श्री क्षेत्र गोकर्ण यात्रा

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

श्री क्षेत्र गोकर्ण यात्रा

काशीच्या तुलनेत गोकर्णक्षेत्राचे महात्म्य एक गुंजभर जास्तीच कारण गोकर्णात महाबळेश्वर तर काशीत विश्वनाथ, गोकर्णात कोटी तीर्थ तर काशीत गंगा. गोकर्णात समुद्र परंतु काशीत गोकर्णातील समुद्राच्या तोडीचे काहीच नसल्याने गोकर्णक्षेत्र काशीपेक्षा काही अंशाने श्रेष्ठ ठरते, याची ग्वाही प्रत्यक्ष ताम्रगौरी गोकर्णात देत आहे. या अतिप्राचीन मूर्तीच्या हातात एक तराजू असून या तराजूतील गोकर्णाचे पारडे काशीच्या पारड्यापेक्षा एक गुंजभर जड आहे.

भोग आणि मोक्ष देणारी अशी सर्वश्रेष्ठ कर्मभूमी म्हणजे गोकर्ण, सर्व तीर्थक्षेत्रातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र म्हणजे गोकर्ण. गोकर्ण शिवक्षेत्री जो मनुष्य विधीवत् शिव-विष्णू-गणेश्वर-आदित्य-स्कंद-दुर्गा या सर्वांची स्थापना करेल तो जणू त्रैलोक्याची स्थापना करेल. कृतयुगात सहस्त्रवर्षांच्या तपश्चर्येने सिद्धी प्राप्त होते. त्रेतायुगात 700 वर्षांनी, द्वापार युगात 300 वर्षांनी तर कलियुगात फक्त 1 वर्षाने सिद्धी प्राप्त होते. जसे युगांमध्ये श्रेष्ठ कली तसे सर्व क्षेत्रांमध्ये सिद्धीक्षेत्र गोकर्ण श्रेष्ठ.