अध्याय ०६ - युगादिकालव्यवस्था

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ६ - युगादिकालव्यवस्था

१. कुमाराने म्हटले- हे तात, तुम्ही आधी मला धर्माच्या उत्पत्तीबद्दल सांगितले नाही. हे पुरुषोत्तमा, धर्म हा भगवान कसा झाला, त्याविषयी सांगावे.

२. शंकराने म्हटले- सत्याचा ध्यास धरणार्‍या ब्रह्मदेवाचा जेव्हा ऊर्ध्व स्रोत तयार झाला, तेव्हा त्या भगवान ब्रह्मदेवाने जगताच्या मुळाविषयी चिंतन केले.

३. सर्व जगतांचा अक्षय आदि असा धर्म उत्पन्न झाला. त्याच्या मनापासून चतुष्पाद जगताची निर्मिती झाली.

४.-५. हे सुरोत्तमा, (धाता, विधाता या देवांबद्दल) ??, तसेच सूती व प्रसूतीविेषयी तुला मी अगोदर सांगितले आहे. भृगू व ख्यातीपासून लक्ष्मीचा जन्म झाला जी देवाधिदेव विष्णूची पत्नी झाली. अत्रीपासून सोम व मरीचीपासून काश्यप जन्माला आला.

६. दक्षाच्या तेरा कन्यांनी काश्यपाला वरले. हे सुरोत्तमा, त्यांच्यापासून श्रेष्ठ देव, मानव व दैत्य जन्माला आले.

७. पक्षी, असुर, पशू असे स्थावर, तसेच नाग, यक्ष, पिशाच असे सर्व स्थावर व जंगम निर्माण झाले.

८.-९. त्यांच्या पुत्र-पौत्रादींनी हे सर्व जगत व्यापलेले आहे. हे पुत्रा सुरोत्तमा, सोमाला दिलेल्या त्या नक्षत्र या नावाने प्रसिध्द असलेल्या सत्तावीस कन्या काळाच्या नयनांच्या ठिकाणी आहेत. हे भगवंता, आता मी काळाविषयी सांगतो. हे जगत काळाने व्यापलेले आहे.

१०. हा काळ कोण असे विचारले तर हा काळ क्षय पावणार्‍यांचा क्षय करणारा आहे. हे भगवंता, काळ हा माझा अंश आहे. तो तामस ब्रह्मापासून उत्पन्न झालेला आहे.

११. हे बाळा, त्या काळाने या सर्वांचा पुन्हा पुन्हा संहार केला जातो. हे बाळा, आणि त्याच्याकडूनच निर्मिती केली जाते. हा बलाढ्य काळ सतत परिवर्तन करत असतो.

१२. देवादी स्थावर प्राणी या काळामुळेच स्थिती प्राप्त करतात. हे सुरोत्तमा, या जगतात, कोणीही काळाला ओलांडून जात नाही.

१३. विधात्याची निर्मिती असलेले हे जगत काळाने परिवर्तित होते. मी स्वतः काळ आहे, विष्णू आहे व कमलासन असा ब्रह्मदेव आहे.

१४. हे भगवंता, या जगतात हाच काळ आहे ज्यायोगे तुझाही लय होतो. हे बाळा, ब्रह्मदेवाची शंभर वर्षे हे त्या काळाचे आयुर्मान मानले आहे.

१५. हे निष्पाप बाळा, रुद्राचे कालस्वरूप जे मी तुला सांगितले, ते ‘पर' या संज्ञेने व त्याचा अर्धा भाग ‘परार्ध' या संज्ञेने गायले जाते.

१६.-१७. हे उत्तम पुत्रा, त्या काळाचे परिणामस्वरूप आता जाणून घे. चर आणि अचर अशा इतर प्राणिमात्रांच्या, तसेच भूमी, पर्वत, सागर आणि इतर सर्वांच्या बाबतीत १८ निमेषांनी एक काष्ठा होते.

१८. ज्या ३० काष्ठा आहेत, त्यांना विद्वानांनी काळाची १ कला असे जाणावे. तेवढ्याच (३०) कलांचा १ क्षण मानलेला आहे.

१९. १२ क्षणांचा १ मुहूर्त मानलेला आहे. ३० मुहूर्तांच्या योगाने जो काळ बनतो, त्याला (माणसाची) एक दिवस-रात्र मानतात.

२०. हे पार्वतीनंदना, ३० दिवस-रात्रींचा १ महिना होतो. ६ महिन्यांचे १ अयन होते. ते दक्षिण व उत्तर या नावांनी विदित आहे.

२१. दोन अयनांचा काळ मिळून १ संवत्सर सांगितले गेले आहे. दक्षिणायन ही देवांची रात्र आंहे, तर उत्तरायण हा त्यांचा दिवस आहे.

२२.-२३. हे उत्तम देवा, मानवांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस म्हटला जातो. मानवाच्या ३६०वर्षांच्या संख्येएवढे देवांचे एक वर्ष गणले जाते. अशा दिव्य परिमाणाने चार युगांची संकल्पना मांडली गेली आहे.

२४. हे पुत्रा, जे मी तुला यथार्थ वर्णन करून सांगत आहे, ते तू नीट ऐकावेस. ४००० दिव्य वर्षांचे मिळून कृत युग होते.

२५. त्याच्या १०० संध्या आणि तसाच संध्यांश असतो. ३००० दिव्य वर्षांचे मिळून त्रेता युग मानले आहे.

२६. २००० दिव्य वर्षांचे मिळून द्वापर युग म्हटले आहे. त्याच्याही १०० संध्या आणि तसाच संध्यांश असतो.

२७. कृत नावाचे जे युग पूर्वी होऊन गेले, त्यात सनातन धर्म प्रभावी होता. हे सुरोत्तमा, त्या काळी कर्तव्य हे केलेच पाहिजे असा दंडक होता.

२८. तेथे (त्या युगात) धर्माचा ह्रास होत नव्हता व प्रजा क्षीण होत नव्हत्या. या गुणामुळे विद्वान या युगाला कृतयुग म्हणत असत.

२९. हे कुमारा, कृत युगाच्या शक्तीमुळे, देव, दानव, गंधर्व, यक्ष, राक्षस, नाग हे परस्परांना त्रास देत नसत.

३०. कृत युगात चार वर्णांध्ये चतुष्पाद धर्म शाश्वत होता. हे कृतयुग खरोखर त्रिगुणांच्या फळांनी वर्जित होते.

३१. हे पुत्रा, आता त्रेतायुगाचे चे रूप आहे, ते तू जाणून घे. त्रेता युगात धर्माला एक पाय नसतो. (धर्माचा एक पाय कमी असतो.)

३२. त्रेता युगात भावयुक्त संकल्प, क्रिया, दान व त्यांचे फलोदय यांनी युक्त असे यज्ञ व विविध धार्मिक क्रिया होतात.

३३. द्वापर युगात सुध्दा धर्म हा द्विपादयुक्त असतो. वर्ण व आश्रम यांनी युक्त असे वेद हे चार प्रकारचे आहेत.

३४. अशा प्रकारे भिन्न भिन्न शास्त्रांध्या विविध प्रकारच्या क्रिया केल्या जातात. तप, दान यांनी वृध्दिंगत झालेली प्रजा राजस गुणाने युक्त असते.

३५. (या युगात) मानव हे अल्पायुषी असून वेद हे जाणण्यास अतिशय कठीण असल्यामुळे साक्षात हरीने व्यासांच्या रूपाने वेदांचे विभाजन केले.

३६. सत्याचे यथार्थ ज्ञान असल्यामुळे काहीजण सत्यात स्थिर झाले. जे सत्यापासून ढळले, त्यांना अनेक प्रकारच्या व्याधी जडल्या.

३७. विविध काम आणि उपद्रव हे दैवतांनी केलेले असतात. हे वत्सा, त्यामुळे कलियुगात, धर्म हा एकपादयुक्त आहे, असे मानले आहे.

३८. तामस गुणाचा आश्रय घेतल्यामुळे स्मृतींचा नाश होतो. त्याचप्रमाणे धर्म, यज्ञ, क्रिया वगैरेंचे आचरण व्यर्थ होते.

३९. आधी, व्याधी, आळस, क्रोध इत्यादी दोष, उपद्रव, मनस्ताप हे समूहाने येतात.

४०. युगांचे चक्र फिरत असता हा संसार पुन्हा पुन्हा निर्माण होतो. संसार क्षीण होताच लोकप्रवर्तक असे देव नाश पावतात.

४१. हे पुत्रा, दिव्य संख्येने हे चतुर्युग सांगितले आहे. १००० दिव्य वर्षांचा मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस मानला गेला आहे.

४२. हे पुत्रा, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात १४ मनू होतात. त्यांचे कालयुक्त परिमाण आता ऐक.

४३. सप्तर्षी, देव, इंद्र, मनू आणि त्यांचे पुत्र हे एकाच वेळी निर्माण केले जातात व तसेच त्यांचा संहारही बरोबरच होतो.

४४.-४७. हे उत्तम पुत्रा, देवादिकांची ८ लाख ५२ हजार दिव्य वर्षांचा काळ हा एका मन्वंतराचा कालावधी असतो. मानव वर्षांची गणना केल्यास या मन्वंतराचा काळ ३० कोटी ६७ लाख २० हजार वर्षांचा होतो. या काळास १४ या संख्येने गुणले असता ब्रह्मदेवाचा एक महान दिवस होतो.

४८. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी निमिष नावाचा प्रलय होतो. त्याच्या अंती, लगेचच, भूलोक, भुवर्लोक आदी सर्व त्रैलोक्य जळून खाक होते.

४९.-५०. त्यामुळे तापाने व्याकुळ होऊन महर्लोकात निवास करणारे (भृगू आदी ऋषी) जनलोकात जातात. अशावेळी, त्रैलोक्याच्या ज्ञानाने समृध्द, ज्ञानात स्थित असलेल्या योग्यांनी ज्याचे चिंतन केले जाते असा नारायणस्वरूप ब्रह्मदेव त्रैलोक्यात, एकार्णवात, भोगीशय्येवर शयन करतो.

५१.-५२. त्या प्रमाणात त्यानंतर ब्रह्मदेवाची रात्र होते. रात्रीच्या शेवटी सृष्टी निर्माण होते. अशाप्रकारे, ब्रह्मदेवाचे एक वर्ष आणि अशी शंभर वर्षे हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अर्धा भाग होय की ज्याला परार्ध म्हणतात. अशा दोन परार्धांचा काल मिळून पद्मयोनी ब्रह्मदेवाचे आयुष्य होय.

५३. हे निष्पाप वत्सा, ब्रह्मदेवाचा पहिला व दुसरा परार्ध मिळून जो काळ किंवा कल्प झाला, त्याला पाद्म कल्प म्हणतात.

५४. आता जो कल्प चालू आहे, तो दुसर्‍या परार्धाच्या सुरुवातीचा भाग आहे. त्याला वाराह कल्प असे नाव आहे.

५५. कुमाराने म्हटले- हे विभू ईश्वरा, संपूर्ण मन्वंतराविषयी मी ऐकू इच्छितो. तसेच या मन्वंतरांध्ये झालेल्या सप्तर्षींविषयी सुध्दा ऐकण्याची माझी इच्छा आहे.

५६. शंकराने म्हटले- हे पुत्रा, अगोदर होऊन गेलेल्या आणि होऊ घातलेल्या मन्वंतरांविषयी मी तुला संक्षेपाने सांगत असताना तुला ते आधीच कळले आहे.

५७.-५८. त्यांविषयी मी आता तुला क्रमवार आणि विस्ताराने सांगतो. ते तू ऐक. अगोदर स्वायंभुव मनू झाला. त्यानंतर स्वारोचिष मनू झाला. त्यानंतर, तामस, तापस, रैवत आणि चाक्षुष असे सहा मनू होऊन गेले. सध्या सूर्यनंदन हा मनू आहे.

५९. हा वैवस्वत म्हणजे सातवा मनू होय. अगोदरच स्वायंभुव मनूबद्दल सांगून झाले आहे. त्याचप्रमाणे, देव व सप्तर्षींविषयी मी तुला त्या त्या वेळी सांगितले आहे.

अध्याय १ ते २०