अध्याय २१ ते ४०

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

अध्याय २१

१. शंकराने म्हटले, ‘भृगू आणि ख्यातीला झालेला मृकंडू नावाचा मुनी होता. त्याची अतिशय सुंदर अशी सुमित्रा नावाची पत्नी होती.

२. तिच्या पोटी जन्माला आलेला महातेजस्वी आणि परमधार्मिक, अग्रीप्रमाणे कांती असलेला असा ऋषी मार्कंडेय नावाने प्रसिध्द होता.

३. त्याला बघून अत्यानंदाने त्याच्या आईवडिलांचे चेहरे फुलले/फुलत असत. त्यांचे इतर बांधव महर्षी हर्षित झाले.

४. अशा आनंदाच्या समयी अशरीरी वाणी म्हणाली, ‘हे मृकंडू, तुझा पुत्र १६व्या वर्षी मरण पावेल.'

५. ते वचन ऐकून, त्यावेळी तो दुःखी झाला. दुःखी अशा त्याने मार्कंडेयावर जातकर्म आदी इतर संस्कार केले.

६. त्या महात्मा पित्याने योग्य वेळी त्याला गुरुगृही नेले. हे बाळा, गुरुगृही त्याचे खूप ऐकून झाले (खूप शिकून झाले.)

७. गुरूंच्यं कृपेमुळे तो वेदांमध्ये पारंगत झाला. सर्व विांमध्ये निष्णात होऊन तो स्वगृही परतला.

८.-९. आईवडिलांच्या पाया पडून हात जोडून तो त्यांच्या समोर उभा राहिला. १२ वर्षांनी स्वगृही परत आलेल्या सर्वज्ञ पुत्राला बघून (दृष्ट्वांगं) ते मुनीदांपत्य आनंदित झाले. (पण) पुन्हा पुन्हा दुःखाश्रूंनी त्यांचे हृदय पिळवटून जात होते.

१०. त्यावेळी तो श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या दुःखी आईवडिलांना म्हणाला. मार्कंडेयाने म्हटले, ‘या आनंदाच्या समयी आईवडिलांना इतके अपार दुःख का बरे होत आहे ?

११. विद्याविभूषित अशा माझ्याबद्दल हे आई, तू का बरे शोक करत (व्यथित होत) आहेस? हे महाभाग मातापित्यांनो, तुमचे दुःख मी तपशीलवार जाणू इच्छितो.

१२. हे तात, मी एकणे योग्य वाटत असेल, तर मला आपण आपल्या दुःखाचे कारण सांगावे.' मृकंडूने म्हटले, ‘हे बाळा, तू जन्माला आल्यावर तुझी ही तपस्विनी आई अत्यानंदित झाली.

१३. चंद्रमुखी अशा तुझ्यासारख्या पुत्राकडे बघून डोळे बंद करून, हे पुत्रा, तुझी आई मला म्हणाली, ‘तुम्हाला मुलगा झाला आहे.'

१४. हे पुत्रा, तेव्हा मी त्या कुटीत जाऊन तुझे कमलवदन पाहिले आणि तुझ्यावर जातकर्मादी संस्कार करायला तत्पर झालो.

१५. आम्हा दोघांची दृष्टी तुझ्यावर जेव्हा खिळली होती, तेव्हा आकाशात अशरीरिणी वाणी मला लमोठ्याने म्हणाली,

१६. ‘हे मृकंडू, तुझा हा पुत्र १६व्या वर्षी मरण पावेल.' ते ऐकून वज्राचा हृदयावर घाला घातल्यासमान मी अतिशय दुःखी झालो.

१७. हे बाळा तुला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते सर्व आठवून तुझी आई दुःखाने शोकाकुल झाली आहे.

१८. मी सुध्दा दुःखामुळे माझे चैतन्यच हरवून बसलो. हे निष्पाप बाळा, हे आमच्या दुःखाचे कारण मी तुला सांगितले आहे.

१९. पित्याचे वाक्य ऐकून तो महाबुध्दिमान मार्कंडेय त्या दोघांना नमस्कार करून त्या दोघांसमोर हात जोडून उभा राहून त्यांना म्हणाला.

२०. मार्कंडेयाने म्हटले, ‘तुमचे तसेच मातेचे दुःख मी नष्ट करीन, यात संशय नाही. ज्यायोगे मृत्यूचे भय राहणार नाही, असे काही करीन.'

२१. असे म्हणून, त्या दोघांना आश्वासन देऊन आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा देखील घालून, त्यांच्या पायांपाशी अभिवादन करून, पित्याकडून आदेश मिळालेला तो घरातून निघून गेला.

२२. महान मुनींनी आणि त्यांच्या पत्नीनी ज्याचे सेवन केले जात होते अशा भृगूंच्या दिव्य, अत्युत्तम, पवित्र, पावन तपोवनात तो आला.

२३.-२९. अत्यंत शांत हरिणांनी/प्राण्यांनी पुरेपूर भरलेल्या, ब्रह्मघोषांनी अलंकृत झालेला, अग्रींनी आहूती दिली जात असल्यामुळे रात्रंदिवस दैदीप्यमान असलेला, तपाचरण, स्वाध्याय यांमध्ये रममाण असलेल्या योग्यांकडून ज्याचा उपभोग घेतला जात होता, मत्त अशा (द्विजसमाजष्ट), भ्रमण करणार्‍या भ्रमरांमुळे अलंकृत झालेला, जाती, कुरबक, अशोक, कुंद, मंदार वृक्षांनी सुशोभित झालेला, (संतानैः), कल्पवृक्षांनी, मंदार, हरिचंदनांनी, इतरही अनेक विविध वृक्षांच्या फळाफुलांनी लगडलेला, कुमुद, कह्लार, पंकज यांनी युक्त अशा निर्मळ पाण्यानी शोभणारा, पुष्कळ पाणी असलेल्या सरोवरांनी युक्त, नांनीही युक्त, चारही वेदांनी मूर्तिमंत सभोवार घेरल्याप्रमाणे असलेला, निरुक्त, शिक्षादी ६ अंगांनी जणू अवयवांप्रमाणे सेवा ज्याची केली जात असे असा, पुराण, न्याय, मीमांसा व धर्मशास्त्रांनी समाविष्ट असलेला, आत्मशुध्दीसाठी त्या त्या ठिकाणी (संमतात्‌) सेविलेला ब्रह्मपुत्राचा तो आश्रम म्हणजे जणू काही दुसरा ब्रह्मलोकच होता.

३०.- ३२. त्या आश्रमाच्या ठिकाणी जाऊन मार्कंडेय महामुनींनी तिथे आसनस्थ असलेल्या, निष्पाप, तपोधन, अमर म्हणून प्रख्यात असलेल्या अशा स्वतःच्या आजोबांना महात्मा भृगूंना पाहिले. त्यांच्या चरणकमलांची भक्तिभावाने पूजा करून आणि त्यांना वंदन करून, त्याने भृगूंना स्वतःची हकीकत तपशीलवार सांगितली. त्यांच्याकडून परवानगी मिळवून त्याने दीर्घ काळ तपश्चर्या केली.

३३. ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारा, निरामय असा मार्कंडेय माझेच मनाने ध्यान करत, माझ्यातच रममाण झालेला असा माझी भक्ती करत होता.

३४. त्या आश्रमात वायू व पाणी भक्षण करत (वाय्वम्बुभक्षगो) त्याने एक वर्ष काढले.त्या मुनीने पंचाग्रींच्या मध्ये सुध्दा एक वर्ष काढले.

३५. तिसरे वर्ष दिवसा फिरण्यात व रात्री इथे मुाम करत व्यतीत केले. हे पुत्रा, चवथ्या वर्षी तो वाराणसीला गेला.

३६. हे सुरश्रेष्ठा, तिथे गंगेच्या तीरी आश्रमाची स्थापना करून तिथे (स्थंडिले मां समावाह्य) माझे पूजन केले.

३७. हे पुत्रा, महातपस्वी मार्कंडेय मुनी तिथेच राहिला. शैवागमात सांगितल्यानुसार त्याने माझे पूजन केले.

३८. योग्य वेळी मृकंडूपुत्राला मारण्यासाठी काळ तिथे गेला. त्यावेळी मृत्यूला येताना बघून तो मुनी भयभीत झाला.

३९. त्या महामतीने धैर्यपूर्वक माझे मनाने स्मरण केल्यामुळे, त्याचे आयुष्य सरले असूनही, बळेच त्याला मारण्यासाठी काळ समर्थ झाला नाही ( होऊ शकला नाही).

४०. भक्तवत्सल अशा माझी रात्रंदिवस भक्तीने आराधना करणारा तो श्रेष्ठ ब्राह्मण एकदा शौचविधीसाठी गंगेवर गेला.

४१. त्यावेळी तो सामर्थ्यशाली काळ पाश धारण करून त्याला पकडण्यासाठी गेला. (तेव्हा) त्या काळाला पाहून तो मृकंडूपुत्र मला शरण आला.

४२. हे शत्रुदमना, पाण्यांनी भरलेला भम कलश घेऊन त्यानंतर त्याने निश्चल मनाने माझ्या चरणांचे ध्यान केले.

४३. तेव्हा मी त्याच्या तपश्चर्येने आणि अनन्यभक्तीने आणि त्या स्थानाच्या माहात्म्यामुळे त्याच्यासमोर प्रकट झालो.

४४. गंगेच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या कलाातून सत्वर बाहेर येऊन मी त्या  मार्कंडेयाला बळेच ओढून नेणार्‍या काळाला पाहिले.

४५. हे पुत्रा, पाशसहित, परशुधारी, खड्‌ग, शूळ, धनुष्य धारण करणार्‍या, माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणार्‍या त्याला लबघून मला संताप आला.

४६.-४७.  माझ्या क्रोधाग्रीत तो काळ बेचिराख झाला. काळाला मारून मी त्या मृकंडूपुत्र मुनीला बघून त्याला धीर देऊन म्हटले, ‘हे श्रेष्ठ ब्राह्मणा, अल्पायुषी असा तू माझी भक्ती केल्यामुळे प्राण धारण करून आहेस. हे विप्रा तू आयुष्यभर तप कर.

४८. हे पुत्रा, महान तप करून केशवाला प्रसन्न कर. तो तुला आयुष्य आणि तुझे मनोवांच्छित देईल.

४९. सर्वाचा धारणकर्ता, जगन्नाथ अशा अच्युताची विष्णूची आराधना न करता काहीही प्राप्त होत नाही. म्हणून हे पुत्रा, तू विष्णूची आराधना कर.'

५०. असे म्हणून, मी अदृश्य मार्गानेच निघून गेलो. हे पुत्रा, मी निघून गेलो असता, त्याने दुर्घट असे तप केले.

५१.-५२. माझेच मनाने ध्यान करत, नियमबध्द राहून, मीच एकमेव दैवत आहे असे मानून, लोककर्ता अशा ब्रह्माचा आणि भुवननायक अशा विष्णूचा अवमान करून सदैव भक्तिपूर्वक माझेच यजन करत असता, मी विप्ररूपात पुन्हा त्याला दर्शन दिले.

५३. हे पुत्रा, पुष्कळ वय झाल्यामुळे, काठीने अडखळत चालत मूठ भरून वाळू घेऊन मी ती गंगेत टाकली.

५४. पुन्हा पुन्हा त्वरेने मूठभर वाळू आणून आणून ती फेकणार्‍या मला बघून मार्कंडेयाने असे म्हटले.

५५. मार्कंडेय म्हणाला, ‘हे श्रेष्ठ ब्राह्मणा, आपण मूठभर वाळू का बरे पाण्यात टाकत आहात ? आपल्याला काय अभिप्रेत आहे? हे विप्रा, त्याचे कारण सांगावे.'

५६. हे पुत्रा, तेव्हा मी त्याला हसत चेष्टेने म्हटले, ‘हे उत्तम ब्राह्मणा, मी सेतू बांधून पलीकडे जाईन.

५७.-५८. लोकांवर (त्यामुळे) उपकार होईल. सर्वजण पुलावरून जातील.' असे ते बोलणे ऐकून, महातपस्वी श्रेष्ठ ब्राह्मण मार्कंडेय मोठ्याने हसला आणि मला म्हणाला, ‘हे ब्राह्मणश्रेष्ठा, हे शक्य नाही. प्रयत्न करणार्‍या तुझा हा उत्साह निष्फळ आहे.

५९. हे विप्रा, तू वयाने वृध्द आहेस. तुझी इंद्रिये शिथिल झाली आहेत. तेव्हा हे ऋषी विप्रा, हे सगळे थांबव. तुझा उत्साह निरर्थक आहे.'

६०.-६२. (त्यावेळी मी त्याला म्हटले) ‘हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे काय? हे तुझे तप सुध्दा निरर्थकच आहे. हृषीकेशाचा अवमान करून, जगत्पती ब्रह्मदेवाची आराधना न करता, केाव व पुंडरीकाक्षाशिवाय तुझे मनोरथ तुला प्राप्त होणार नाही. त्यामुळे ते निरर्थक कर्म सोडून देऊन दुसरे कर्म आचरणात आण.

६३. हे द्विजश्रेष्ठा, तू अल्पायुषी आहेस. (केवळ)रुद्रभक्तीने तू मरण पावशील. केशवाची अवज्ञा करून तू मृत्यूच्या कह्यात/ताब्यात जाशील.

६४. तेव्हा तू रुद्राला सोड. अच्युत विष्णूची आराधना कर. असे मी म्हटलेले ऐकून तो श्रेष्ठ मुनी खवळला.

६५.-६६. द्विजरूप धारण केलेल्या माझी ‘पापाचरण करणार्‍या, ब्राह्मणरूप धारण करणार्‍या वृध्द अशा तुझा धिार असो. भक्तवत्सल अशा देवदेवेश शंकराची निंदा करून, तू विेणूची स्तुती करतोस ! हे मूर्खा, तुझी प्रज्ञा शिल्लक राहणार नाही.' अशी त्याने संतापाने निर्भत्सना केली.

६७. असे त्याचे बोलणे ऐकून, हे सुरोत्तमा, मला सुध्दा एकाएकी राग पण आला नि आनंद पण झाला असे तू जाण.

अध्याय २१ ते ४०