कसे पोहोचता येईल,,

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

गोकर्णक्षेत्री रस्त्यामार्गे पोहोचण्यासाठी

बंगलोर, मंगलोर, हुबळी व पणजी (गोवा) येथून गोकर्ण क्षेत्री पोहोचण्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बससेवा उपलब्ध आहे.

कुमठा (३६ कि.मी.), अंकोला (२६ कि.मी.) आणि कारवार (५९ कि.मी.) येथून गोकर्णक्षेत्री येण्यासाठी नियमितपणे बस व टेम्पोची सुविधा उपलब्ध आहे.

गोकर्णक्षेत्री रेल्वेमार्गे पोहोचण्यासाठी

गोकर्ण हे क्षेत्र कोकण रेल्वेच्या मुंबई ते मंगलोर या मार्गावर असून गोकर्ण रोड या रेल्वे स्थानकापासून गोकर्ण १० कि.मी. अंतरावर आहे.

मुंबई येथून मुंबई-मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस (ट्रेन नं. १२६१९) ने गोकर्ण येथे जाणे सोयीचे आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस दुपारी ३.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघून पहाटे ३.३० ते ४.०० च्या दरम्यान गोकर्ण रोड या स्थानकावर पोहोचते. पुढे गोकर्ण क्षेत्री जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर रिक्षा किंवा कार (चारचाकी वाहन) उपलब्ध असतात. पूर्ण रिक्षेचे भाडे रु.१५०/- व कारचे भाडे रु.२००/- एवढे आकारले जाते.

कुमठा (३६ कि.मी.) हे जवळील रेल्वे मुख्यालय आहे.

गोकर्णक्षेत्री हवाईमार्गाने पोहोचण्यासाठी

पणजी (गोवा) (१५५ कि.मी.), मंगलोर (२३८ कि.मी.) व हुबळी (१६१ कि.मी.) हे जवळील विमानतळ आहेत. पणजी व मंगलोर येथून रेल्वेने किंवा रस्त्यामार्गे आणि हुबळी येथून रस्त्यामार्गे गोकर्ण क्षेत्री जाता येते.