गोकर्ण पुराण

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

गोकर्ण खंडाच्या भाषांतराच्याबाबत दोन शब्द........

 गोकर्ण क्षेत्रीचे पुरोहीत श्री. भालचंद्र दिक्षित यांच्याकडून गोकर्ण पुराणाच्या संस्कृत खंडाची आवृत्ती मिळाली. हा खंड बघून छातीच दडपली, कारण आताच्या काळात संस्कृत लिहीता वाचता येणारी माणसे दुर्मिळ आणि एखादा चुकून-माकून संस्कृतचा पंडित मिळाला तरी तो एवढा वेळ भाषांतराला देईल हे ही महादुर्मिळ.

गोकर्ण महाबळेश्वराच्या कृपेने माझ्या शेजारी सौ. विजया कर्पूर यांनी संस्कृतच्या प्राध्यापिका सौ. सुहासिनी बाक्रे यांची ओळख करून दिली आणि आनंदातिशयाची बाब म्हणजे त्यांनी ही जबाबदारी अतिशय प्रेमाने स्विकारली. नुकत्याच त्या सेवानिवृत्तही झाल्या होत्या. मूळ पुण्याच्या ठाण्यामध्ये स्थायिक झाल्याने संपर्क सुलभ होता, देवधर्माची मूळातली आवड, प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि एकदा हातात घेतलेले काम तडीस नेईपर्यंत शांत न बसण्याचा स्वभाव. यामुळे या गोकर्ण खंडातील काही अडचणींची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापिठाची लायब्ररी, एशियाटीक लायब्ररी इत्यादी लायब्ररीमधून संदर्भ शोधून भाषांतराच्या कामास सुरुवात केली आहे.

मी त्यांना मला माहीती असलेल्या कथा ज्या अध्यायात येतात त्यांचे प्रथम भाषांतर करून देण्याची गळ घातली. असे करण्याचे कारण म्हणजे आपण लिहीत असलेल्या कथा विनाधार नाहीत हे जाणून घेण्याची उत्कंठा. त्यांच्या सहजसुलभ प्रेमळ स्वभावाने त्यांनी माझी हीही विनंती मान्य केली आणि त्यामुळेच गोकर्ण खंडाच्या अध्यायांचे भाषांतर एकसलग होऊ शकले नाही. हे कामही चालू आहे. जिज्ञासूंसाठी आतापर्यंत भाषांतरीत झालेले खंड संकेत स्थळावर देत आहोत.

या ठिकाणी श्री. बाळकृष्ण बाक्रे यांचाही उल्लेख करणे जरुरीचे आहे. कारण सौ. सुहासिनीताईंची हस्तलिखिते टंकलिखित करण्याचे काम त्यांनी स्वत:हून केले आणि गोकर्ण महाबळेश्वराच्या चरणकमळांशी आपली ही सेवा रुजू केली.

तरी संपूर्ण अध्याय अनुक्रमणिकेप्रमाणे न दिल्याबद्दल मनस्वी क्षमस्व!
-- श्रीपाद प्रभाकर काणेकर

अध्याय १ ते २०