आदि गोकर्ण (अध्याय ८)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

आदि गोकर्ण (अध्याय ८)

एकदा शेषशायी नारायणांच्या मनात विचार आला आणि त्या विचाराबरोबरच त्यांच्या नाभीतून एक कमळ उमलले. या कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. नारायणांना नमस्कार करून ब्रह्मदेवाने आपले अवतार कार्य विचारले. नारायणांनी त्यांना सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितले. ब्रह्मदेवांना सृष्टीची उत्पत्ती कशी करावी ते कळेना आणि ते क्रोधाविष्ट झाले. या क्रोधामध्ये त्यांच्या ललाटातून एका बालकाचा जन्म झाला. रडणाऱ्या त्या बालकास ब्रह्मदेवाने का रडतोस? 'किं रूदम् ?' असे विचारले आणि त्या बालकाचे नाव रुद्र ठेवले. त्यांनी रुद्राला स्वतःला 10 भागात विभागून घेण्यास सांगितले. त्यातील दहाव्या भागाचे नाव आहे शंकर!

ब्रह्मदेवांना वाटले की, शंकर सृष्टीची उत्पत्ती करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांनी तसा आदेश शंकरांना दिला. आदेश मिळताच शंकर ध्यानमग्न होऊन खोल पाण्याच्या तळाशी सात्विक सृष्टीच्या उत्पत्तीसाठी तपश्चर्येला बसले. तीन युगानंतर ब्रह्मदेवांच्या लक्षात आले की, जर सृष्टीमध्ये सात्विक, राजस, तामस असे भेद नसतील तर सजातीय संकरामुळे महादोष निर्माण होतील म्हणून त्यांनी त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण केली.

ही गोष्ट प्रकृतीने शंकरांना सांगितली. त्यामुळे क्रोधीत झालेले शंकर अत्यंत रौद्र रुप धारण करून पृथ्वीला भेदून वर येऊ लागले. त्यांच्या या प्रलयंकारी रुपाने आपला विनाकारण विनाश होईल या कल्पनेने भयभीत झालेली पृथ्वी शंकराची दयायाचना करू लागली. तिच्या याचनेप्रमाणे शंकर पृथ्वीच्या कर्णाच्या छिद्रातून छोटे रुप घेऊन वर आले. बाहेर आल्यानंतर शंकर म्हणाले, हे पृथ्वी, तुझ्या अनेक नावांपैकी एक नाव आहे 'गो' आणि तुझ्या कर्णातून मी बाहेर पडल्याने हे क्षेत्र 'गोकर्ण' या नावाने विख्यात होईल. तसेच रुद्रयोनी या नावाने त्रैलोक्यात या क्षेत्राची ख्याती गायली जाईल.

या रुद्रयोनीवर ॠषीमुनींनी स्थापिलेले, ज्याच्या दर्शनाने अश्वमेधादी यज्ञांचे पुण्य मिळते, जन्मभराची पापे नष्ट होतात, तेच हे सध्या दुर्लक्षित आणि गोकर्ण मंदिराच्या डाव्या बाजूस सहा पायऱ्या खाली उतरल्यानंतर असलेले 'आदि गोकर्ण'.

 

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका