दांविषयी ऐक. वीरधर्मा, महानंद, शंभू, शांतभव, रम्य, रमणक, पर्णाद, तृणक, अंशुान, नालजंघ, अकूबार, अंग, रोचमान, शिव, शांत, समुद्र, विघस, विश्वाजिर, वराजी, कली, द्वापर, उलूकल, हिडिंबा, रोदसी, नर्मदा या २५ सिध्दांना रैवत मन्वंतरात, माझ्या क्षेत्री सिध्दी मिळाली.

७१.-७३. हे वत्सा, चाक्षुष मन्वंतरात मुक्ती मिळालेल्यांविषयी ऐक. सुरुची, सुती, जह्नू, बुध, शुक्र, प्रतर्दन, राहू, क्राथक्रम, क्रांत, संध्या, सिंधू, प्रजापती, अंगिरा, मधुपर्क, संध्या, रात्री आणि विमोहन या पुत्रांना माझ्या गोकर्ण क्षेत्रात मुक्ती मिळाली.- हे पुत्रा, वैवस्वत मन्वंतरात मुक्त झालेल्या सिध्दांविषयी ऐक.

७४.-८०. इक्ष्वाकू, अंबरीष, नाभाग, नहुष, विश्वामित्र, सुहोत्र, ययाती, महाया, जनक, कंबलाश्व, गोविंद, गोपती, प्रह्लाद, विनता, बळीचा पुत्र बाण, सुरूपी, हव्यवाह, वरुण, दारुण, वाल्मीकी, हर्यश्व, विनतापुत्र गरुड, नंदी, विज्वली, रघुराम, सम, सुधर्माण, पृथू, सत्यवतीपुत्र श्रेष्ठ असे व्यास, यम, काल, कालरात्री, मृत्यू, नील, निमिष, अनिमिष, मानहा मधुर, शम, सावर्णी, गौतम आणि नांध्ये श्रेष्ठ अशी गंगा, चंद्रभागा नदी, सिंधू, गौरी, मरीचिसुत, जमदग्रिपुत्र परशुराम, साध्य, रुद्र, मरुण, विश्वदेव, मरुत्‌ आदित्य असे उत्तम देव या मन्वंतरात होऊन गेले. या व्यतिरिक्त तुला काय ऐकायचे आहे?

८१. या पृथ्वीतलावर नेहमी जे द्विजोत्तम या तीन सिध्दींविषयीचे कथन ऐकतात व वाचतात, त्याची पापे धुतली जातात. ते शिवलोकाला जातात आणि सरतेशेवटी, ते शिवासह आनंदाचा उपभोग घेतात.

अध्याय ९ - सिध्दि-सिध्द-वर्णन्‌

. शंकराने म्हटले- भूमीला वर दिल्यावर, त्रिभुवनांना बघितल्यानंतर, पूर्वी ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे कल्पाच्या शेवटी मला राग आला.

.-. त्या प्रकृतीशी संयुक्त होऊन, हे शिखिवाहना (स्कंदा), गोकर्णापासून एका बाणाच्या अंतरावर, ईशान्य दिशेला पवित्र ठिकाणी सर्व प्रजेला जाळण्याच्या इच्छेने क्रोधाने खवळून मी उभा राहिलो (आणि) हे चराचर त्रैलोक्य मी नष्ट करीन, असा मनाशी निश्चय केला.

. हे पुत्रा, त्यानंतर मी उग्र शस्त्रे धारण केलेले, भयंकर, प्रचंड, तसेच महापराक्रमी, नानाविध आकाराचे प्राणिमात्र मी निर्माण केले.

. हे पुत्रा, माझ्याशी पराक्रमात तुल्यबळ, अनेक अलंकारांनी विभूषित असे कोटी महापराक्री गण मी एका क्षणात निर्माण केले.

.-.त्रिशूळ, बाण धारण केलेले, खड् शक्तीने युक्त असे ते सर्व श्रेष्ठ गण जन्मताक्षणीच आपले हात जोडून मला नमस्कार करून म्हणाले, ‘तू आम्हा सर्वांना का निर्माण केले आहेस? आम्हाला आज्ञा दे. तू सांगितल्याप्रमाणे आम्ही करू.'

.-११. असे भूतनाथांनी म्हटले असता, संतप्त झालेल्या रुद्राने त्यांना म्हटले, ‘ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या स्थावर जंगम लोकांना जाळून तुम्ही माझ्याकडे परत या.' असा त्याने त्या गणांना आदेश दिला. त्यावेळी हा लोकांना लवकरच नष्य करणार आहे, असे जाणून विष्णू तात्काळ गोकर्णक्षेत्री येऊन मला म्हणाला, ‘हे शंभो, ब्रह्मदेवाने जो (सृष्टी निर्माण करण्याचा) अपराध केला आहे, त्याला आज क्षमा करा. हे शंकरा, आता, संहार करणे उचित नाही. हे परमेश्वरा, शेवटी संहारकर्ता तूच आहेस.'

१२.-१४. असे विष्णूने म्हटलेले ऐकून, ज्याचा क्रोध शांत झाला आहे, अशा कृपाळू शंकराने त्या विष्णूला म्हटले, ‘हे जनार्दना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे,ज्याप्रमाणे पूर्वी जे लोक निर्माण केले होतेस, ते तसेच राहोत.' असे विष्णूला म्हटल्यावर शंकराने भूतेशांना म्हटले, ‘कारण, संहार करण्याच्या कामी मी तुम्हाला निर्माण केले आहे, त्यामुळे हे पुत्रांनो, या जगात तुम्ही प्रथम या नावाने प्रसिध्द व्हाल.

१५.-१६. माझ्या आज्ञेचे पालन करणारे तुम्ही माझ्याजवळ रहा.' असा गणांना आदेश देऊन, परत जायला निघालेल्या विष्णूला मी म्हटले,ङङ्ग लोकांना दग्ध करण्याच्या इच्छेने मी जेव्हापासून जिथे राहिलो, तेव्हापासून, त्या ठिकाणाला रुद्रभूी असे म्हटले जाईल. तिथे मृत्यूनंतर दहन केले असता, माणसांना मुक्ती मिळेल.

१७. हे विष्णू, मी प्रकृती (पार्वतीसह) गणांसह येथे राहतो.' असे शंभूने म्हटले असता, ‘ठीक आहे' असे म्हणून विष्णू स्वर्गलोकाला गेला.

सूत म्हणाला-

१८. गोकर्णक्षेत्री सदैव वास्तव्य करावे, मुक्तिमंडपात मरण यावे, आणि रुद्रभूीवर दहन व्हावे अशी विद्वान लोक सुध्दा इच्छा करतात.

१९.-२१. हे पुत्रा,तेव्हा भविेष्यातील कार्यबाहुल्याचा विचार करून, स्वतःची प्रतिज्ञा व्यर्थ होऊ नये, अशा विचाराने बेचैन झालेल्या मी ब्रह्मादी स्थावर, अणुमात्र यांमध्ये तसेच जीवांध्ये जे व्यापून असते, ते सत्त्व आवरून धरून, उत्तम असा सुवर्णृग निर्माण केला. नारायण देवाशिवाय खचितच कोणालाही ही गोष्ट माहीत नाही.

२२. हे पुत्रा, पार्षदांसह त्या मृगाला घेऊन मी कैलास पर्वतावर गेलो आणि त्यानंतर यथेच्छ त्याच्याशी क्रीडा करत राहिलो.

२३.-२४. हे सर्व मी तुला सांगितले. आणखी तू काय ऐकू इच्छितोस? कुमार म्हणाला,ङङ्ग तुच्या मुखकमलातून गोकर्ण क्षेत्राच्या जन्माविषयी आरंभापासून ऐकूनही माझे समाधान झाले नाही. तेव्हा तुम्ही पुन्हा सांगावे. त्या क्षेत्रात अमर गुरूंच्या सिध्दांविषयी मला सांगावे.

२५.-२७. सिध्दीचे लक्षण आणि सिध्दांचे चरित्रही मला सांगावे.' शंकराने म्हटले- हे पुत्रा, ऐक. मी सांगतो, ‘माझ्या क्षेत्री, जो बुध्दिमान सिध्द माझे स्मरण करत, इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना स्वतःमध्ये आवरून धरतो, काम क्रोधापसून विमुक्त होतो, जो नि;संग आणि संशयमुक्त होतो, जो द्वंद्वातीत होतो, तसेच निरहंकारी होतो, माझे यजन करतो, मत्परायण होतो, तो पुनर्जन्मापासून होऊन माझ्याकडेच येतो.

२८. माझ्याकडे आल्यावर तो परत जात नाही. येथे आल्यावर शोक करत नाही. हे पुत्रा, तो स्वतःमध्येच सर्व जग स्थित आहे, असे ज्ञानाने जाणतो.

२९. जो जेव्हा असे मानतो की मी एकमेवाद्वितीय' आहे, तेव्हा तो सिध्द पुरुष ती सिध्दी जाणतो.

३०.-३१. हे सुरश्रेष्ठा, इंद्रियांकडे आकर्षित होणार्या मानवांना तसेच अनेक जन्म घेऊनही इंद्रियांकडे आकृष्ट झाल्याने माझ्याकडे आकर्षित होणार्या मानवांना (निर्वाण) मिळणे अशक्य आहे. त्यामुळे, निःसंगचित्त, निर्द्वंद्व निरामय होऊन शुध्द, बुध्द, शिव शांत असे निर्वाण म्हणजेच गती सिध्द मिळवतो.

३२. त्या सिध्दीला सात्त्विकी सिध्दी म्हणतात, की जिची सज्जनही इच्छा करतात. हे पुत्रा, दुसर्या राजसी सिध्दीविषयी मी तुला आता सांगतो, ते ऐक.

३३.-३५. स्वर्ग मोक्ष यांचा मागोवा घेणार्या, देवत्वाची इच्छा करणार्या, अणिमादी महासिध्दी प्राप्त करू इच्छिणार्या,किंवा गंधर्वत्व मिळवू इच्छिणार्या, तसेच यक्षसिध्दी किंवा स्वर्लोकाची वासना बाळगणार्या इतरांकडून जे जे इच्छिले असते, ते ते या सिध्दीने मिळते, इतर दान, हो, जप, चांगल्या ठिकाणी मरण येणे, विविध इच्छांची पूर्ती तसेच पवित्र तीर्थांध्ये स्नान करणे यांनी मिळत नाही.

३६. पुनर्जन्म हे लक्षण असलेल्या त्या सिध्दीला राजसी सिध्दी म्हणतात. काही काळाने परत जन्म घेऊन उध अशा विष्णूपदाला राजसी सिध्दी मिळवलेले जातात.

३७.-४३. अज्ञान हे जिचे लक्षण आहे अशा तामसी सिध्दीविषयी आता ऐक. हे शरीरच सर्व काही आहे, दुसरे काहीही नाही, असा विचार करणारा, सकाळी उठल्यावर काही दान करणारा, यथोचित यज्ञयाग करणारा, दिलेच पाहिजे म्हणून केवळ जबरदस्तीने देणारा, श्रुतिस्मृतीनी सांगितलेले सोडून देणारा, गुरूचेही ऐकणारा, १८ पुराणांनी सांगितलेल्या धर्माचा निंदापूर्वक त्याग करणारा, धर्मज्ञ असूनही स्वेच्छेने, कुटिल युक्तींनी अधर्म करणारा, शास्त्रांचे अनुकरण करणारा, अनाचाराने देणारा यजन करणारा असा तो मानव अज्ञान हे जिचे लक्षण आहे अशी तामसी सिध्दी मिळवतो. पशु, मृग, पक्षी, सरपटणारे प्राणी अशा नावांनी प्रसिध्द असलेले, तामसी मूर्ख असे स्थावर होतात. दारुण अशा अज्ञानरूपी अंधारात गढून गेलेले ते काहीही जारत नाहीत. चंद्र ज्याप्रमाणे भ्रण करतो, तसे ते हे पुत्रा, अनेक अशा तिर्यक् योनींमध्ये परत परत फिरत राहतात. शास्त्रांचे अनुकरण करणारे असे ते दीर्घ काळ या भवसागरात राहतात.

४४. अत्यंत बुध्दिमान लोक आचार्याला सिध्दीचे प्रथम साधन मानतात. शिष्यांचे कल्याण करण्याच्या इच्छेने मी आचार्यरूपात राहतो.

४५. मला आचार्य म्हणून जाण. विष्णूला आचार्य म्हणतात. तसेच पुराणांचा अर्थ सांगण्यात पारंगत असा प्रत्यक्ष ब्रह्माही आचार्य होय.

४६. हे पुत्रा, सिध्दीप्राप्तीच्या चार द्वारांविषयी माझ्याकडून ऐक. ‘मानव धर्म' हेच पुराण असून आचार्य हे तीर्थ होय.

४७. सर्व क्षेत्रांमध्ये गोकर्ण हे अतिशय उत्तम पवित्र मानले आहे. तेव्हा, माणसांना सिध्दी प्राप्त करून देणार्या गोकर्णक्षेत्री तात्काळ जा.

४८. हे सवम, सर्व देवांना ऋषींनाही रहस्य असलेल्या श्रेष्ठ सिध्दीची इच्छा करणारा असा तू बाबा रे, आत्मरूपातच स्थिर रहा.

४९. मी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर तुला सिध्दी प्राप्त होईल. तुला गोकर्णाचा महिमा पण थोडक्यात सांगितला आहे.

५०.-५१. तीन सिध्दींविषयी सुध्दा सांगून झाले आहे. आता तुला आणखी काय ऐकायचे आहे? कुमार म्हणाला- हे तात, हे वृषभध्वज, त्या गोकर्ण नावाच्या तुच्या श्रेष्ठ क्षेत्रामध्ये होऊन गेलेल्या सिध्दांविषयी मला सांगावे. शंकराने म्हटले- हे पुत्रा, हे असुरमर्दना, माझ्या क्षेत्रात माझे पूजन करून --

५२. हे सत्तमा, स्वायंभुव मन्वंतरात श्रेष्ठ सिध्दी प्राप्त झालेल्या २४ सिध्दांविषयी मी जे सांगत आहे, ते ऐक.

५३.-५६. सनत्कुमार, सनक, सनंद, समर, सम, नारद, रोस हे श्रेष्ठ मुनी, मुनिश्रेष्ठ दुर्वास, महामुनी मार्कंडेय, लज्जा, कृती, स्मृती, मेधा, सावित्री, सरस्वती, भगवान धर्म, हे नऊ (या सर्वांना) सिध्दी प्राप्त झाली. हे सुव्रता, वेदांध्ये उत्तम असा साम त्याचप्रमाणे क्रोध, काम, असूया मत्सरी, चंडी, द्वेष, ईर्ष्या असे आठ जण -अशा तर्हेने, हे कार्तिकेया, एकूण २४ सिध्दांना मुक्ती मिळाली.

५७. सर्व मन्वंतरांध्ये मुक्ती मिळालेल्या सिध्दांविषयी ऐक. हे पुत्रा, स्वारोचिष मन्वंतरात २० सिध्दांना मुक्ती मिळाली.

५८.-६०. हे पुरुषोत्तमा, गोकर्ण नावाच्या माझ्या महापवित्र क्षेत्रात वसू, वरेण्य, वरद, नर, नारायण, ध्रुव, नल, कुरु, काल, कर्मकर, क्रिया, रंभा, तिलोत्तमा, जन्या, सुरभी, मेनका, रोपाद, पृथुग्रीव, कंडू तसेच सत्यतपा हे २० सिध्द स्वारोचिष मन्वंतरात झाले.

६१.-६३. औत्तम मन्वंतरात सुध्दा माझ्या क्षेत्रात झालेल्या सिध्दांविषयी जाणून घे. क्षमा, सत्य, दम, कीर्ती, अहिंसा, आनंद, लक्ष्मी, लक्ष्मीधर, बुध्दी, सर्जन आणि तसेच पूर्वा, पश्चिमा, दक्षिणा उत्तरा या दिशा, अध, ऊर्ध्व आणि तिर्यक् यांना औत्तम मन्वंतरात मुक्ती मिळाली. -तापस मन्वंतरात मुक्ती मिळालेल्यांविषयी ऐक.

६४.-६६. देवांनंद, सुहोत्र, कहोळ, कनक, कष, हिरण्यराो, दीर्घतमा, सुहोत्र, अपरायणी, गौरी, गणाधिप, चंड, मेरू, कनकभूषण, सुभद्रा, सुशर्मा, सार्वभौ, देवल, वासुकी, दक्ष, अनंत आणि अरुण या २२ महाभाग्यशाली सिध्दांना गोकर्णक्षेत्री मुक्ती मिळाली.

६७.-७०. हे पुत्रा, रैवत मन्वंतरात ज्यांना मुक्ती मिळाली, त्या सिध्दांविषयी ऐक. वीरधर्मा, महानंद, शंभू, शांतभव, रम्य, रमणक, पर्णाद, तृणक, अंशुान, नालजंघ, अकूबार, अंग, रोचमान, शिव, शांत, समुद्र, विघस, विश्वाजिर, वराजी, कली, द्वापर, उलूकल, हिडिंबा, रोदसी, नर्मदा या २५ सिध्दांना रैवत मन्वंतरात, माझ्या क्षेत्री सिध्दी मिळाली.

७१.-७३. हे वत्सा, चाक्षुष मन्वंतरात मुक्ती मिळालेल्यांविषयी ऐक. सुरुची, सुती, जह्नू, बुध, शुक्र, प्रतर्दन, राहू, क्राथक्रम, क्रांत, संध्या, सिंधू, प्रजापती, अंगिरा, मधुपर्क, संध्या, रात्री आणि विमोहन या पुत्रांना माझ्या गोकर्ण क्षेत्रात मुक्ती मिळाली.- हे पुत्रा, वैवस्वत मन्वंतरात मुक्त झालेल्या सिध्दांविषयी ऐक.

७४.-८०. इक्ष्वाकू, अंबरीष, नाभाग, नहुष, विश्वामित्र, सुहोत्र, ययाती, महाया, जनक, कंबलाश्व, गोविंद, गोपती, प्रह्लाद, विनता, बळीचा पुत्र बाण, सुरूपी, हव्यवाह, वरुण, दारुण, वाल्मीकी, हर्यश्व, विनतापुत्र गरुड, नंदी, विज्वली, रघुराम, सम, सुधर्माण, पृथू, सत्यवतीपुत्र श्रेष्ठ असे व्यास, यम, काल, कालरात्री, मृत्यू, नील, निमिष, अनिमिष, मानहा मधुर, शम, सावर्णी, गौतम आणि नांध्ये श्रेष्ठ अशी गंगा, चंद्रभागा नदी, सिंधू, गौरी, मरीचिसुत, जमदग्रिपुत्र परशुराम, साध्य, रुद्र, मरुण, विश्वदेव, मरुत् आदित्य असे उत्तम देव या मन्वंतरात होऊन गेले. या व्यतिरिक्त तुला काय ऐकायचे आहे?

८१. या पृथ्वीतलावर नेहमी जे द्विजोत्तम या तीन सिध्दींविषयीचे कथन ऐकतात वाचतात, त्याची पापे धुतली जातात. ते शिवलोकाला जातात आणि सरतेशेवटी, ते शिवासह आनंदाचा उपभोग घेतात.

अध्याय १ ते २०