निवास व खानपान व्यवस्था
गोकर्ण क्षेत्री मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजेस व धर्मशाळा आहेत. श्री महाबळेश्वर मंदिर परिसरातील हॉटेल्स व लॉजेसकडून साधारणपणे रु.४००/- प्रती दिवस एवढे भाडे आकारण्यात येते. (चेक-आउट वेळ २४ तास). श्री महाबळेश्वर मंदिर परिसरात अनेक शाकाहारी उपहारगृह आहेत. त्याचप्रमाणे गोकर्ण क्षेत्रीच्या हाफ मून समुद्र किनारा, कुडले समुद्र किनारा, ॐ समुद्र किनारा, पॅराडाईज समुद्र किनारा या समुद्र किनार्यांवर महागडी हॉटेल्स व रिसोर्ट उपलब्ध आहेत.