अध्याय ०४ - ब्रह्मसृष्टि-विवेचनम्‌

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ४ - ब्रह्मसृष्टि-विवेचनम्‌

१. शंकराने म्हटले -वेगवेगळ्या झालेल्या त्या विविध शक्ती एकत्रित झाल्याशिवाय, तशा प्रकारच्या प्रजा पूर्णत्वाने, तसेच एकेकट्याने निर्माण करण्यास असमर्थ होत्या.

२. एकमेकांशी संयोग पावून त्या शक्तींनी परस्परांचा आधार घेतला आणि पूर्णपणे ऐक्य पावून एकसंध अशा लक्षावधी प्रजा निर्माण केल्या.

३. पुरुषाचं वर्चस्व मान्य करून आणि प्रकृतीच्या संतीने महदादी असे विशेष संघ निर्माण केले.

४. त्या कर्मातून प्रसरण पावलेले, बुडबुड्यासमान असलेले ते पाणी निर्माण होणार्‍या भूतांसाठी जलस्थित असे विशाल अंडे बनले.

५. त्या अंड्यातून देव, असुर, मानव तसेच अग्री, वायू, आकाश इत्यादी भूते आधी बाहेर पडली.

६. हे पुत्रा, ज्याप्रमाणे भूतादी ‘महत्‌' ने दहा गणांनी ? अंडे आच्छादित असते, त्याप्रमाणे प्रकृतीने त्या सर्वांसहित परमात्म्याला आच्छादित केले आहे.

७. ज्याप्रमाणे बाह्य दलांनी (कठीण आवरणांनी) नारळाचे आतले बीज झाकलेले असते, त्याप्रमाणे या सात विकृतीरूपांनी हे अंड झाकलेले आहे.

८. याबाबतीत, स्वत; विश्वेश्वर हरीने रजोगुणाचा आश्रय घेतलेला आहे. ब्रह्मदेव, विष्णू व महेश्वर हे अनुक्रमे सृष्टिनिर्मिती, स्थिती, व विनाश करणारे आहेत.

९. याबाबतीत, स्वचैतन्यरूपी शरीर धारण करणारा मी एकमात्र अच्युत आहे. माझ्या प्रभावाने ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो आणि माझ्या आज्ञेनुसार विष्णू या सृष्टीचे संवर्धन व रक्षण करतो.

१०. व ११. हे पुत्रा, आणि सरतेशेवटी, माझ्या इच्छेनुसार मी या सृष्टीचा संहार करतो. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या सर्वांनी तयार झालेले जगत्‌ त्या पुरुषाचे अंतःकरण होय. तोच सर्व भूतांचा ईश्वर होय, जो सर्व जगाला व्यापून आहे.

१२. हे सत्पुत्रा, आधीच्या सर्गांध्ये भूतादींच्या निर्मितीविषयी मी तुला सांगितले आहेच. आणि आता, पूर्वी ब्रह्मदेवाने त्या दक्षकन्या कोणाला दिल्या त्याविषयी सांगतो, ते ऐक.

१३. अव्यक्तजन्मा ब्रह्मदेव सृष्टी-निर्मितीविषयी विचार करत असूनही, त्याने प्रथम बुध्दिपुरस्सर निर्मिती न केल्यामुळे ती निर्मिती तमोय झाली.

१४. तमोय, महामोह, तमिस्र, अंध आणि अविा या संज्ञांनी युक्त असे त्या महात्म्याचे पाच विभाग प्रकट झाले.

१५. पाच प्रकारे अस्तित्वात आलेल्या त्या सृष्टीने समत्वबुध्दीने ध्यान करणार्‍या त्या अव्यक्त व अव्यय आत्म्याला अंतर्बाह्य व्यापून टाकले.

१६. त्या बुध्दिपूर्वक निर्माण केलेला तो सर्ग बघून त्याने दुसरा सर्ग निर्माण केला. अशाप्रकारे त्या सर्गाचे ध्यान करत असताना तिरका स्रोत तयार झाला.

१७. तिरकी प्रवृत्ति असल्यामुळे तिर्यक्‌ स्रोत किंवा सर्ग असे ज्यांना मानले जाते, ते अज्ञानी व जाणीव नसलेले असे मृगादी पशू, पक्षी म्हणून प्रसिध्द आहेत.

१८. उन्मार्ग स्वीकारणारे, थोड्याशा ज्ञानाने स्वतःला ज्ञानी समजणारे, अंतःकरणात प्रकाश असणारे ते सर्व परस्परांना आकर्षित करतात.

१९.

२०. साम्यत्वाने युक्त, प्रेळ, (अज्ञानाने)अंतर्बाह्य अनाच्छादित, अंतर्बाह्य प्रकाशयुक्त असल्यामुळे हे वत्सा, त्यांना ऊर्ध्व स्रोत असे मानले आहे.

२४. ते पुष्कळ तेजस्वी असतात. त्यांच्यात रजोगुणाचे आधिक्य असते व काही प्रमाणात तमोगुणही असतो. म्हणून ते अधिक दुःखी होतात आणि परत परत जन्म घेतात.

२५. अंतर्बाह्य तेजस्वी अशी माणसे साधक असतात. अशाप्रकारे, हे पुत्रा, सृष्टिनिर्मितीची ही पाच लक्षणे सांगितली आहेत.

२६. तो ब्रह्मदेवाचा पहिला व श्रेष्ठ सर्ग जाणावा. त्यानंतरचा जो दुसरा आहे त्याला भूतांचा सर्ग म्हणतात.

२७. तिसरा सर्ग विकारशील अशा इंद्रादी देवांचा सर्ग मानला गेला आहे. आणि तिसरा जो तिर्यक्‌स्रोत म्हणून सांगितला आहे, तो यांपेक्षा वेगळाच म्हटला जातो.

२८. नंतर, त्यापुढचा सहावा सर्ग हा देवसर्ग मानला गेला आहे. आणि त्या देवसर्गानंतरचा मानुष हा सातवा सर्ग मानला जातो.

३०. प्राकृत आणि अवैकृत असा कौमार नावाचा नववा सर्ग मानला गेला आहे. अशाप्रकारे प्रजापतीची नऊ प्रकारची निर्मिती प्रसिध्द आहे.

३१. सृष्टी निर्माण करणार्‍या जगदीशाचे सृष्टिसंबंधी प्राकृत आणि अवैकृत असे दोन हेतू आहेत. ज्यांमुळे प्रजा वाढली आहे त्यांविषयी ऐक.

३३. हे पुत्रा, सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या सुरादी, स्थावरादी, मनुष्यादी आणि पशुपक्ष्यादी अशा चार प्रकारच्या मानस प्रजा जाणाव्या.

३४. सृष्टी निर्माण करण्याची इच्छा असणार्‍या ब्रह्मदेवाच्या कटीप्रदेशातून प्रथम असुर निर्माण झाले. वैराग्यामुळे त्याने तमोगुणाचे आधिक्य असलेल्या त्या तनूचा त्याग केला.

३५. हे पुत्रा, ब्रह्मदेवाने त्याग केलेल्या त्या तनूला ङङ्गरात्र' हे नाव मिळाले. नंतर, दुसरा देह धारण करून, सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने त्याने पुन्हा प्रजा निर्माण केली.

३६. ज्यात सत्त्वगुणाची वृध्दी झाली आहे, अशा ब्रह्मदेवाच्या मुखातून पावकादी विप्र आणि उत्तमोत्तम देव निर्माण झाले.

३७. आणि धर्माची इच्छा बाळगणार्‍या प्रजापतीने पुन्हा त्या तनूचा त्याग केला. हे पुत्रा, प्रजापतीने ज्या तनूचा त्याग केला, तिला ‘दिवा' (दिवस) अशी संज्ञा मिळाली.

३८. कामाचारी राक्षस हे रात्री बलवान असतात, तर सत्त्वगुणाचे आधिक्य असलेले देव हे दिवसा बलवान असतात.

३९. पित्यासमान असलेल्या त्याच्यापासून ‘पितर' निर्माण झाले. आणि पितरांची निर्मिती केल्यानंतर, त्या प्रभूने त्या तनूचाही त्याग केला.

४०. त्याग केलेल्या आणि दिवस व रात्र यांच्यामध्ये स्थित असलेल्या त्या तनूला ‘संध्या' असे नाव मिळाले. त्यानंतर, रजोगुणयुक्त असा दुसरा देह त्याने धारण केला.

४१. हे देवोत्तमा, रजोगुणयुक्त मनुष्य निर्माण झाले. त्यानंतर, ताबडतोब, प्रजापती ब्रह्मदेवाने, त्या तनूचाही त्याग केला.

४२. जी संध्येपूर्वी निर्माण झाली, तिला ‘ज्योत्स्ना' अशी संज्ञा आहे. ज्योत्स्नेचे आगमन झाले असता मनुष्य आणि पितर बलवान असतात.

४३. हे विबुधश्रेष्ठा, पुन्हा सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने, सामर्थ्यशाली प्रजापती देवाने रजोगुणात्मक असा दुसरा देह धारण केला.

४४. प्रजापतीने अंधकारात दुराचारी, विद्रूप, दाढी असलेली, पापकर्मात गढलेली अशी विविध प्रकारची प्रजा निर्माण केली.

४५. ‘आम्ही रक्षण करणार नाही, रक्षण करणार नाही' असे म्हणणारे ते राक्षस होत. ‘आम्ही खातो' असे म्हटल्यामुळे, जे इतर होते, ते यक्ष होत.

४६. त्याक्षणी, तशा प्रकारची प्रजा निर्माण झालेली पाहून, ब्रह्मदेवाने मनातल्या मनात स्वतःचा धिार केला. त्या श्रेष्ठ प्रजापतीने त्यांचा धिार केल्यामुळे --

४७. --केहिताः ?? --त्यामुळे तामसी असे ते ‘नाग' या नावाने प्रसिध्द झाले.

४८. सरपटण्यामुळे (‘सरपटणे' या गुणधर्मामुळे) ते सर्प झाले. ते क्रूर आणि विषबलाने उन्मत्त असे होते. त्यामुळे क्रोधित झालेल्या ब्रह्मदेवाने क्रोधापोटी विशेष अशी भूते निर्माण केली.

४९. ती भूते उग्र, पिंगट रंगाची आणि मांसाहारी होती. नंतर त्या परमेश्वराच्या डाव्या अंगापासून गंधर्व निर्माण झाले.

५०. ‘शब्दांना प्राशन करणारे' असे ते निर्माण झाले. म्हणूनत्यांना ङङ्गगंधर्व' असे म्हणतात. त्यांना निर्माण करून त्या शक्तीने प्रेरित झालेल्या भगवान ब्रह्मदेवाने त्यानंतर,

५१. त्याने आपल्या वयस्‌ (शक्ती) पासून इच्छेनुसार पक्षी निर्माण केले. त्याच्या छातीपासून उडू शकणारे पक्षी निर्माण झाले व मुखापासून त्याने बकर्‍या निर्माण केल्या.

५२. त्यानंतर, प्रजापतीने पृष्ठभागांपासून अंगना निर्माण केल्या. तसेच, पायांपासून घोडे, गाढवं,रानगवे आणि हरिणे निर्माण झाली.

५३. त्याचप्रमाणे, उंट, खेचर व इतर पशुजाती निर्माण झाल्या व त्याच्या रोमावलीपासून वनस्पती, फळे, मुळे निर्माण झाली.

५४. हे सुरोत्तम, सृष्टिनिर्मितीच्या प्रारंभी, त्रेतायुगाच्या सुरुवातीला, ब्रह्मदेवाने वनस्पती निर्माण करून त्यांचा यज्ञामध्ये सुयोग्य उपयोग केला.

५५. गाय, बैल, म्हैस, मेंढा, घोडा, खेचर, गाढव या सर्वांना पाळीव पशू म्हणतात. आता अरण्यात राहणार्‍या प्राण्यांविषयी माझ्याकडून समजून घे.

५६. हत्ती, वानर असे दोन खुरे असलेले पशू हा पाचवा सर्ग होय. जलचर प्राणी हा सहावा, तर सरपटणारे प्राणी हा सातवा सर्ग होय.

५७. गायत्री छंद, ऋग्वेद, त्रिवृत्साम, रथंतर, अग्रिष्टो इत्यादी यज्ञ हे प्रजापतीने आपल्या पूर्ववर्ती मुखापासून निर्माण केले.

५८. यजुर्वेद, त्रिष्टुप्‌ छंद, पंचदश(१५) स्तो, बृहत्साम, गानस्तुती इत्यादी दक्षिण मुखातून निर्माण झाले.

५९. सामवेद, जगती छंद, सप्तदश(१७) स्तो, वैरूप्य आणि अतिरात्रभाग हे पश्चिम मुखापासून निर्माण झाले.

६०. एकविंश(२१)स्तो, अथर्ववेद, आप्तोर्या, अनुष्टुप्‌ छंद आणि वैराज यांची निर्मिती त्याच्या उत्तरवर्ती मुखापासून झाली.

६१.- ६२. प्रजापती ब्रह्मदेवाच्या विचित्र अंगांपासून मोठमोठे प्राणी निर्माण झाले. देव, असुर, पितर, मनुष्य यांची निर्मिती करून कल्पाच्या प्रारंभी, यक्ष, पिशाच, गंधर्व, त्याचप्रमाणे अप्सरांचे समूह निर्माण केले.

६३.-६४. विश्व निर्माण करणार्‍या भगवान ब्रह्मदेवाने नर, किन्नर, राक्षस, जलचर, पशू, पक्षी, सर्प निर्माण केले. अशा प्रकारे नित्य व अनित्य चराचर सृष्टी निर्माण केली. आणि कल्पाच्या प्रारंभीच, त्यांची जी कर्मे आहेत ती त्याने विस्तारित केली.

६५. पुन्हा पुन्हा निर्माण होत असलेले ते ती ती कर्मे करत राहतात. जसे हिंस्र आणि क्रूर अधर्म व अनृताचे तर अहिंस्र आणि मृदू धर्माचे व ऋताचे आचरण करतात. ??

६६.- ६७. तस्मात्ततस्य रोचते ?? इंद्रिये, त्यांचे विषय, प्राणिमात्रं, त्यांची शरीरे यांच्याबाबतीतले वैविध्य आणि त्या सर्वांची कर्तव्ये स्वतः विधात्यानेच निर्माण केली. भूतांची नामरूपे व त्यांची कृत्ये यांचाही विस्तार त्यानेच केला.

६८. कल्पांच्या प्रारंभीच, देवादींची व ऋषींची वेदानुकूल नावे त्यानेच निश्चित केली.

६९. जसजसे त्याने दुसर्‍यांचे अधिकार व नियम निश्चित केले, त्यानुसार त्यांचे यथायोग्य आचरण, लिंग व रूपांचे वैविध्य निर्माण झाले.

७०. अस्तित्व, भावना, वर्तन इत्यादींच्या बाबतीत क्रमानुसार तसेच वैविध्य दिसून येते. अशा प्रकारे कल्पाच्या आरंभी, तो पितामह अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करतो.

७१. प्रारंभी, निर्मितीच्या इच्छाशक्तीने युक्त व सर्जनशक्तीने प्रेरित, त्याचप्रमाणे सत्याचे ध्यान करणार्‍या अशा त्याने निर्मिती करण्याची इच्छा असणार्‍या परब्रह्माच्या गतीचे ध्यान केले.

७२. अशा प्रकारे ध्यान करणार्‍या त्याच्यापासून मानस प्रजा निर्माण झाल्या. त्यांच्या कार्यकारणांसह अनुकूल असे त्यांचे शरीर निर्माण झाले.

७३. त्या बुध्दिमान प्रजापतीच्या गात्रांपासून जीवात्मे निर्माण झाले. ज्यांच्याविषयी मी आधी उल्लेख केला आहे, तसेच ते होते.

७४.-७५. देवादी स्थावर प्रजा त्रिगुणांनी युक्त होत्या. अशा प्रकारे चर व अचर सृष्टी निर्माण करून सुध्दा, जेव्हा बुध्दिमान प्रजापतीच्या त्या प्रजा पुत्रपौत्रादिकांनी पुरेशा वर्धित झाल्या नाहीत, तेव्हा त्याने स्वतःसारखे इतर मानस पुत्र उत्पन्न केले.

७६. भृगु, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अंगिरस, मरीचि, अत्रि, दक्ष व वसिष्ठ हे मानस पुत्र होत.

७७. पुराणात ते नऊ ब्रह्मपुत्र म्हणून प्रसिध्द आहेत. त्याआधी, ब्रह्मदेवाने सनंदन आदी पुत्र निर्माण केले.

७८. परंतु, ज्ञानी, वीतरागी, मत्सरादी दोषांपासून मुक्त व उदासीन असे ते सर्व जगामध्ये प्रजा निर्माण करण्याच्या बाबतीत उपयुक्त झाले नाहीत.

७९. सृष्टी निर्माण करण्याच्या बाबतीत ते उदासीन असलेले पाहून ब्रह्मदेवाला इतका प्रचंड संताप आला की त्या संतापाने त्रैलोक्य जाळून टाकले असते.

८०. त्या प्रजापतीच्या क्रोधापासून सूर्याप्रमाणे दैदीप्यमान, माझाच अंश असलेला असा भगवान रुद्र उत्पन्न झाला.

८१.मध्याह्नीच्या सूर्याच्या तेजासमान, अर्धे शरीर पुरुषाचे व अर्धे शरीर स्त्रीचे असलेला असा तो भगवान रुद्र प्रचंड आणि विशालकाय होता.

८२. ‘तू आपल्या शरीराचे दोन भाग कर', असे म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावला. तेव्हा त्या उत्तम अशा रुद्राने स्त्री व पुरुष अशा रूपांत आपल्या शरीराचे दोन भाग केले.

८३. त्यानंतर त्या रुद्राने पुरुषाचे अकरा भाग केले आणि स्त्रीचे सौम्य असौम्य, शांत, अशांत असे भाग केले.

८४.-८५प्रजापतीने त्या दोघांची श्याम व गौर अशी भिन्न भिन्न रूपे तयार केली. त्यानंतर स्वतःपासून निर्माण झालेल्या त्या सर्व प्रजांचे पालन करण्यासाठी त्याने स्वत;पासूनच प्राजापत्य मनूस उत्पन्न केले.

अध्याय १ ते २०