मनोगत..

 

गोकर्ण महाबलेश्वर म्हणताच, आपल्या डोळ्यासमोर येतात, इन मीन चार गोष्टी द्विभुज गणपती, महाबलेश्वर, ताम्रगौरी आणि समुद्र.

शिवपुत्र स्कंद आणि शंभू महादेव, संवर्तक ऋषी आणि नारद मुनी यांच्यातील प्रश्न उत्तरे, शतानिक राजाला व्यास शिष्य शौनक मुनीनी दिलेली माहिती म्हणजेच 'गोकर्ण खंड' नावाचे ११८ अध्याय असलेले पुराण. या पुराणातून आपल्याला, गोकर्ण क्षेत्रात घडलेल्या पौराणिक आख्यायिकांचा खजिनाच उलगडतो. गोकर्ण महाबलेश्वराच्या प्रागंणातील 'श्री गोकर्ण क्षेत्राचा नकाशा' हा, या पुराणातील बहुतांश आख्यायिकांचा तपशीलवार सबळ पुरावा आहे.

पूर्वेला सिध्देश्वर आश्रम, दक्षिणेला अघनाशिनी नदी पश्चिमेला अरबी समुद्र आणि उत्तरेला गंगावली शाल्मली, या चतु:सीमेमध्ये वसलेले, प्रसिद्ध शिव क्षेत्र, सिद्ध क्षेत्र, भास्कर क्षेत्र आणि मुक्ती क्षेत्र म्हणजेच गोकर्ण. सध्या गोकर्ण क्षेत्री, गोकर्ण पुराणात उल्लेख असलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या ईश्वर लिंगांचे, तीर्थकुंडांचे महात्म्य, महती आणि त्यांच्या यात्रेचे प्रुमुख दिवस अशी सचित्र संक्षिप्त माहिती, शक्यतो नकाशानुसार, पण कथचा रसभंग होऊ नये अशा पद्धतीने शिवभक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न 'श्री. गोकर्ण महाबलेश्वर ऐश्वर्य दर्शन' या पुस्तकांतून करण्यात आला आहे हे पुस्तक मोफत उपलब्ध केले असून ते तुम्ही online किंवा डाऊनलोड करुन अवश्य वाचा..