अध्याय ०८ - गोकर्णउत्पत्तीवर्णनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ८ - गोकर्णउत्पत्तीवर्णनम्‌

कुमार (स्कंद ) म्हणाला, "हे देवदेवेश, सर्वज्ञ, भक्तांवर दया दाखवणार्‍या, भगवन्‌ तुम्ही सांगितलेली मन्वन्तरादी सृष्टीची लक्षणे ऐकली. आता मला दुसरे काही तरी ऐकावयाचे आहे. हे जगत्गुरो, जेव्हा तुम्ही मला, पुत्रा गोकर्णाला जा, असे म्हटलेत तसेच हे माझे क्षेत्र आहे असे म्हणालात. सर्व क्षेत्रे तुमचीआहेत, तुम्ही सर्वक्षेत्रमय आहात. सर्व प्रणिमात्रांमध्ये तुम्ही एकमेव क्षेत्रक्षेत्रज्ञ संज्ञेने स्थित आहात, तर मग गोकर्णक्षेत्र माझे असे का म्हणालात? तर तात, मला गोकर्णाचे माहात्म्य सांगा."

शंकरांनी यावर म्हटले, "वत्सा, ब्रह्म्‌याच्या ललाटापासून माझाच अंश रुद्र नावाने उत्पन्न झाला. पूर्वी तो देव सृष्टी निर्माण करण्याची चिंता करत असताना उत्पन्न झालेल्या रुद्राला पाहून प्रजापती त्याला म्हणाला, हे महाभाग, सृष्टी निर्माण कर, माझ्या मते हे काम करण्यास तूच समर्थ आहेस."

ब्रह्म्‌याचे ते बोलणे ऐकून तो रुद्र काहीही बोलला नाही आणि नंतर ध्यानमग्न होऊन तो पाण्यात बुडून गेला. धनिकाने ज्याप्रमाणे खजिन्याचा शोध घ्यावा त्याप्रमाणे सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने सर्व लोक अमर अणि निरोगी होतील. सत्व या एकाच गुणाने संपन्न होऊन सर्वजण अधम मध्यम न होता श्रेष्ठच होतील. अशी लोकहिताची इच्छा असणारा रुद्र, मी तपश्चर्येने हे अवश्य साध्य करीन असा निश्चय करुन त्या ठिकाणी तप करू लागला. पाण्यामध्ये बुडून गेलेला, तपश्चर्येमुळे प्राप्त झालेल्या तेजाने चमकणारा, संयमित, मनोदेवतेला आपल्या हृदयकमलात स्थापन करून क्षेष्ठ प्रकाशमान्‌ चैतन्यरुपी आत्म्याला जागृत करून अंधःकार नष्ट करणारा तो रुद्र, श्रेष्ठ अशा विश्वाचे ध्यान करत समाधिस्थ झाला. अशा प्रकारे तो तप करत असता कोटी सूर्य उगवून गेले. तीन युगांचा मोठा काळ निघून गेला. रुद्राला सृष्टी निर्माण करायला उशीर होत असलेला पाहुन त्याचे कारण काय असावे याची प्रजापती चिंता करू लागला. मी प्रयत्नपूर्वक प्राणिमात्र निर्माण करणार आहे म्हणून सांप्रत परम समाधिस्थ होऊन तप आचरत आहे हे त्याचे कारण व मनोगत ब्रह्म्‌याने जाणले. म्हणून हा रुद्र तप आचरत आहे. देव, असुर आणि मनुष्य असे भेद जर झाले नाहीत आणि नीच, उत्कृष्ट असेही त्यांचे विभाग झाले नाहीत किंवा शुध्द, सत्वगुणयुक्तच सृष्टी निर्माण झाली, त्रिगुणांच्या आधाराशिवाय जर सृष्टी निर्माण झाली तर सजातीय, विजातीय या कल्पनांच्या ज्ञानामुळे संकरादी महादोष निर्माण होईल. तेव्हा हे होता कामा नये असे निश्चित करून ब्रह्मदेवाने रजोतमोगुणांनी प्रेरित होऊन व पूर्वी जसे ठरविले होते त्याप्रमाणे त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण केली. नंतर आत्मरुपात रत झालेल्या व तप करत असलेल्या त्या रुद्राला शरीररूप धारण केलेली वाणी त्यावेळी म्हणाली, "हे देवदेवेशा, उठ, उठ, तुमची चिंता आता संपली आहे. ब्रह्म्‌याने सर्व स्थावर जंगम विश्वाची वेगळ्या प्रकारे निर्मिती केली आहे. चतुर्विध प्राणिमात्र आधी निर्माण केले आहेत. देवादि वगैरे सर्वांची पूर्ववत्‌ निर्मिती झाली आहे. म्हणून आता श्रम कशाला? तुझे तप कशासाठी?"

ते ऐकून भगवान्‌ रुद्राने म्हटले, "इकडे ये." नंतर ती दिव्यरूपधारी स्त्री सात्विक प्रकृति रुद्राच्या जवळ उभी राहिली. क्रोधाने डोळे उग्र करून भगवान्‌ शंभू तिला म्हणाला, " हे भद्रे, तू कोण आहेस, कोठून आलीस, तू कोणाची मुलगी आहेस ते सांग."

शम्भूचे ते बोलणे ऐकून दिव्यस्वरुपी माया त्याला म्हणाली, "हे सुरश्रेष्ठा, मी सांगितलेला वृत्तान्त ज्ञानाने जाणून घे."

प्रकृतीचे ते बोलणे ऐकून महादेवाने दीर्घकाळ स्वतःशी ध्यान केले आणि नंतर स्वतः मधील सात्विकी प्रकृतीला जाणले. रज व तम गुणांनी जग निर्माण झालेले पाहून क्रोधित झाला व त्या प्रकृतीसह तो पुरुषोत्तम उडी मारून (पृथ्वीला भेदून) वर येऊ लागला. बारा सूर्यांचे तेज असलेला, अत्यंत रौद्र रुप धारण केलेला तो बाहेर येऊन त्याने, हे पुत्रा, (स्कंदकुमाराला उद्देशून) पृथ्वीला पाहिले आणि तिला म्हटले, "क्रुद्ध अशा मला वाट दे. तेव्हा एखाद्या केळीच्या झाडाप्रमाणे कंप पावत, हात जोडून ती विश्वंभरा सती क्रुद्ध अशा मला म्हणाली, "भक्तांना अभयंकर अशा देवा, मी तुला शरण आले आहे."

त्रैलोक्यकान्तकामारे धर्मप्रियसुरेश्वर ॥ विश्वमूर्ते विश्वकर्मन्विष्णुमूर्तेसुरेश्वर ॥१॥
ब्रह्ममूर्तेजगन्नाथ विश्वमूर्ते सदाशिव॥ ज्ञानाऽज्ञानविभागाय ज्ञानेशायमहात्मने॥२॥
सूर्येन्दुवह्निनयन मनसैव प्रसाधक॥ सर्वज्ञः सर्वभूतेश सदानन्दनिरामय ॥३॥
एकमूर्तेद्विमूर्तेच त्रिमूर्ते शतमूर्तिक॥ यज्ञमूर्ते यज्ञभव यज्ञेशाय नमोनमः॥४॥
कर्त्रेभर्त्रेचसंहर्त्रेहरिनेत्रायवेधसे॥ परमात्मन्परन्धाम पवित्रंपरमं भवान्‌ ॥५॥
त्वमादिःसर्वभूतानामनादिस्त्वं सुरोत्तम॥ त्वंयज्ञस्त्वंवषट्‌कारस्त्वंहविस्त्वं हुताशनः ॥६॥
त्वमोंकारः सुरश्रेष्ठत्वंब्रह्माविष्णुरेवहि॥ त्वंरुद्रस्त्वंरविर्वायुर्यनस्तवं वरुणस्तथा ॥७॥
आदित्या वसवो रुद्रा मरुतःपितरस्तथा॥ आकाशस्त्वंतथापृथ्वी विश्वेदेवास्तथाश्विनौ ॥८॥
नागा यक्षाःपिशाचाश्च मनुष्याः पशवस्तथा॥ पक्षिणोराक्षसाश्चैवगन्धर्वाप्सरस्तथा ॥९॥
समुद्रा सरवोनद्योनदास्थावरजङ्गमाः॥ ददर्शभूतं देवेश दृश्याऽदृश्यं हियद्भवेत्‌ ॥१०॥
शिरस्तथातेगगनं सुरेसत्वष्टौदिशश्चैवतुवाहवस्ते॥ त्वदीयमाहुर्नयनत्रयंच सूर्यानलौ सोममितिक्रमेण॥११॥

अशा प्रकारे भूमीने शंकराची स्तुती केल्यावर प्रसन्न होऊन त्याने धरणीला म्हटले, "हे शुभे, तुझी काय इच्छा आहे?"

धरणी म्हणाली, "हे देवा, स्त्री असून मी स्वभावतः भयपीडित आहे. तेव्हा वर जातांना मला कृपया भेदू नका अणि आपण जाणार असाल तर कर्णाच्या छिद्रातून लघुरूप (छोटे रूप) घेऊन वर या."

रुद्राने म्हटले, "हे भद्रे, मी तसेच करेन."

असे धरणीला बोलून तो दयाळू परमेश्वर त्या प्रकृतीसह उसळी मारून अंगुष्ठमात्र रुपाने आदित्यासमान तेजस्वी अशा त्या रुद्राने वेगाने बाहेर येऊन (पृथ्वीच्या) गोमातेच्या कर्णातून बाहेर आला. भूमीला छेदून वर आल्यावर भगवान्‌ धरणीला म्हणाला, "हे शुभे, माझ्या संयोगामुळे या ठिकाणी तुझा पुत्र (भौम-मंगळ) ग्रहांचा अधिप, शक्तीमान्‌ होईल. तसेच तो अंगारक म्हणून ओळखला जाईल. गो शब्द आधी येतो व हा तुझा कर्णही शुभ आहे. तेव्हा हे क्षेत्र गोकर्ण या नावाने विख्यात होइल. रुद्रयोनी या नावाने त्रैलोक्यात याची कीर्ती गायली जाईल. कारण पाताळातून वर येण्यामुळे माझा जन्म झाला आहे. तेव्हा हा जन्म अरुणावर्त या नावाने विश्वात विख्यात होईल. या जगात वरुणाचे जे एकार्णव रूप आहे, ते पाताळापासून सत्यलोकापर्यंत सागरातील लाटेप्रमाणे आहे. तेव्हा या वरुणावर्ताचा विलय किंवा विनाश होणार नाही."

"सकाळी उठून जे नेहमी गोकर्णाचे स्मरण करतील त्यांची रात्री केलेली पापे नष्ट होतील यात संशय नाही. तसेच दिवसा केलेले पाप दुपारी नष्ट होईल. वर्णत्रयविभूषित अशा गोकर्णाचे जे स्मरण करतील त्यांचे वाचेने केलेले पाप माझ्या प्रसादाने नष्ट होईल. देवांनी पूजिलेले माझ्या गोकर्णाचे जे दर्शन घेतील त्यांची जन्मभराची पापे नष्ट होतील. रुद्रयोनी मध्ये जे व्द्विजोत्तम स्नान करतील त्यांचे तीन जन्मातील कमी वा जास्त पाप विनाश पावेल. अस्वमेधदि यज्ञ केल्याचे पुण्य मिळते ब्रह्म्‌याने व मी सांगितलेले स्नान येथे फलद्रूप होते."

अशा प्रकारे धरणीला आशीर्वाद देऊन ब्रह्म्‌याने निर्माण केलेली सृष्टी पाहण्यासाठी भगवान्‌ भूतभावन महादेव निघून गेले.

अध्याय १ ते २०