अध्याय ६१ ते ८०

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय ६१ - कोटितीर्थ महिमानुवर्णनम्‌य

शौनक म्हणाले,"सर्वच तीथार्ंमध्ये कोटितीर्थ विशेष आहे. ब्रह्महत्यादि पापे या तीर्थात केवळ स्नान केल्याने नष्ट होतात असे जे तुम्ही मला पूर्वी सांगितलेत ते मला आता विस्ताराने सांगा."

सूत म्हणाले,"तू योग्य विचारलेस, मी तुला कोटितीर्थाचे माहात्म्य सांगतो. ब्रह्महत्यादि शंभर पापे केली असतील तरीही कोटितीर्थात स्नान केले असता मनुष्य त्या पापांपासून मुक्त होतो. हे मुनिश्रेष्ठा, कोटितीर्थाचे नावच कोटिद्रव्यासमान आहे. त्यामध्ये स्नान करणारा मोठया पापातून मुक्त होतो यात संशय नाही.याठिकाणी प्राचीन इतिहास उदाहरण म्हणून सांगतो, जो ऐकून एका क्षणात पापे विलयाला जातात."

"अवन्ती देशात विष्णुशर्मा नावाचा राजा होता. पूर्वी कृतयुगात तोही आपल्या राज्याचे पालन करत असे.नेहमी गीतवाद्यांमध्ये मग्न असा तो मद्यपी होता. सुगन्ध, पुष्पे, द्रव्य इत्यादि गोष्टी ब्राह्मणाला त्याने कधीही दिल्या नाहीत. देवांनाही काही अर्पण केले नाही. अत्यंत वाईट विचारांचा, सदैव उन्मत्त आणि दुष्ट असा तो राजा होता. नेहमी वेश्यागमन करावयाचा. रोज सुंदर, श्यामल, सुकेशी, सुडौल अशा स्त्रीसमवेत रममाण होत असे. असे रोज करत असे. गुरुपत्नी, भ्रातृपत्नी, मित्राची पत्नी त्याचप्रमाणे शरणागतांच्या पत्नी, शूद्रपत्नी वगैरे या सर्वांमध्ये काही भेद तो करत नसे. वेश्यासक्त तो विधवांशीही संग करावयाचा. दासी किंवा रजस्वला किंवा कोणत्याही प्रकारच्या स्त्रीबरोबर तो निरंतर रममाण होत असे. कृतघ्न असा तो देवाब्राह्मणांची निंदा करत असे. देवाब्राह्मणांचे दान तो जबरदस्तीने घेत असे. ब्रह्मद्वेषी, कृतघ्न लोकांबरोबर त्याचे सख्य असे. दुर्जन मंत्र्यांच्या संगतीने प्रजेमध्ये क्षोभ निर्माण करी,तर विद्वान्‌, वृध्द, सज्जन अशा चांगल्या मंत्र्यांचा त्याग करत असे. या धरतीवर असे एकही पाप नाही जे त्याने केले नाही. अशाप्रकारे त्या पापी राजाची शंभर वर्षे गेली. त्याने त्रास दिलेल्या सर्व स्त्रिया वारंवार उसासे टाकत, काही त्याला शाप देत तर काही रडत राहिल्या, तर काही भीतीने पळून गेल्या. अंतर्गृहात गेलेल्यापैकी कोणीही मुक्त झाली नाही."

पापाचा भार फार मोठा झाल्यामुळे त्याला राजक्षय झाला. दहा महिन्यात रोग बळावला. कोणतेही औषध, कोणताही नातेवाईक किंवा आई वा वडील, ना नशीब ना राज्य त्याला वाचवू शकले नाही. दान, धन वगैरेंनी काही परिणाम झाला नाही. केलेल्या पुण्य किंवा पापाचे फळ येथेच भोगावे लागते. अशा प्रकारे त्या राजाचा राजक्षय बळावला असता दैवयोगाने त्यावेळी ब्रह्मापुत्र ब्रह्मज्ञानपरायण सनक त्या शहरात आले. सौम्य, जितेंद्रिय, शांत, रुद्राक्षमाळा धारण करणारेअसे ते मुनी होते. योगश्रेष्ठ सनक त्या शहरात आले आहेत हे समजल्यावर विष्णुशर्मा राजाची पुण्यशीला पत्नी ते मुनी ज्या ठिकाणी आले होते तेथे जाऊन त्यांच्या पाया पडली व ती पतिव्रता त्यांना म्हणाली,"हे स्वामी, अनाथ अशा मला पतिदानाने वाचवा." असे म्हणून त्या मुनींना घेऊन ती राजाच्या महालात आली. त्यांना (मुनींना) आलेले पाहून त्या राजाने उठून, आसन देऊन, मधुपर्कादी विधीवत्‌ त्यांचा सन्मान केला. तो राजा त्या सनकांना विनम्रपणे म्हणाला,"आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. आज माझा जन्म व जीवन सफल झाले. आपल्या आगमनाने माझे पितर सन्तुष्ट झाले. हे मुनिश्रेष्ठा, अनाथ, पुण्यकर्मापासून विमुख, पापी, दुराचारी, कामलोलुप अशा मला वाचवा, माझे रक्षण करा. पूर्वीच्या जन्मामध्ये मिळवलेले पुण्य मोठया कष्टाने राखले जाते. पापी अशा मला आपल्या दर्शनाने अलभ्य असे ते पुण्य मिळतेआहे." असे त्या राजाने म्हटले असता त्या योगीन्द्राने एकाग्र मनाने दीर्घकाळ ध्यान लावले. काही वेळातच राजाने केलेली पापकर्मे लक्षात घेऊन सनक त्या व्याधिग्रस्त राजाला मधुर शब्दात म्हणाले,"राजा तू पूर्वी केलेले कर्म मी तुला सांगतो. जेथे वृंदावन नाही, शाळीग्रामाचे पूजन नाही. जेथे वेदांचा उद्‌घोष नाही किंवा पुराणपठण नाही, जेथे शास्त्रचर्चा नाही वा सज्जनसंगती नाही तेथे सगळे रोग, दुर्भिक्ष व भय असते. जेथे कठोर शब्द, नेहमी क्रोध राहतो. जेथे अशुभ वाणी त्याठिकाणी सर्व रोग असतात. गाय, ब्राह्मण, स्त्री, वेद व परवस्तू या बाबतीत माणसाने द्रोह करू नये आणि जर केलाच तर तो नरकात जातो. विश्वासघातकी, कृतघ्न, मायावी, परस्त्रीसंग करणार्‍या या सर्वांची कुठेही सुटका नाही. पूर्वजन्मात केलेले पाप या जन्मात किंवा सर्व व्याधिरुपाने त्या नराधमाला पीडा देते. तू तर पूर्वीच्या जन्मातवेश्येच्या व शूद्र पुरुषाच्या पोटी जन्माला आला होतास. धर्मध्वज या नावाने तू लोभी, प्राणीहिंसा करणारा, देवाब्राह्मणांची हत्या करणारा, नित्य पापकर्म करणारा, सदैव कामातुर असा होतास. चोरीच्या विचारात मग्न, क्रूर असा तू सरोवराच्या तीरावर रहात होतास. तशा प्रकारे तू राहत असता कोणी ब्राह्मणपत्नी आपल्या पतीसह हळूहळू तेथे गंगास्नानासाठी आली.आपल्या पतीला न्याहळत असता तिने इकडे तिकडे पाहिले नाही. अत्यंत सुंदर अशा त्या स्त्रीला पाहून त्यावेळी तुझे गंगाजलात स्नान झाले होते. त्या ब्राह्मणाने तिच्यासह स्नानदानादी कर्मे पार पाडली. ते सर्व पाहून तू कामविह्वल झालास. तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह आपल्या घरी गेला.तो ब्राह्मण गेल्यावर तू त्यांच्या मागोमाग गेलास. नंतर अर्धी रात्र गेल्यावर तू भिंतीला भोक (भगदाड) पाडलेस. त्या भगदाडाच्या मार्गाने तू आपल्या पतीसमवेत गाढ झोपलेल्या त्यास्त्रीपाशी गेलास व तिच्या हाताला स्पर्श केलास. तुझ्या करस्पर्शाने ती विप्रभार्या जागी झाली. भिंतीचे ते भगदाडरुपी दार पाहून "चोर, चोर" असे म्हणाली. त्या भगदाडाच्या बाहेर तू निघून गेलास. शहरातील गुप्तहेरांनी तेथे येऊन तुला पकडून राजासमोर नेले. सर्वांनी हा चोर आहे या शंकेने राजाला सांगितले. तो राजा धर्मशास्त्रज्ञ असल्यामुळे तुझे हातपाय तोडून तुला शहराच्या बाहेर कडयावरून पेᆬकून दिले. जोराने कडयावरून पेᆬकल्यामुळे त्या आघाताने तू मेलास. हे राजन, पूर्वजन्मात केलेल्या कर्माच्या फार मोठया दोषाने अनेक पापात सदैव रत अशी बुध्दी तुला प्राप्त झाली. माघ महिन्यात प्रातःस्नानाच्या पुण्याने तसेच ब्राह्मणाच्या स्नानसंध्यादी कर्मांच्या दर्शनाने तुला हे नृपत्व प्राप्त झाले. माझे येथील दर्शन पाप करणार्‍यांना अलभ्य असा लाभ आहे. तेव्हा पूर्वजन्मात व या जन्मात मिळवलेले पाप नेहमीरोगपीडाकारक होते. राजा, पाप हे नेहमी भोगण्यासाठी असते व पुण्य हे स्वर्गप्राप्तीसाठी असते. पापाने जीव यमदूतांच्या क्लेशांनी पीडला जातो. कुम्भीपाकादी अनेक नरकांमध्ये यमाच्या सैनिकांचा मार खावा लागतो. त्यांनी दिलेल्या यातनांचा अनुभव घ्यावा लागतो. मृगादी योनी प्राप्त करून शेवटी गोयोनीचा आश्रय घेतल्यानंतर माणसाला मनुष्ययोनी प्राप्त होते. अशाप्रकारे तुला हा जन्म मिळाला आहे."

अध्याय ६१ ते ८०